अक्कलकोट काय आहे बघू म्हणून प्रथमच गेलो होतो. भरपूर पाऊस असल्याने गाड्या वेळेवर जातील का शंका होती.
बऱ्याच जणांनी सोलापुरला रेल्वेने जाऊन पुढे बसने जा असा सल्ला दिला. अक्कलकोट रोड नावाचे स्टेशनही आहे आणि तिथे जाण्यायेण्याच्या वेळा ( १० वाजता सकाळी. चेन्नई मेल, उद्यान एक्सप्रेस) चांगल्या वाटल्याने तीच तिकिटं काढली. सध्या तमिळनाडूत तीव्र पाणी टंचाई आणि इतर ठिकाणी फार पाऊस यामुळे गाड्यांची तिकिटं सहज मिळाली.
जाण्याचे पर्याय -
अ) अक्कलकोट स्टेशन मार्गे.
अक्कलकोट स्टेशनला डावीकडे बाहेर (मुंबईकडून येताना) पडल्यावर बस् स्टॉप आहे. कर्नाटकच्या बसेसही असतात. या बसेस मुख्य बस स्ट्ँडला जातात.(१२ किमि) . गावात शिरताना राजेराय मठ स्टॉपपासून उजवीकडे नवीन गाणगापूर रोडवर दीड किमिवर 'स्वामी मंदीर' स्टॉप आहे. बस स्टँडवरून परत रिक्षाने स्वामी मंदीरला यावे लागते.
सिक्स सीटर ओटो असतात त्या स्टेशनवरून थेट स्वामी मंदीर'ला सोडतात (३०/-)
ब) सोलापूर मार्गे -
सोलापूर स्टेशनला सर्वच एक्सप्रेस ट्रेनस थांबतात. तिथून बसने अक्कलकोट बस स्टँड ३५ किमि. काही बसेस पुढे स्वामी मंदीरपर्यंत येतात. येथून तुळजापुरलाही जातात.
क) गाणगापूर -
अक्कलकोट बस स्टँड - स्वामी मंदीर - मैंदर्गी -अफजलपूर -गाणगापूर (५० किमि) कर्नाटक बसेस आहेत भरपूर.
--------------------
अक्कलकोट गावातली स्थळे -
स्वामींशी संबंधीत -
१) समाधी मठ
हा बस स्टँडमागेच आहे. दाट वस्तीत आहे. पार्किंगला फारशी जागा नाही. चोळप्पा शिष्याकडे आलेला.
२) गुरुमंदीर
बाळप्पा नावाच्या शिष्याकडे आलेला. हा वाडा पाहण्यासारखा आहे. स्वामी मंदीरापुढे फतेहसिंग चौकाच्या उजवीकडे भारत बोळात.
३) स्वामी मंदीर / वटवृक्ष स्वामी मंदीर
मुख्य मठ म्हणतात. याच्यासमोरच अन्नछत्र मंडळ परिसर आहे तो जन्मेजय राजे भोसले यांनी प्रस्थापित केला.
४) राजेराय मठ
या नावाचे एक वतनदार होते हैदराबाद संस्थानात. त्यांनी बांधला. भक्त निवास आतच आहे.
५) बेलानाथ मठ
क्र ४च्या समोरच आहे.
( या सर्व ठिकाणी फोटोग्राफी बंदी आहे.)
६) अक्कलकोट संस्थानाच्या इमारती
- जुना राजवाडा,किल्ला. यात कॉलेज आहे.
-नवा राजवाडा. यातली एक खोली पाहता येते. त्यात हत्यारे ठेवली आहेत. खरंतर सर्वच वाडा दाखवायला हवा.
भोसल्यांचे एक वंशज यांचे अक्कलकोट वतन. अर्धे गाव यांच्या मालकीचे आहे. आता कुणी राहात नाहीत इथे. पुण्यात राहतात.
७)वाडे
जुन्या पद्धतीचे वाडे आणि बोळ.
