Skip to main content

पावसा पावसा पड रे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 03/07/2019 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
पावसा पावसा पड रे --------------------------------------------------- पावसा पावसा पड रे लागू देत झड रे पाऊस पडला संततधार सगळं झालं हिरवंगार रान सारे चिंब झाले वाहू लागले नद्या नाले पावसा पावसा पड रे लागू देत झड रे
काव्यरस

प्रतिशोध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 03/07/2019 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
सुलभा ब्रह्मे नी कुलूप उघडले अन वस्ती गृहाच्या खोलीत प्रवेश केला बारावीला टॉपर असलेली सुलभा न पुण्याच्या बी जे मेडिकल मध्ये प्रवेश घेतला होता डॉक्टर होण्याचं मुख्य कारण म्हणजे समाज सेवा हे तिचे सुप्त ध्येय होत - २ दिवसांनी प्युन आला अन तिला एक फॉर्म दिला त्यात तिला तिची माहिती जसे नाव पत्ता फोन नंबर इत्यादी भरायला सांगितला व एच ऑ डी साने सरांची त्यावर स्वाक्षरी घेण्यास सांगितले - ती ते कागदपत्रे घेऊन सरांच्या ऑफिस मध्ये आली - सर मे आय कमं इन ? या - तिने ती कागद पत्रे साराच्या जवळ दिली व आदबीने उभी राहिली वाट पाहात सरांनी ती वाचली व तिच्या कडे बघितले त्यांची नजर तिच्यावरून फिरत होती स

पालक कॉर्न सूप by Namrata's CookBook :६

लेखक Namokar यांनी मंगळवार, 02/07/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: पालक / पालकाचे देठ गोड कणीस १ चिरलेला कांदा ३ चिरलेल्या मिरच्या (आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करु शकता) साय /दूध / अमूल फ्रेश क्रीम तुप मीठ क्रमवार पाककृती: १. सर्वप्रथम एक पातेल घ्या.त्यामध्ये पाणी घ्या , कणीस , चवीनुसार मीठ घालून ३ ते ४ उकळून घ्या २. तोपर्यंत सूपची तयारी करु ३. कमी गॅस फ्लेमवर एक कढाई घ्या आणि त्यामध्ये तुप घ्या ४. तुप गरम होत आलेकी चिरलेली मिरची घ्या आणि १ मि. परतून घ्या ५. आता चिरलेला कांदा घालून २ मि. परतून घ्या ६.स्वीट कॉर्न तायार आहे ,त्यातील पाणी काढून घ्या ७. कांदा २ मि.

पावसा पावसा पडू नकोस

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 02/07/2019 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
पावसा पावसा पडू नकोस ------------------------------------------------------ ढगांमध्ये दडू नकोस पावसा पावसा पडू नकोस आम्हाला आहे खेळायचं खेळताना तू येऊ नकोस क्रिकेटचा खेळ आलाय रंगात त्याच्यामधे खो घालू नकोस ढगांमध्ये दडू नकोस पावसा पावसा पडू नकोस

कोडगं व्हायचं...

लेखक निओ यांनी मंगळवार, 02/07/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
खुशाल कोडगं व्हायचं कशाला मनाला लावून घ्यायचं मनाला लावून घेण्याने परिस्थिती थोडीच बदलणार आहे अवतीभवतीची माणसं थोडीच बदलणार आहेत कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला ओरखडे पडायला काय सुख मिळतं संवेदनशील मनाने चार ओळी लिहिता येतात पानभर खरडता येते...

Amazing .. money transfer

लेखक मराठी कथालेखक यांनी मंगळवार, 02/07/2019 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल टीव्हीवर येणार्‍या अनेक जाहिरातींतून उत्पादन/सेवेच्या जाहिरातीसोबतच स्त्री-पुरुष समानतेला हलकेच स्पर्श केलेला असतो. मुली मुलांपेक्षा कमी नाहीत , कर्तृत्वात मागे नाहीत हे अधोरेखित करण्याची जणू स्पर्धा असते. अमेझॉन मनी ट्रान्सफरच्या जाहिरातीत मात्र एक मुलगी आपल्या मित्राला अर्थिक मदत करताना दिसते. स्मार्ट वॉचकरिता जमवलेले पैसे ती मित्राला विमानाच्या तिकिटाकरिता देते असं दाखवलंय. छान वाटली ही जाहिरात..

माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 02/07/2019 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

ऑफिसात जाऊन आलो

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 02/07/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

सहज उडण्याचा भ्रम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/07/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे काही वेळा खूप एकटं वाटतं. असुरक्षित वाटतं. आपल्या पाठीमागे कोणीही उभं नाही असं वाटतं. जवळचं असं आजूबाजूला कोणीही नसल्याची भावना बळ धरू लागते. आपण उपरे आहोत. आपण चुकून या जगात जन्माला आलोत. अवेळी आपलं काही बरं वाईट झालं तर? झोपेत. रस्त्यात. एकटे असताना. कोण कोणाला कळवेल? आयुष्य म्हणजे काय? आपण कशासाठी जगत आहोत? जन्माला आलोत आणि आतापर्यंत कर्मधर्मसंयोगाने वाचलोत म्हणून फक्तह जगायचं का? या जगण्यामागे आपला उद्देश काय? पोटापाण्यापुरतं कमवण्यासाठी नोकरी करत रहायची. पुस्तकं वाचायची. आणि अधूनमधून काही लिहिण्यासारखं वाटलं तर लिहायचं. बस.