Skip to main content

[शशक' १९] - स्वप्न

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्राची नॅशनल अंडर १९ मधील शेवटची T२० मॅच तीही पुण्यात आपल्या होम ग्राउंड वर. आजपण ५० १०० केले की पुढच्या महिन्यात IPL ऑक्शनमध्ये आपण नक्की सिलेक्ट काही वादच नाही त्यात. विचारांच्या त्याच धुंदीत स्वतःचं नवीन घर, आई बाबांना छान ट्रिप, ही खटारा कायनेटिक च्या बदली मस्त कार असे कल्पनाविलास रंगवत रंगवत आपण समोरचा रेड सिग्नल तोडून भरधाव वेगाने जात आहोत हे लक्षात यायच्या आधीच ट्रकने उडवलं आणि मी हेल्मेट सक्ती विरुद्ध निघालेल्या मोर्चाच्या मधोमध जाऊन आदळलो. आता आकाशात हलकेच तरंगत वर जाता जाता डोळ्यासमोर दिसत होती ती तुटलेली स्वप्ने आणि आईने कितीदा तरी ओरडून ही जुन्या घरात खुंटीवर लटकावलेलं हेल्मेट!!!

वाचने 15018
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

+१ कथेपेक्षा त्यातल्या संदेशाकरता +१ दिलंय. हेल्मेट्सक्तीचा विरोध कितीही प्रयत्न केला तरी मला झेपत नाही.

कथेपेक्षा त्यातल्या संदेशाकरता +१ दिलंय. हेल्मेट्सक्तीचा विरोध कितीही प्रयत्न केला तरी मला झेपत नाही. +११११