Skip to main content

[शशक' १९] - स्वप्न

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्राची नॅशनल अंडर १९ मधील शेवटची T२० मॅच तीही पुण्यात आपल्या होम ग्राउंड वर. आजपण ५० १०० केले की पुढच्या महिन्यात IPL ऑक्शनमध्ये आपण नक्की सिलेक्ट काही वादच नाही त्यात. विचारांच्या त्याच धुंदीत स्वतःचं नवीन घर, आई बाबांना छान ट्रिप, ही खटारा कायनेटिक च्या बदली मस्त कार असे कल्पनाविलास रंगवत रंगवत आपण समोरचा रेड सिग्नल तोडून भरधाव वेगाने जात आहोत हे लक्षात यायच्या आधीच ट्रकने उडवलं आणि मी हेल्मेट सक्ती विरुद्ध निघालेल्या मोर्चाच्या मधोमध जाऊन आदळलो.

[शशक' १९] - दोन ध्रुवावर दोघे आपण

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" ! फोटो स्टुडिओ का ? मी आरुष बोलतोय समोरून अगदी मंजुळ आवाज आला , "मी आश्लेषा बोलतेय" ! धागे जुळत गेले , एक दिवस काळाघोडाला भेटीचं ठरवलंच पण भलताच दैवयोग् ती:- तू आला का नाहीस ? तो:- मी आलो होतो ना ! तो:- ओके , शेवटचा चान्स , संध्याकाळी शिवाजी पार्कात भेट ती:- तिथे जेल आहे वेडी आहेस का? तो:- खोटारडी आहेस ती:- गपबस , परवाच फोटो काढला तिकडे थोडावेळ स्मशानशांतता अन परत फोन झाला ती:- सॉरी , रागावून बोललो आपण दोघे तो:- मला कळलं आहे, "आपण कधीच भेटू शकणार नाही" ती:- का? तो:- आपण समांतर विश्वात (मल्टिव्हर्स) आहोत , त्यांच्याकडा जुळल्यानेच फोन लागला ती:- बर तडफड तिकडेच मग !

[शशक' १९] - हकालपट्टी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं." "असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं” "तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन." “तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!” असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.

[शशक' १९] - रेडिओ, गाणी आणि संध्याकाळ

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
कितने अजीब रिश्ते है यहां पे दो पल मिलते है, साथ साथ चलते है जब मोड आये तो बचके निकलते है
आणि…
मैने दिल से कहा ढूंढ लाना खुशी नासमझ लाया गम, तो ये गम ही सही
ही उदासवाणी गाणी रोज संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान रेडिओवर पाठोपाठ लागायची आणि तो आनंदाने उसळायचा! दिवसभरातही लागायाची, तेव्हा लक्ष नसायचं पठ्ठ्याचं. साऱ्या ऑफिसने कामात वेग घेतलेला आणि हा डबा बॅगमध्ये ठेव, डेस्क आवर अशा कामात गुंतलेला. आता इतक्या वर्षांनंतर रॉकींग, ढिंच्याक गाणी लागतात संध्याकाळी रेडिओवर.

[शशक' १९] - खजील

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
हा नेहमीप्रमाणे दुकानात बसलेला दुपारची वेळ, साडी नेसलेली, हिडीस वाटावा असा मेकअप आणि टाळ्या वाजवत तो आला. हा नेहमीप्रमाणे त्रासिक चेहऱ्याने काही नाही जा पुढे बोलला, तो क्षणभर रेंगाळला आणि मनाशी काहीतरी ठरवून खड्या आवाजात ह्याला बोलला अरे बाबा हिकड तर ये कि. हा उठला त्रासिकपणे आणि त्याला गुर्मीत म्हणाला काय पाहिजे रे ? त्याने काही लिपस्टिक, टिकल्या आणि चमकी वस्तू दाखवायला लावल्या आणि त्यातील भडक कलरच्या त्याला आवडलेल्या वस्तू हातात घेऊन याच्या हातात पैसे कोंबून फ़क़्त इतकेच बोलला “भाऊ कधीतरी आमची पण इज्जत कर” आणि खजील झालेला हा ‘त्याच्याकडे’ पाहत हातात पैसे घेऊन सुन्नपणे उभा होता दुकानाच्या दारात

चंद्रिका

लेखक किल्ली यांनी बुधवार, 06/02/2019 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती. "कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला.

