Skip to main content

सखी शेजारिणी तू खात राहा..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/12/2019 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक शेजारीण होती. म्हणजे ती आहे अजून,पण माझ्या शेजारी ती आता नाही. माझी शेजारीण जेव्हा माझ्या शेजारी राहायची तेव्हा माझ्या घरी सारखी यायची. गप्पा मारायला. येताना घरातलं काम घेऊन यायची. भाजी निवडणे, बिरड्या सोलणे, कपड्यांची दुरुस्ती असं काहीतरी. प्रचंड बडबडी, मन लावून टीव्ही पाहणारी. लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके केळ्याच्या सालीवरुन पाय घसरुन पडला किंवा अर्धी चड्डी घालून आला तरी डोळ्यांत पाणी येईपर्यंत खळखळून हसणारी. आत्ताही एका टीव्ही शोमधे, शो बघायला आलेले सेलिब्रिटी प्रेक्षक इतके हसतात, इतके हसतात की खुर्चीवरुन खाली पडतात.

तो, ती आणि ते

लेखक Rohini Mansukh यांनी रविवार, 22/12/2019 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने म्हटले 'तू वाटशी चंद्र मजला' तिने ऐकले 'चेहऱ्यावर डाग कसला' त्यांना वाटले 'आता हा फसला' तिने म्हटले 'थांब ना जरा' त्याने ऐकले 'आयता सापडलास बरा' त्यांना वाटले 'हा नेहमीचाच नखरा' त्यांनी म्हटले 'आगळी तुमची प्रीत' त्याने ऐकले 'कोण हार कोण जीत' तिला वाटले 'वेगळी जगाची रीत' - सौ. रोहिणी मनसुख
काव्यरस

विशाळगडावरील पीर बाबा

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 22/12/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.

हजरत पीर मलिक रहान बाबा

लढा पावनखिंडीचा यातील भाग ७ मिपावर सादर करायला मुक्त विहारींनी सुचवल्यावर तो लवकरच सादर करत आहे. त्यात विशाळगड सध्या कसा दिसतो याची अंदाज यायला सोबतची फीत सादर आहे. गड चढताना आता जरी पूल बांधल्यामुळे येता यायला सोईचे झाले तरी समोरच्या बसेस पार्किंगच्या माथ्यावरून दरीत उतरून विशाळगडाच्या चढाला सुरवात होते. ऐतिहासिक काळात सुर्वे- दळवी यांच्या सैन्याचा तळ त्या पार्किंग भागात होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्याला भिडायला दरीत उतरून यावे लागले. भाग ७ मधे महाराजांनी ते कसे घडवले ते वाचा. फितीत शेवटी एक नव्याने बांधलेला बुरुज दिसतो.

खोळ

लेखक ए ए वाघमारे यांनी रविवार, 22/12/2019 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
‘एकाच जागी ठोंब्यासारखं बसून राहणं म्हणजे काय, हे आपल्याशिवाय अधिक चांगलं कोण सांगणार?’, रोजसारखा आजही भुकोबाच्या मनात हाच विचार आला. उन्हं कलली. सायंकाळ झाली. पण भुकोबाच्या घरात सांजवात लावायला अजून कोणी आलं नव्हतं. वारा सुटला तसं भुकोबा ज्या कडुनिंबाच्या खाली बसला होता, त्याची पानं सळसळली. काही गळून तरंगत खाली आली. डोक्यावरच्या छोट्याश्या कळसावर त्यातली एक दोन पानं पडल्याचा आवाज खसखसला. ‘पानगळ अजून सुरूच आहे. अशा किती पानगळी झाल्या आतापर्यंत? कुणी मोजल्या? या एवढ्याश्या घरात हा इतकुसा झरोका. यातनं काय कळणार?

उडु - उडी उड्डाण ते पाणी आणि वनस्पती नाम

लेखक माहितगार यांनी शनिवार, 21/12/2019 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रीय गुढी परंपरेच्या अभ्यासाच्या निमीत्ताने प्राचीन काठीपुजांच्या दुव्यांचा अधून मधून धांडोळा घेत असतो. गुढी या शब्दाचा मुळ अर्थ काठी कसा आहे आणि कुडी शब्दाशी असलेला संबंध मी माझ्या मागील गुढी उभारनी या लेखाच्या माध्यमातून करुन दिला होता. कर्नाटक आणि ओडीशा या दोन्ही ठिकाणी मंदिर आणि देवालयांसाठी 'गुढी' शब्द बर्‍यापैकी प्रचलीत आहे. याचा अर्थ दगड वीटांच्या मंदिरांचा विकास होण्यापुर्वी उघड्यावर दिसणारे सर्व साधारण दगड , वृक्ष तसेच काठी यांची पुजा होत असणार.

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/12/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

(पप्पूबाळा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 21/12/2019 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थातच स्वतःची अक्कल इवलीशी दुसऱ्याकडे ही असे थोडीशी हे मान्यच नाही तयासी काय म्हणावे या वृत्तीसी पप्पूबाळा मम्मा मॅडम मुग गिळीती बडवून कापाळास घेती पाहूनी तव मंदमती जी तुझ्या खानदानाची महती पप्पूबाळा कैसी खांग्रेसची प्रगती कैसा खांग्रेसचा नाश केवळ असे दैवदूर्विलास त्याचे दु:ख असे कोणास? पप्पूबाळा दुराग्रही,अहंकार ग्रस्त जनतेस करुनी त्रस्त ज्ञान स्वतःचे पाजळतोस का विदुषकासम वागतोस?

पनीर स्ट्फ्ड ब्रुसेल स्प्राउट्स

लेखक यश राज यांनी शनिवार, 21/12/2019 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या नाताळाचा हंगाम असल्याकारणाने इकडे बाजारात वेगळाच उत्साह दिसतोय, वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरु आहे. नाताळ हा ख्रिस्ति लोकांचा मोठा सण, या दिवशी कुटूंबातील सर्व लोक एकत्र येतात, प्रार्थना करतात व एकत्र जेवण करतात. माझा ब्रिटिश सहकारी मला सांगत होता की येथील लोक सहसा रोज स्वयंपाक करत नाहीत तर तयार पदार्थ खातात मात्र नाताळच्या दिवशी हमखास सर्व जेवण घरीच बनवतात. या जेवणामध्ये उकड्लेल्या भाज्यांसोबत ब्रुसेल्स स्प्राउट्सचा समावेश असतोच असतो. ब्रुसेल्स स्प्राउट्स साधारणतः कोबीवंशीय भाजी आहे.

स्वामीराया

लेखक शब्दांगी यांनी शुक्रवार, 20/12/2019 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचे असे पसाभर (ज्ञान) दुसऱ्याचे असे मूठभर तरी नसे मान्य त्यासी काय म्हणावे या वृत्ती स्वामीराया आदिमाया आदिशक्ती हसतसे कैलासी पाहूनी मानवाची मति असे सर्व मायेची महती स्वामीराया कैसी प्रपंच्याची प्रगती कैसा प्रपंच्याचा नाश केवळ असे मायापाष त्याचे कैसे सुख- दु:ख स्वामीराया दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय स्वामीराया जैसे राजहंसाच्या वंशी क्षीर तितुके प्राशुनी उदक सांडूनिया देती आम्हा तैसेची वागवी स्वामीराया आध्यात्म असे गू