दोसतार - २६
मागील दुवा http://misalpav.com/node/45761#comment-1054834
पावसाची ना कशी गम्मत असते. अगोदर येतो तो त्याच्या येण्याची जहीरात करत. दवंडी पिटत. एकदम गडगडाट करत विजा चमकवत. तडाम तडाम ताशा वाजवत. आपल्याला डोळे झाकून कोणीतरी भॉ करावे तसा. अचानक गाठतो. रस्त्यावरून चालणाराला भिजवून टाकतो. शिवाजी महाराजानी कारतालब खानाला खिंडीत गाठला तसा. पावसाळा तसा सगळाच आवडतो. पण खास आवडतो तो पहिला पाऊस. पाटणची आज्जी तर मुद्दाम या पहिल्या पावसाची वाट पहायची. पहिला पाऊस आला की ती एकदम खुशीत यायची. खरे तर तीला पावसात भिजायचे असे.
मिसळपाव