Skip to main content

[शशक' १९] - हकालपट्टी

बुधवार, 06/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं." "असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं” "तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन." “तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!” असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.

वाचने 16171
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

+१

मंगळी?

+१

+१

+१

अरे सर्व जण " अफाट कल्पना , छान " असं लिहीतायत .. कृपा करून जरा समजावून सांगाल का या पामराला ? मला समजलंच नाही त्यामुळे खरंच गुण देता येत नाही आहेत पण जर कुणी समजावून सांगितलं तेर नक्कीच देईन ..

+१

+१

वृद्ध आईला सोडून एका सुंदर स्त्रीच्या आकर्षणापाई स्वग्रह सोडून तो जातो. परंतु ती स्त्री त्याच्या लंपटपणाला नाकारून त्याला ढकलून देते

मला वाटतं याचा अर्थ बहुदा असा असावा. मानवानी पर्यावरणाचे नुकसान केले आणि पृथ्वीला भयाण, ओबडधोबड केली आणि मग नवीन वस्ती करायला दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहतोय पण तेथील रहिवासी त्याला म्हणताहेत कि तुझ्या आईच्या ( पृथ्वीच्या) विनाशाला तूच कारणीभूत आहेस, तिचा विनाश केलास आता इथे आमचा विनाश करशील असं म्हणून त्याला पृथ्वीवर ढकलून देतात. सुंदर रूपकात्मक कथा.

+1 (मला वाटतं याचा अर्थ बहुदा असा असावा. मानवानी पर्यावरणाचे नुकसान केले आणि पृथ्वीला भयाण, ओबडधोबड केली आणि मग नवीन वस्ती करायला दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहतोय पण तेथील रहिवासी त्याला म्हणताहेत कि तुझ्या आईच्या ( पृथ्वीच्या) विनाशाला तूच कारणीभूत आहेस, तिचा विनाश केलास आता इथे आमचा विनाश करशील असं म्हणून त्याला पृथ्वीवर ढकलून देतात. सुंदर रूपकात्मक कथा)याच्याशी सहमत

वेगळी कल्पना.

.

+1

1

+१

सर्व वाचकांचे आणि मत दात्यांचे आभार!

पद्मावति ह्यांनी लावलेला अर्थ अगदी बरोबर आहे.. धन्यवाद पद्मावति