Skip to main content

पाभेचा चहा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/09/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

प्रेमाची लांबी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 24/09/2019 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची लांबी -------------- नवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच वाटेल. तिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती . एके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर ! ती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं !” तो हसत म्हणाला, “अस्सं ?

आमार कोलकाता - भाग २

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 24/09/2019 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

लघुकथा- परी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 23/09/2019 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
------------------------ लघुकथा- परी ----------------------- त्या चिमुरड्याने शेजारी नवीन रहायला आलेल्या चिमुरडीला घरी बोलावलं . खेळायला . पोरगी भलतीच गोड होती. एखादी परी ? … त्याच्या घरात काचेच्या हंडीमध्ये मासे होते. रंगीबेरंगी ,चमकणारे, गप्पी मासे. तिला गम्मत वाटली . गालावर हात ठेऊन ती आश्चर्याने म्ह्णाली ,” अय्या !फिश!” मग तिने मोजायची सुरुवात केली.” एक दोन तीन चाल .ए, चाल माशे आहेत .” “नाही गं ! पाच माशे आहेत.” “नाही ले, चालच आहेत.” “तुला माइती का मला माइती? माजे माशे आहेत ! तू मोजायला चुकतीये.” त्यावरून दोघे भांडले .ती परी गेली घरी.

अक्कलकोट मठ आणि संस्थान

लेखक कंजूस यांनी सोमवार, 23/09/2019 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कलकोट काय आहे बघू म्हणून प्रथमच गेलो होतो. भरपूर पाऊस असल्याने गाड्या वेळेवर जातील का शंका होती. बऱ्याच जणांनी सोलापुरला रेल्वेने जाऊन पुढे बसने जा असा सल्ला दिला. अक्कलकोट रोड नावाचे स्टेशनही आहे आणि तिथे जाण्यायेण्याच्या वेळा ( १० वाजता सकाळी. चेन्नई मेल, उद्यान एक्सप्रेस) चांगल्या वाटल्याने तीच तिकिटं काढली. सध्या तमिळनाडूत तीव्र पाणी टंचाई आणि इतर ठिकाणी फार पाऊस यामुळे गाड्यांची तिकिटं सहज मिळाली. जाण्याचे पर्याय - अ) अक्कलकोट स्टेशन मार्गे. अक्कलकोट स्टेशनला डावीकडे बाहेर (मुंबईकडून येताना) पडल्यावर बस् स्टॉप आहे. कर्नाटकच्या बसेसही असतात.

एका रम्य पहाटे

लेखक मालविका यांनी सोमवार, 23/09/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
एका रम्य पहाटे फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त पुण्याला जाणे झाले. चिपळूण पुणे अंतर २०० किमी आहे. एकदा दिवसात पुण्यात जाऊन परत यायचं असा प्लॅन ठरला. त्यामुळे पहाटे ४ला चिपळूणहुन निघालो. माझे दोन भाऊ विवेक दादा आणि सुमंता, मी आणि श्रीनिवास असे चौघे जण प्रवासात एकत्र होतो. (त्यावेळी कुंभार्ली घाटाची अवस्था बरी होती) पण पाटण ते उंब्रज रस्ता मात्र वाईट याच अवस्थेत होता. त्यामुळे सुमंता आणि विवेकदादाने एका नवीन रस्त्याने जाऊया म्हणून सुचवले. 'आम्हाला काय ?

प्रभातरंग (आमची रविवार सकाळ)

लेखक अमर विश्वास यांनी सोमवार, 23/09/2019 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभातरंग (आमची रविवार सकाळ) काल सकाळी प्रभातरंग कार्यक्रम पहिला / ऐकला. (प्रभातरंग सकाळीच असतो याची नोंद घ्यावी) कार्यक्रमाची वेळ होती सकाळी साडेसहाची.. रविवार पहाट ... आत्तापर्यंत च्या अनुभवावरून बरोब्बर ७. १० ला पोचलो.. पोचल्याबरोरबर कुठे जागा रिकामी आहे यावर एक सराईत नजर फिरवत असतानाच कानावर शब्द पडले कार्यक्रमाची सुरवात करतो .... वेळेवर आल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटली (इथे पुन्हा तीच स्वतःची पाठ थोपटणारी बाहुली (स्मायली)अपेक्षित आहे .. पण सापडत नाहीये) साबीरभाई स्वतः च बोलत होते .. उस्ताद साबीर ख़ान साहेबांची सारंगी .. साथीला प्रशांत पांडव. पटकन एक खुर्ची पकडली.

ऑब्जेक्षनेबल..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/09/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो. आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?! पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्‍यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे.