Skip to main content

युगांतर - आरंभ अंताचा भाग १९

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 03/08/2019 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १९ हस्तिनापुरात पंडु स्वयंवर जिंकून कुंती सोबत आला. गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात महालात त्यांनी प्रवेश केला. "तातश्री!" "महाराज पंडु! स्वागत आहे महाराणी कुंती" पंडु आणि कुंतीने भीष्मांना नमस्कार केला. "अनुज..." हास्य मुखाने धृतराष्ट्र आवाजाच्या दिशेने येत होता. पंडूने जाऊन त्याला मिठी मारली. "मला खात्री होती. तु स्वयंवर जिंकणार!" कुंतीने पुढे जाऊन नमस्कार केला. "आयुष्यमान भवं!" मागून गांधारी पुढे आली. "महाराज, तुमची भ्रातृजाया.... गांधारनरेश यांच्या कन्या, गांधारी." भीष्मांनी परिचय करून दिला. पंडुला आनंद झाला. पण गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी पाहून त्याला आश्चर्य वाटलं.

बॉलिवूडचे बाप

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 03/08/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच. १. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ) प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे.

मिळता नजरेस नजर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 03/08/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिळता नजरेस नजर मिळता नजरेस नजर श्वास थांबून गेला मनात मन मोराचा पिसारा फुलू लागला * कशी चुकवू नजर जीव गोंधळून गेला त्या हस~या छबीच ध्यास काळजाने घेतला * पुजले प्रेम दैवताला कौमार्य नैवेद्य वाहिला विश्वासू सखा होता तो जिव्हारी घाव देवुन गेला * उतरता धुंदी प्रेमाची जगाचा व्यवहार कळला तो पहिला घाव बरेच शिकवून गेला

शिव त्रिगाथा

लेखक अभिजित भिडे यांनी शनिवार, 03/08/2019 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान शंकर..रुद्र .शिव.. नीलकंठ.मूळ त्रिदेवांपैकी एक .. जनक ब्रह्मा , पालक विष्णू आणि संहारक महेश..सृष्टीचा समतोल राखणारा शिव. देव आहे का नाही हे मला माहित नाही पण देवत्वाच्या समीप जाणारी जर एखादी शक्ती असेल तर ती आपल्या कायेमध्ये चेतना फुंकणारी आणि आंतरिक प्रेरणा देणारी शक्ती होय. अशाच आंतरिक प्रेरणेने एक I.I.M उच्च विद्याविभूषित , बड्या वित्त कंपनीत उच्चपदावरील अधिकारी शिवभक्त अमिश त्रिपाठी सगळं हातचं सोडून भगवान शंकरावर पुस्तक लिहितो काय आणि rest is the history...शिव त्रिगाथा ही भारतीय साहित्यविश्वात अल्पाधि वेळात सर्वाधिक खपाची पुस्तके ठरतात..

तू मी अन पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/08/2019 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस! पाऊस!! पाऊस! पाऊस!! झाला सारा भणाणलेला त्यासवे आला वारा वारा उडवीतो माझे मन मनामध्ये तू आहेस खरा चिंब मी भिजलेली माझ्यासवे तुझे भिजले तन हिरव्या रानात घेवूनी कवेत मीच हरवले माझे मन पाणी आले पानोपानी झाडे भिजली रानोरानी मिठीत तुझ्या मी आलंगूनी विसरले मी, गेले हरवूनी - बी ऑलवेज लाईक मी - ऑलवेज युवर्स पाभे ०३/०८/२०१९
काव्यरस

रामगड किल्ला

लेखक अभिजित भिडे यांनी शुक्रवार, 02/08/2019 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामगड म्हणजे शोले सिनेमातील रामगड नव्हे तर कोकणातील एक दुर्ग आहे. कणकवली आचरा मार्गावर कणकवलीपासुन 10 कीमी वर हा गढीवजा दुर्ग आहे. आमच्या एका ट्रेकर मित्राला महाराष्ट्रातले असे कमी प्रसिद्ध पण ऐतिहासिक मूल्य असलेले दुर्ग शोधून सर करण्याचा ध्यास आहे. त्याने अशाच एका चिंब ऑगस्ट महिन्यात रामगड ला जायचा बेत आखला अणि आमच्यासारखी चार समउत्साही मंडळी लगेच तयार झाली. बारामाही आसने सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस मुळे एकाच दिवसात परत येण्याचे आरक्षण केले . ठरलेल्या दिवशी भल्या पहाटे ठाण्याहून ट्रेन पकडली.

