Skip to main content

तिखट कडकणी by Namrata's CookBook : १७

लेखक Namokar यांनी शुक्रवार, 04/10/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस : १ वाटी मैदा १ वाटी बेसन पीठ २ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता) मीठ तेल पाणी जिरे ओवा क्रमवार पाककृती: १. एका भांड्यात /परातमध्ये १ वाटी मैदा , १ चमचा रवा / सूजी घ्या आणि चवीनुसार मीठ घालून , आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या. २. आता थोडेसे तेल घेऊन पुन्हा कणीक मळून घ्या.

दो डोळ्यांचे....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/10/2019 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

InShort 4 – घड्याळांचा दवाखाना (शॉर्ट-फिल्म)

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 04/10/2019 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा 'टीनेजर' असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्‍या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्‍या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्‍या त्याच्या बापाची.

मी अजिबात घाबरत नाही....! - २

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 04/10/2019 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू. तुर्तास महत्वाचे हे, की ती माझी सवय बनली आहे..... (की व्यसन?) तिला पाहिले नाही की रात्री निद्रादेवी सुद्धा माझ्यावर प्रसन्न होत नाहीत.

आमार कोलकाता - भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 03/10/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

धो धो धो की भं भं भं (भाग २)

लेखक राजे १०७ यांनी मंगळवार, 01/10/2019 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
राजपुत्र आणि प्रधानपुत्र तळ्यातील पायऱ्या उतरून खाली गेले. सावधपणे सोनेरी महालात प्रवेश केला. महाल अतिशय सुंदर होता. पुढे पुढे जात एका दालनात ती सौंदर्यवती त्यांना दिसली. त्यांना पाहून ती घाबरून म्हणाली तुम्ही दोघे इथे कशाला आला? तो येईल आणि तुम्हाला मारुन टाकील. लवकर लवकर येथून जा. राजपुत्र म्हणाला तो कोण? ती म्हणाली तो म्हणजे राक्षस. दिवसा राक्षस आणि रात्री नाग बनून बाहेर जातो. राजपुत्रानं तिला सांगितले की काळजीचे कारण नाही, माझ्या या शूर मित्रानं त्याला खलास केले आहे. हे ऐकून ती तरूणी आश्वस्त झाली. मग तीने तिला राक्षसाने पळवून आणले असं सांगितलं. ती सुद्धा एक राजकन्या होती.

अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/10/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का? या कार्यक्रम शरण समाजात माणूस संपला तरी कार्यक्रम चुकत नाहीत. दु:ख आवरून कंबर खोचून कार्यक्रम साजरे करायचे असतात. नाहीतर लोक काय म्हणतील! याला मुळी प्रेमच नव्हतं. म्हणून कार्यक्रम करत नाही. माणूस वारला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका - २०१९

लेखक उपेक्षित यांनी मंगळवार, 01/10/2019 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा. तर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. सध्या भाजपची सगळीकडे घौडदौड चालू आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या अपेक्षेपेक्षा तो किती मोठ्ठा विजय मिळवतो हे पाहणे रंजक ठरेल. अगदी कालपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना युती होणार का ? हे विचारले जात होते. स्वतः अमित शहा आणि पप्र.

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 30/09/2019 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.