Skip to main content

[शशक' १९] - दोघी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळाच्या गर्दीत सिग्नल ला गाडी थांबली तशी तिने बाजूला पाहीलं. नेहमी प्रमाणेच रस्त्याच्या कडेला बंद दुकानासमोर ’ती’ बसलेली होती. जवळ लहान मूल. फाटके, मळके कपडे, केसांच्या झिंज्या, चारदोन भांडी व कपड्यांचा ’संसार’, चेहर्‍यावर दारिद्र्याच्या खुणा.... तिने मान फिरवली. ..इतके असूनही त्या लहानग्या मुलाच्या डोळ्यांतला आनंद व समाधान तिला अस्वस्थ करुन गेलं होतं. काय होतं त्याच्या कडे.? फक्त एक फाटका शर्ट आणि आधारासाठी “आईचा” हात! तिला घरी वाट बघत असलेली तिची दिड वर्षांची मुलगी आठवली. खूप खेळणी, कपडे आणि खाऊ यांच्या गराड्यात 'आईला' विसरायचा प्रयत्न करीत असलेली! खरंच...मुलांना काय हवं असतं....? त्यांच्या गरजा भागवणं...की आईचा सहवास...? तिला पुन्हा एकदा प्रश्न पडला....!

वाचने 5582
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आवडली!

आवडली.

+!

In reply to by मोहन

वर +१ असे वाचावे

+१

+१

आवडली

कथाविषय आणि कथा आवडली.

+1

+१

+१

+१


+1