सरसर सरसर आली सर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 02/08/2019 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
सरसर सरसर आली सर ------------------------------------ सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर भरभर भरभर छत्री धर धरू कशी ? सुटलाय वारा छत्री उलटी झाली तर ? सरसर सरसर आली सर लवकर रेनकोट अंगावर घालू कसा ? घालूनही जर आतून सगळा भिजलो तर ? सरसर सरसर आली सर छत्री नको रेनकोट नको धाराच झेलू अंगभर पाऊस होऊ क्षणभर सरसर सरसर आली सर ---------------------------- बिपीन

विळखा -५

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -५ आज आमच्या आईला अति दक्षता विभागातून तिच्यासाठी खास खोलीत (स्पेशल रुम) आणण्यात आले. तिच्या शल्यक्रियेत आणि शल्यक्रियेच्या नंतर काय काय गुंतागुंती होऊ शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. यामुळे काल रात्री सुद्धा मी शांतपणे झोपू शकलो नव्हतो. गेले काही दिवस चिंतेमुळे झोप सुद्धा पहाटे लवकर मोडत असे.आज पहाटे सुद्धा पाच वीस ला जाग आली आणि नंतर झोप लागली नाही ( अन्यथा मी सकाळी साडे सातला फार कष्टाने उठणारा माणूस आहे) सुदैवाने यातील कोणतीही गंभीर गुंतागुंत होता शल्यक्रिया सुरळीत झाली आणि तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे हे पाहून आज मी जास्त शांत पणे हे लिहू शकतो आहे.

युनिटी इज स्ट्रेंथ

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गोपनार.....भामरागड तालुक्यातील १२१ गावांपैकी एक माडिया आदिवासीबहुल गाव. साधारणतः २२०-२५० पर्यंत लोकसंख्या असलेलं गाव. हेमलकसाहून १३ किलोमीटरचा कुठे पक्का तर कुठे कच्चा रस्ता ओलांडला की कुक्कामेटा फाटा येतो. या फाट्याहून डावीकडे साधारणतः ८-९ किलोमीटरची जंगलवाट आहे. वाटेत ३ मोठ-मोठे नाले आहेत. ६ महिने हा रस्ता सुरळीत चालू असतो. पण एकदा का पाऊस पडला की, मग ४-५ महिने कुठलीही दुचाकी जाऊ शकत नाही. कुक्कामेटा गाव ओलांडलं की समोर वाटेत लाहेरी नदीचं एक मोठं पात्रं लागते. ते लाकडी डोंग्याने पार केल्यावर लष्कर गाव येतं. लष्कर हून २.५ किलोमीटर अंतर गाठलं की अखेरीस गोपनार गाव येते.

युगांतर- आरंभ अंताचा भाग 18

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 02/08/2019 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तिनापुरात अंबालिकापुत्र पंडुचा राज्याभिषेक झाला आणि राजगादी सजली. भीष्माचार्य मनातून निश्चिंत झाले. धृतराष्ट्र शूरत्वाचं, पांडू धर्माचं आणि विदूर बुद्धीचं प्रतिक! पंडु आणि धृतराष्ट्राचे बंधुत्व त्यांच्यात कोणाला द्वेष पसरवायला जागाच देत नव्हते. दासीपुत्र विदूरची निष्ठा पाहून दोघांच्या मनात त्याच्या बद्दलही आदर वाढला होता. न्यायदानाच्या वेळी पंडु आधी विदुराचा सल्ला ऐकायचा. अंधत्व ही एक बाधा नसती तर धृतराष्ट्र जेष्ठ भाऊ असल्याच्या अधिकाराने त्यालाच राजगादी प्राप्त झाली असती, असं राहून राहून अंबिकेला वाटायचं. 'पंडु राजा म्हणल्यावर त्याच्याशी विवाह करायला कोणतीही राजकन्या होकार देईल.