Skip to main content

InShort 5 – Printed Rainbow (शॉर्ट-फिल्म)

लेखक मनिष यांनी बुधवार, 23/10/2019 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय अ‍ॅनिमेशन मुळातच फार प्रचलित नाही, त्यातही अ‍ॅनिमेशन बनवलेच तर ते मुलांसाठीच असते असा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. त्यात प्रौढांसाठी अ‍ॅनिमेशन बनवणे, तेही २००६ च्या सुमारास किती अवघड असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 22/10/2019 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६

बिबट्याशी सामना

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 21/10/2019 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा खास दिवाळी सुट्टीनिमित्त -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- बिबट्याशी सामना ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- “हॅलो नीलम, मी मुग्धा बोलतेय,” 'शी ! हिचा फोन आता रात्री कशाला ?’ नीलमला वाटलं . ती ट्रीपची तयारी करत होती. तरीही ती म्हणाली, “बोल गं.” “ अगं, आमच्या मासिकाला पहिलं बक्षीस मिळालंय !” “ अरे वा !

कोकणी वडे

लेखक मनीमोहोर यांनी सोमवार, 21/10/2019 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात. कोकणात आमच्याकडे कोणत्याहि शुभ कार्याला, कुळाचाराला, तसेच श्रद्धपक्षादि विधींना हे वडे लागतातच. कोकणातला पदार्थ असल्याने नॅचरली ह्यात मुख्यत्वे तांदुळच असतात.

'तंबोरा' एक जीवलग - ७

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी सोमवार, 21/10/2019 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
गंडाबंधन झाल्यावर शिक्षणाला सुरुवात झाली हे मागच्या भागात लिहिलंच आहे. खां साहेबांनी पहिला राग शिकवायला घेतला तो भैरव. संपूर्ण; म्हणजे सगळ्या सुरांचा राग. सप्तकातले सगळे सुर येतात यात. भैरव म्हणजे शंकर. खाली येताना हलणार्‍या धैवताचा गोडवा अत्यंत गोड लागतो. रागाची प्रकृती धीरगंभीर. पहाटेच्या वेळची मऊ मृदु कोवळीक आणि शिवाच्या डमरूचा, शंखाचा धीर गंभीर नाद याच मिश्रण आहे या रागात. रागाचा आवाका मोठाच आहे तसा पण लगेच ओळखता येतो. खां साहेबांच्याकडे शिकण्यापूर्वी आईकडे तसे जुजबी शिक्षण झालं होतं माझं. खां साहेबांनी शिकवायला काढला तेंव्हा 'भैरव' म्हणून ओळखला होता मी, पण बोलले मात्र नाही.

मतदान करा बे 

लेखक सौरव जोशी यांनी रविवार, 20/10/2019 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक प्रचार थांबला बुवा एकदाचा.... कोणी ३७०-३७० बोंबलल तर कोणी पावसात भिजलं, कोणी नकला करून दाखवल्या तर कोणी शकला लढवून दाखवल्या. तस neutral राहून बघितलं तर सर्व पक्षांनी बौद्धिक दिवाळखोरीच दाखवलीय. चला या सर्व पक्षांनी दाखवलेल्या प्रगल्भ विचारसरणीची लख्तर काढू.

गंमत घ्यावी..‌

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 19/10/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते, चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके. करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी. काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी.. कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल. हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल. फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल .. त्या पानाचा भार केवढा??
काव्यरस

निसर्ग-शशक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 19/10/2019 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग --------------------------------------------------------------------------------------------------------------- प्रसन्न सकाळ आहे. हवाही आल्हाददायक. बोराच्या झाडावर साळुंक्या बसल्या आहेत. त्या जोडीचा किलबिलाट चालू आहे . पलीकडच्या झुडपांवर छोटी पिवळी फुलपाखरं उडत आहेत. मध्येच हवेची झुळूक येतीये . पानं डोलत आहेत. झाडावर सरडा कळून येत नाहीये. दिवस पावसाचे पण पाऊस नाहीये. मलाही छान वाटतंय ! चहाच्या टपरीपाशी पोरापोरींची गर्दी आहे.

सायकल दौरा पूर्वेचा घाट - अंतिम भाग

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 19/10/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग सायकल दौरा पूर्वेचा घाट - का कसा कुठे? सायकल दौरा - पूर्वेचा घाट असा घातला घाट १, , आणि Araku अराकु डोंगरांच्या मधे वसलेले छोटेस शहर, आंध्र प्रदेशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, आंध्र आणि तेलंगाणा भागातले महत्वाचे हिल स्टेशन अराकुची अशी कितीतरी ओळख देता येईल.