सस्नेह नमस्कार!
आम्ही सादर करत असलेल्या "श्यामरंग.....त्या, त्यांचे प्रश्न.. आणि कृष्ण" या नाट्य- संगीत-नृत्याविष्काराच्या प्रयोगासाठी आग्रहाचं निमंत्रण!
शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१८. रात्रौ ८.३०ते ११
काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार, ठाणे येथे अंतर्नाद, ठाणे निर्मित, अपूर्व प्राॅडक्शन प्रस्तुत श्यामरंग सादर होतोय.
कृष्ण आणि त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या नात्यातील काही अनवट पैलूंवर, प्रश्नांवर, त्यातील रंगांवर आधारित ही कलाकृती आहे. अभ्यासपूर्ण निवेदन, नाट्य, संपूर्णपणे नवीन संगीत, त्यावर आधारित नृत्य असा एकूण थाट आहे.
नाट्यक्षेत्राशी काहीही संबंध नसतानाही एक धाडस करतोय. घर पहावं बांधून आणि नाटक पहावं करून हेच खरं. संहिता लिहून बरीच वर्षं झाली. एक प्रसिद्ध चॅनल ते २०१४ मध्येच स्टेजवर आणणारही होतं. थेटर कलाकार सगळं सगळं बुक झालं आणि नंतर काय झालं माहित नाही पण ते बारगळलं ते बारगळलंच. पण एक मूर्खपणा करून बसले होते. संहिता रजिस्टर केली नव्हती. चॅनल वर येणार म्हटल्यावर तिथल्या असंख्य लोकांच्या हाती गेली होती. तेव्हा हितचिंतकांनी सल्ला दिला की आधी ती नावावर रजिस्टर करून घ्या. मग उशीरा का होईना पण ते सर्व सोपस्कार पार पाडले.( असं कळलं की याचा तसा उपयोग नसतो कारण जरा वाक्यरचना बदलली, काळ बदलला की संहिता नवीन होते.) नंतर ते स्वत:च स्टेजवर आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला म्हणा. पण पैशाचं सोंग आणि प्रायोजकत्व मिळवण्यासाठी लागणारी हुषारी आणता येत नाही ना!. शेवटी अजून समविचारी, वेडे मित्र मैत्रिणी मिळाल्या. आणि हे धाडस करायचं ठरवलं. खूप बरे वाईट अनुभव आले. पण बहुतेक सगळे चांगलेच. खूप चांगली माणसं भेटली.(मिपाकर टका, बोका एक आझम, पैसा ताई, अजया हे तर आहेतच.)पण त्या सगळ्या विषयी नंतर कधीतरी.
आता लक्ष्य ३१आॅगस्टच्या शुभारंभाच्या प्रयोगावर. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा , आणि प्रेक्षकत्व सुद्धा लाभो ही प्रार्थना! तर नक्की या! _/\_
अपूर्व प्राॅडक्शन सादर करीत आहे,
अंतर्नाद ठाणे निर्मित,
"श्यामरंग .... त्या, त्यांचे प्रश्र्न आणि कृष्ण!"
कृष्ण आणि त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या नात्यातील काही अनवट पैलूंवर आधारित नाट्य- संगीत- नृत्याविष्कार.
शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१८. रात्रौ ८.३०ते ११
काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार, ठाणे
कलाकार- सुखदा भिडे, मंजुषा अमीन, डॉ प्राची जावडेकर
नृत्य - निविदा म्हात्रे, चिन्मय जोशी
लेखन- डॉ प्राची जावडेकर, मंजुषा अमीन
दिग्दर्शन- मंजुषा अमीन
संगीत- डॉ आश्विन जावडेकर
नेपथ्य- शिल्पा बेंडाळे, अतुल जोशी
प्रकाश योजना- अमोघ फडके
गायन- श्रीया सोंडूर, आरोही जावडेकर, माधवी गणपुले, आलाप जावडेकर
गीतकार- संगीता जोशी, प्रदीप कुलकर्णी, यजुवेंद्र गोरे, मंजुषा अमीन, डॉ प्राची जावडेकर, डॉ आश्विन जावडेकर.
साथसंगत- गौरव मूरकर, डॉ हिमांशु गिंडे, किरण वेहले, गंधार भालेराव.
ध्वनीमुद्रण- मिक्सबाॅक्स स्टुडिओ .
तिकीट विक्री दि. १८ आॅगस्ट पासून नाट्यगृहावर.
ऑनलाईन तिकीट विक्री दि. ९ आॅगस्ट पासून www.ticketees.com

वाचने
9964
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!!
धन्यवाद!
In reply to अरे वा!! by जव्हेरगंज
उत्तम उपक्रम.
_/\_
In reply to उत्तम उपक्रम. by प्रचेतस
@ प्राची अश्विनी,
धन्यवाद!
In reply to @ प्राची अश्विनी, by अनिंद्य
शुभेछा!!!
_/\_
In reply to शुभेछा!!! by कंजूस
खूप खूप शुभेच्छा. पुण्याच्या
लवकरच.
In reply to खूप खूप शुभेच्छा. पुण्याच्या by अजया
मनापासून शुभेच्छा!
_/\_
In reply to मनापासून शुभेच्छा! by ज्योति अळवणी
नवीन उपक्रमाला शुभेच्छा
आत्ता हातात श्यामरंगाचा डब्बा
In reply to नवीन उपक्रमाला शुभेच्छा by टवाळ कार्टा
मी पोकळ शुभेच्छा नाही देणार ,
धन्यवाद!
In reply to मी पोकळ शुभेच्छा नाही देणार , by ट्रम्प
वेळ बरीच उशीरा संपणारी आहे,
In reply to मी पोकळ शुभेच्छा नाही देणार , by ट्रम्प
अरेच्या, पोस्टायच्या घाईत
In reply to वेळ बरीच उशीरा संपणारी आहे, by माहितगार
अरे वा !! नाट्य- संगीत
धन्यवाद. कुणी ठाणेकर ओळखीचे
In reply to अरे वा !! नाट्य- संगीत by डॉ सुहास म्हात्रे
अनेक शुभेच्छा !!! +१००
_/\_
In reply to अनेक शुभेच्छा !!! +१०० by सिरुसेरि
अरे वा. मी नसणारे
:) मलाही आत्ताच कळलं.
In reply to अरे वा. मी नसणारे by वरुण मोहिते
नाट्य- संगीत
_/\_
In reply to नाट्य- संगीत by डँबिस००७
शुभेच्छा
नाय हो, भविष्य काळ वापरलाय मी
In reply to शुभेच्छा by नाखु
वा! विषय तर छान आहे! पहायला
धन्यवाद..
In reply to वा! विषय तर छान आहे! पहायला by शाली