Skip to main content

(काय करून आलो)

लेखक नाखु यांनी शनिवार, 29/06/2019 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

(चहा पिऊन आलो..)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 29/06/2019 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात प्राची ताईंची मनातल्या मनात क्षमा मागून भेटायला गेलो, गप्पा मारून आलो? माझ्याच घरुन मी चहा पिऊन आलो.. ना थेंब दिलास पाण्याचा पण बोध फुकट दिलास. आपापल्या घरून आपण चहा पिऊन आलो.. मित्र होते वर्‍हाडी, पुण्यामध्ये नवखे ? त्यांना कसे पटावे मी चहा पिऊन आलो..? कप जरी धुतले तरी थोडे पिवळे झाले .. कुणास समजू न देता मी (गुपचुप) चहा पिऊन आलो. पैजारबुवा,

माझं "पलायन" ११: पुन: सुरुवात करताना

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 28/06/2019 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
११: पुन: सुरुवात करताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

कार्पोरेटायनम:

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 28/06/2019 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं कसं असतंय.. कंपनीत कोणाच्यातरी एका छोट्या चुकीने एखादा छोटामोठा प्रॉब्लेम उद्भवतो. आणि हल्ली फारच अनकॉमन झालेला कॉमन सेन्स वापरला तर तो प्रॉब्लेम लगेच सोडवला जाऊ शकतो. पण पण पण.... जो हायलाईटच झाला नाही तो प्रॉब्लेम कसला ! या कार्पोरेट नियमाप्रमाणे तो प्रॉब्लेम चुगलकी पद्धतीने तुघलकी मॅनेजमेंटसमोर मांडल्या जातो. मग गुन्हेगारांची रीतसर पेशी होते. आणि समस्येचे मूळ शोधण्यासाठी 'जाऊ तिथे माती खाऊ' अश्या हायली एक्सपीरिअन्सड लोकांची समिती नेमण्यात येते. पुढचे काही दिवस समिती गुन्हेगारांची उलट तपासणी घेते. ही उलटतपासणी होत असताना बाकीचे कलीग,"घेन्न बाबू आता" ह्या नजरेने बघत असतात.

पुणेरी तंदूरी चहा by Namrata's CookBook :५

लेखक Namokar यांनी शुक्रवार, 28/06/2019 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: १ कप पाणी २ कप दूध ५ छोटे चमचे चहा पावडर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता) ४ चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता) १ इंच आलं(किसलेले) १/४ चमचा वेलची पुड मातीचं भांड क्रमवार पाककृती: १. मातीचे भांडे कमी गॅस फ्लेमवर गरम करायला ठेवा २. आता गॅसवर एक भांडे ठेवा त्यामध्ये पाणी ,चहा पावडर ,साखर,किसलेले ,वेलची पुडआलं घाला ३. मातीच्या भांड्याची बाजू बदला ४. पाणी थोडे उकळलेकी त्यात दूध घालून एकदा मस्त चहा उकळून घ्या ५. चहा एका भांड्यात गाळून घ्या ६. आता मातीचे गरम भांडे एका मोठ्या पातेल्यात ठेवा आणि त्यामध्ये गरम चहा ओता ७.

काॅफी पिऊन आले...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 28/06/2019 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.
काव्यरस

चिनी फसगत!

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 27/06/2019 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
चिनी फसगत ( खास करून प्रथमच भारतातून अति पूर्वेच्या देशात प्रवास करणाऱ्यांसाठी ) तो: चला आपण या वेळी मलेशिया सिंगापोरे ला जाऊन ती : अरे पण तिकडे जेवणाचा काय चित्र विचित्र चिनी मिळतं, आपण जरी नॉन वेग खात असलो तरी जमणार कसं? तो: आग त्यात काय आपण नाही का इथे चायनीज खातो जवळ जवळ आठवड्यातून एकदा खरं तर "ती " ची शंका रास्त असतें प "त्या" ला हे माहित नसता कि भारतात जो चिनी खातो ते " इंडियन चैनेईज" असत असत चविष्ट आणि मस्त पण ते काही खरे चिनी नव्हे , मेनलॅन्ड ( म्हणजे मूळ शांघाय वैगरे , सेनापती बापट रस्त्यावरचे नाही ) चीन तर सोडून द्या मलेशिया , इंडोनेशिया , सिंगापोरे मधील चैनेईज हे सुद्ध

खास मत्स्यप्रेमींसाठी एक शोध

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 27/06/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांना मत्स्यआहार खूप प्रिय होता हे बहुतेक लोकांना माहिती असेल त्यांच्या एका पुस्तकात ?( लेख किंवा छोट्या कथा ) त्यांनी "पावसाळ्यातील मत्स्यआहार " यावर एक लेख लिहिलेला आहे कोणत्या पुस्तकात? त्याचा शोध घेत आहे , कोणास माहिती असल्यास कृपया कळवावे हि विनंती