Skip to main content

मोदी[च] का?

लेखक राघव यांनी सोमवार, 24/12/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः या विषयावरील अनेक धाग्यांमधे हात धुऊन घेण्याची अजिबात ईच्छा नाही. सहज वाटलं म्हणून लिहिलंय. :-) ===================== बर्‍याच दिवसांपासून या चर्चा पाहतोय, धागे पाहतोय.. मोठं कौतुक वाटतंय.. मोदींचं!! लोक किती जागरूक झालेत नाही? माझ्यासारख्या, न्यूज पाहण्याचा / वाचण्याचा जाम कंटाळा असलेल्या माणसाला, मागच्या ४-५ वर्षात किती उत्सुकता असते आता.. पुढे काय याची! नाही, पुर्वी अगदीच नव्हती असं नाही.. पण हे सगळं असंच चालणार.. कुणी काssssही बदल करू शकणार नाही असं अगदी मनावर ठाम बिंबलं होतं! साधारण २००६-२००७ पासून मोदींचं नाव सतत कानावर पडू लागलं.

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन : समारोप

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 24/12/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दि. ४/१०/२०१८ रोजी सुरु केलेली ही लेखमाला आज समाप्त करीत आहे. pict Alfred Nobel (१८३३- १८९६) हे कुशल अभियंता आणि संशोधक होते. त्यांची जन्मभूमी स्वीडन तर कर्मभूमी नॉर्वे होती. ते धनाढ्य होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्राद्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. तिचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस (अथवा संस्थेस) पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी: १. भौतिकशास्त्र २.

मोबाईलची शेजआरती

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/12/2018 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
*मोबाईलची शेजआरती* उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ|| दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश बॅटरी उतरवली दोन वेळा ||१|| घरी लपविले आई बापापासून मला ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ असा टाईमपास किती करावा? ||२|| असतात महत्वाची कामे घरी हापीसात न वापरावे कधी कितीही व्हाटसअप जरी आता मिळे फ्री डेटा ||३|| वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी जरी मी असे चांगला ||४|| काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे?

जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/12/2018 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.

अनन्तयात्री

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 23/12/2018 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अनाम नक्षत्रातील तारा झळाळताना गगनी अनाहताच्या झंकाराची दुमदुम आली कानी इंद्रियगोचर विभिन्न अनुभव एकवटोनी गेले स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील भेदही गळून पडले सुदूर बघता बघता अवचित क्षितिज बिंदूवत उरले अडले पाऊल कुंपण तोडून अनन्तयात्री झाले
काव्यरस

शेतकरी दीन

लेखक vcdatrange यांनी रविवार, 23/12/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
२३ डिसेंबर - राष्ट्रीय शेतकरी दिन शेतीतल्या 'श' ची देखिल माहिती नसलेल्या माझ्यासारख्या सामान्याने याबाबत कसंमांडावं म्हणुन बिचकत होतो. कामानिमित्त माती, पर्यावरण आणि हौसेपोटी 'Own Grown' म्हणजे स्वत:च अन्न स्वत: पिकवा या प्रवासा थोडा अभ्यास होतोय. कृषीक्षेत्रातील किटकनाशकांचा वापर, आरोग्यावरचे दुष्परिणाम याचबरोबर अजुनही म्हणावा तसा चर्चिला न गेलेला एक मुद्दा आहे. किटकनाशकांसोबतच शेतीमध्ये तणनाशकांचा वापर वाढलाय. गवत कुळातील या वनस्पती पुर्वी हाताने उपटुन बांधाच्या बाहेर टाकल्या जात. यातील सुमारे ५० ते ६० प्रकारच्या वनस्पती आयुर्वेदीय औषधी निर्माणात वापरली जातात.

पुणे - गोकर्ण

लेखक nandan यांनी रविवार, 23/12/2018 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो मला गोकर्ण महबलेश्वर ला जायचे आहे ..तर पुण्याहून सेल्फ ड्रायव्ह चा पर्याय सुचवाल का ? तसेच तेचून आणखीन ३ दिवस पाहण्यासारखे काही महत्वाचे ठीकाण सुचवाल का ? किंवा अगोदर कुणी पोस्त केली असेल तर कुपया लिंक द्यावी ..मला उपयोगी पडेल प्लान करण्याकरिता .. नंदन

शवविच्छेदन...... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 22/12/2018 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
शवविच्छेदन...... भाग - १ ......तरुणपणी डिसुझा विजापूरच्या मेडिकल कॉलेजमधे शिकत होता. ते कॉलेज आता मी जे प्रकरण सांगणार आहे त्या प्रकरणामुळेच बंद पडले. असो. कुठलीही गोष्ट पटकन शिकणे हे डिसुझाच्या रक्तातच होते. त्याच्याकडे अजून एक दैवी देणगी होती ती म्हणजे एकदा कुठली गोष्ट ऐकली की ती त्याच्य सदैव लक्षात राहायची आणि तो या देणग्यांचा यथोचित उपयोग करत असे. त्याला घरी काम करावे लागतच नसे पण कॉलेजमधे तो त्याच्या शिक्षकांची भाषणे अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आणि विद्वत्तापूर्ण शंका विचारायचा.