लघुकथा- परी

बिपीन सुरेश सांगळे जनातलं, मनातलं
------------------------ लघुकथा- परी ----------------------- त्या चिमुरड्याने शेजारी नवीन रहायला आलेल्या चिमुरडीला घरी बोलावलं . खेळायला . पोरगी भलतीच गोड होती. एखादी परी ? … त्याच्या घरात काचेच्या हंडीमध्ये मासे होते. रंगीबेरंगी ,चमकणारे, गप्पी मासे. तिला गम्मत वाटली . गालावर हात ठेऊन ती आश्चर्याने म्ह्णाली ,” अय्या !फिश!” मग तिने मोजायची सुरुवात केली.” एक दोन तीन चाल .ए, चाल माशे आहेत .” “नाही गं ! पाच माशे आहेत.” “नाही ले, चालच आहेत.” “तुला माइती का मला माइती? माजे माशे आहेत ! तू मोजायला चुकतीये.” त्यावरून दोघे भांडले .ती परी गेली घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला .सवयीप्रमाणे माशांकडे गेला .हंडीत चार मासे मजेत फिरत होते. पाचवा- तळाशी पांढरं पोट वर करून निपचित पडला होता.
वर्गीकरण

11 टिप्पण्या 5,173 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

वकील साहेब नवीन

परीच्या निरागस नजरेने तरंगणारे तेव्हडेच मासे मोजलेत. आणि एक गट्टी होता होता राहिली. छान. बाकी बिपिनराव बालकथा छान लिहितात तुम्ही. या अगोदरच्या हि सर्व कथा छानच होत्या. त्यात पहिला प्रवास आणि काळा वाघ या माझ्या मुलीला विशेष आवडलेल्या कथा.

बिपीन सुरेश सांगळे नवीन

वकील साहेब नमस्कार आणि धन्यवाद मी हि मुलांची कथा पण मोठ्यांसाठी लिहिलेली आहे . याचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेळ्या प्रकारे लावला आहे . वाचकांचे हे स्वातंत्र्य मी मान्य करतो मी लिहिलेल्या इतर मोठ्यांच्या कथा वाचल्या आहेत का ? "त्यात पहिला प्रवास आणि काळा वाघ या माझ्या मुलीला विशेष आवडलेल्या कथा."- बरं वाटलं वाचून पुन्हा एकदा आभार कळावे

बिपीन सुरेश सांगळे नवीन

जॉन आभार ही अगदी मोजून शशक आहे पण समजा शत शब्दापेक्षा जास्त असेल तर लघु कथा म्हणायला हरकत नसावी कळावे धन्यवाद

जॉनविक्क नवीन

मी हि मुलांची कथा पण मोठ्यांसाठी लिहिलेली आहे . याचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेळ्या प्रकारे लावला आहे . वाचकांचे हे स्वातंत्र्य मी मान्य करतो
हम्म. आपणही मुले काय करतात एकमेकांशी एखाद्या घटनेबाबत कशी वागतात हे बघता बघता त्याचे मोठ्यांच्या अनुशँगाने अन्वयार्थ लावून योग्य आयोग्याची समज मुलांना देत असतो. त्यामुळे नाण्याला नेहमी दोन बाजू असतातच हेच अधोरेखित होते.