[शशक' १९] - दोघी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळाच्या गर्दीत सिग्नल ला गाडी थांबली तशी तिने बाजूला पाहीलं. नेहमी प्रमाणेच रस्त्याच्या कडेला बंद दुकानासमोर ’ती’ बसलेली होती. जवळ लहान मूल. फाटके, मळके कपडे, केसांच्या झिंज्या, चारदोन भांडी व कपड्यांचा ’संसार’, चेहर्‍यावर दारिद्र्याच्या खुणा.... तिने मान फिरवली. ..इतके असूनही त्या लहानग्या मुलाच्या डोळ्यांतला आनंद व समाधान तिला अस्वस्थ करुन गेलं होतं. काय होतं त्याच्या कडे.? फक्त एक फाटका शर्ट आणि आधारासाठी “आईचा” हात! तिला घरी वाट बघत असलेली तिची दिड वर्षांची मुलगी आठवली. खूप खेळणी, कपडे आणि खाऊ यांच्या गराड्यात 'आईला' विसरायचा प्रयत्न करीत असलेली! खरंच...मुलांना काय हवं असतं....?

[शशक' १९] - ढवळाढवळ

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
टीडिंग...फोन वाजला, व्हॉट्सॲपचा कस्टम टोन असल्याने तो संपदाचा मेसेज असल्याचे आशिषच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी परतण्याच्या बोलीवर, आईच्या वाढदिवसानिमित्त ऑफिसमधून परस्पर माहेरी गेलेल्या संपदाने तब्बल अठरा दिवसांनी काय मेसेज पाठवला असेल हा विचार करत आशिषने मेसेज वाचला. “तुला वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं” हनिमूनला गेलेल्या दिवसापासून आशिषच्या सासूने सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मेसेज / फोन करून दोघांच्या वैवाहिक जीवनात अक्षम्य ढवळाढवळ करून त्यांचे आयुष्य निरस करून टाकले होते.

[शशक' १९] - सत्य कटू ते जहर वाटते

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मी आई होणार हे समजल्यावर तुला आनंद नाही झाला? मख्खासारखा जेवणावरुन उठून गेलास? किती विचित्र वाटले? आई बघ किती आनंदात आहेत, त्यांचे प्लॅनही सुरु झाले" “ भोळी आहे बिचारी, अज्ञानात सुखी आहे . पण माझे काय? तुझ्या सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आहेत हे माहीत असूनही मी आनंदाचे नाटक करू? तू आई होऊच शकत नाहीस हे माहीत असताना खोटे बोलून काय मिळाले तूला? त्यापेक्षा दत्तक घेण्याचा पर्याय का स्विकारत नाहीस?” “मी मुल दत्तक घेणार नाही कारण माझे नाही तर तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पण स्वत:चे न्यून लपवण्यासाठी तू दोष माझ्यावर ढकललास.... आणि ज्यावेळी हे मला समजले त्याचवेळी मी आई होण्याचा निर्णय घेतला.”

मैत्र - ५

लेखक शाली यांनी बुधवार, 06/02/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, किती ओरडशील त्याला? जातोय डॉक्टरकडे आम्ही” बाबा कपडे घालता घालता आईला म्हणाले. पण आईचा राग काही कमी होत नव्हता. “मला हौस आहे म्हणून चिडलेय मी! ‘जरा सडा घालायचाय, शेण आणून देतो का?’ म्हटलं तर तोंड फिरवून जातो हा. मग आता कशाला गेला होता त्या बैलाची शेपटी ओढायला?” म्हणत आईने ओट्यावर भांडे आदळले. काळजीपोटी बडबडत असली तरी मला आता वैताग आला होता तिच्या बडबडीचा. “काही होत नाही, जरासं तर लागलय” असं सगळ्यांना सांगता सांगता आता हात चांगलाच दुखायला लागला होता. इन्नीने लावलेल्या चंदनानेही काही फारसा फरक पडला नव्हता.