सर्व दोन किमिटरांत आहेत. रिक्षा, बस भरपूर.
काही अनुभुती येण्याइतकी माझी प्रगती नाही परंतू राजवाडे फारच आवडले.
गेली तीन वर्षे इथे धरण भरेल असा पाऊस झाला नाही. कुठून लांबून ट्यांकरने पाणी येते.
फोटो १
नकाशा . सोलापूर, अक्कलकोट,गाणगापूर.
फोटो २
बस वेळापत्रक, अक्कलकोट बस स्टँड.
फोटो ३
श्री वटवृक्ष स्वामी मंदीर - जुना राजवाडा - नवीन राजवाडा - अक्कलकोट बस स्टँड मार्ग. नकाशा.
________________________
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात
महाप्रसाद भवन,( महाप्रसाद दुपारी १२-३, ८-९:३०, नि:शुल्क),
दोन नाश्ता हॉटेल्स खासगी,
यात्री निवास,( एकट्यासाठी आणि गटासाठी.३००/-),
यात्री भुवन,( रुम दोघांसाठी शुल्क ८००/-),
अतिथी निवास,
गणेश मंदीर,
शिवशिल्प प्रदर्शन,
जिम,
लहान मुलांसाठी बालवाटिका ( मंगळ - बुधवार बंद),
बसेस आणि कारसाठी पार्किंग.
फोटो ४
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ
फोटो ५
नवीन राजवाडा_१. प्रवेशद्वार.
फोटो ६
नवीन राजवाडा_२
फोटो ७
नवीन राजवाडा_३
फोटो ८
जुना राजवाडा_१. एक दरवाजा.
फोटो ९
बुरुज, जुना राजवाडा_२.
फोटो १०
बालवाटिकेतले प्राणी_१
फोटो ११
बालवाटिकेतले प्राणी_२
फोटो १२
बालवाटिकेतले प्राणी_३, फुलपाखरु
फोटो १३
विठ्ठल मंदीर
फोटो १४
नवीन राजवाडा_४
--------------
सेवा आणि देणगीसाठी
फोटो १५
फोटो १६
(( १८ - १९ सप्टेंबर २०१९ ( भाद्रपद कृष्ण चतुर्थी पंचमी, शके १९४१, मंगळवार - बुधवार.) यावेळची गोळा केलेली माहिती यावर आधारित लेखन. चुका दुरुस्ती, सूचनांचे स्वागत. ))
वाचने
17200
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त भटकंती करता कंकाका.
व्वा...!
मस्त भटकंती
थोड्याबहुत शुद्धलेखनाच्या
६) अटलकोट संस्थानाच्या इमारती
करतो बदल.
+1
अन्न छत्र १नंबर
हेच सांगायचं होतं
In reply to अन्न छत्र १नंबर by Rajesh188
बरोबर आहे
In reply to हेच सांगायचं होतं by अरिंजय
लहानपणी सारखे जाणे व्हायचे.
शेजारचे आमच्याबरोबरच बस
In reply to लहानपणी सारखे जाणे व्हायचे. by कोमल
खुपच छान आणि उपयोगी माहिती.
अक्कलकोट येथे माँनसिक आजार बरे होतात असे ऐकून आहे
अवांतर शब्द टाकल्याबद्दल
In reply to अक्कलकोट येथे माँनसिक आजार बरे होतात असे ऐकून आहे by जॉनविक्क
ते गाणगापूर ला
गाणगापूरला बाधा उतरवतात
In reply to ते गाणगापूर ला by Rajesh188
ते गाणगापूर ला
तुम्ही का नाही एकदा
In reply to ते गाणगापूर ला by Rajesh188
आधी अक्कलकोट ट्राय करायला हवे
In reply to तुम्ही का नाही एकदा by प्रसाद_१९८२
भूत चढतंच कसं?
सरसर...सर्सर
In reply to भूत चढतंच कसं? by सुबोध खरे
॥श्री स्वामी समर्थ॥