Skip to main content

निर्ढावलेपणाचा प्रवास

लेखक सर टोबी यांनी शनिवार, 08/02/2020 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आपण सर्वच काही ना काही गोष्टींना निर्ढावलेले असतो किंवा हळू हळू आपण त्या गोष्टींशी जमवून घ्यायला सुरुवात करतो. आपल्यातले काही जण तर सर्वसाधारण जाणीवांच्यापलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ झालेले असतात. हॉस्पिटलमध्ये काम करणारा स्टाफ हा पेशंटच्या वेदना आणि अडचणी यांनी फारसा बाधित न होता आपले काम आणि आपले जीवन व्यवस्थित जगायला शिकतो. ज्या गोष्टींमुळे सामान्य माणसं हलून जातात तिथे हि माणसं निर्विकारपणे आपलं काम करीत राहतात. आणि असं निर्विकार होणं हे आवश्यक पण असते. पण आपल्यातले बऱ्याच उदारमतवादिनीं काही काळ का होईना गेल्या काही वर्षात मोठे भावनात्मक आव्हान पेलले असण्याची शक्यता आहे.

शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग १

लेखक AKSHAY NAIK यांनी शनिवार, 08/02/2020 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी नुकतेच खूप वर्षांनी शेगावला जाण्याचा अचानक योग आला तो अनुभव आपल्यासोबत share करीत आहे. प्रवास वर्णनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जाणकार मिपाकरांनी चूकभूल दुरुस्त करावी. ३१/०१ /२०२० रोजी लातूर हून पहाटे ६ वाजता औरंगाबाद ला एका लग्नसमारंभात उपस्थित राहण्यासाठी निघालो. लातूर ते औरंगाबाद रस्ता ठीकठाक असल्यामुळे प्रवासाचा काही विशेष थकवा जाणवला नाही. ११ वाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद ला पोहचलो.

महाभारत प्रवचन माला - मंगला ओक

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 06/02/2020 20:54 या दिवशी प्रकाशित केले.

महाभारत प्रवचन माला ब्लॉग १ब्लॉग२

मंगला ओक यांचा परिचय आपणांस अंधारछाया या कादंबरीतून झालेला आहे. त्यांच्या नंतरच्या जीवनातील पुण्यातील वास्तव्यात मी व माझी बहीण *सुनीता ओक उर्फ नंदा करमरकर यांनी आईला आग्रह करून तिच्या स्मृती व्याख्यान रुपात नोंद करून ठेवल्या. आमच्या विनंतीला मान देऊन आईने तिच्या जवळील मोबाईलवर या प्रवचनांचे रेकॉर्डिंग तिचे तिनेच केले.

कान्हा अभयअरण्य अनुभव\ माहिती हवी आहे

लेखक नानुअण्णा यांनी बुधवार, 05/02/2020 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा अभयअरण्याला भेट देण्याचा विचार आहे, एप्रिल महिन्यादरम्यान, अनुभव असेल तर, प्रतिक्रिया द्या, धन्यवाद

एका उदास संध्याकाळी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/02/2020 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी || - पाषाणभेद ०५/०२/२०२०

भाग १७ - कादंबरीतील व्यक्तींचा, स्थानांचा चित्रमय परिचय

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 05/02/2020 19:28 या दिवशी प्रकाशित केले.

• चित्रमय परिचय

 Figure 1माधवनगरचा गुरूवार पेठेतला आमचा त्या वेळचा बंगला व बागेचा भाग. जिथे हे नाट्य घडले. बागेचे कालांतराने रिंग टेनिसचे कोर्ट बनले होते. शशी मोठा झाल्यावर आपल्या मित्रांसह तिथे खेळताना...  Figure 2 त्याच जागेतील नव्या बंगल्याचे रूप  Figure 3 प्रज्ञानानंद सरस्वती - आई व वडिलांचे गुरू.

एक उनाड भटकंती भाग ३ (शेवट)

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 05/02/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक उनाड भटकंती सुरुवात एक उनाड भटकंती भाग 2

     आता थोडा या गुफांचा इतिहास सांगते. 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या संस्कृत नावापासून झाला आहे. लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ.स. १७३ - इ.स. २११) कोरली गेली असावी असा अंदाज आहे.

ग्रंथ परिचय - या सम हा. लेखक - मेजर जनरल शशिकांत पित्रे

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 05/02/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.

या सम हा - ग्रंथ परिचय

बाह्यांग परिचय - मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावाच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे. ३३५ पाने असलेल्या या ग्रंथावर संपादकीय हात फिरवण्याचे काम आनंद हर्डीकर यांनी केले आहे. भूमिका स्पष्ट करताना मेजर जनरल शशिकांत पित्रे म्हणतात,...

(डबा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 05/02/2020 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थातच

(डबा)

आज पहाटे तो लवकर उठला डबा उचलून धावत सूटला लायनीताल्या लोकांना ढकलून दिले दार जोराने बडवले आताल्याला लवकर बाहेर बोलावले जराही वेळ नाही असे सांगितले आतले प्रकरण कुल वाटले हालचालीच्या आवाजावरून मंद भासले मनोमन स्वप्न रचले वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे "अरे बाबा सावकाश आवर , होल वावर इज आवर" आजची कथा अशी झाली ज्याची बीजे त्याने कालच पेरली काल त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे

डबा

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 05/02/2020 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे लवकर उठले डब्यासाठी खास जिन्नस ठरवले साजुक तुपात रव्यास भाजले शिऱ्यात काजू बेदाणे घातले मऊसूत पराठे भाजले चमचमीत भरले वांगे केले आमटी आणि भातही भरले चवीला चटणी, कोशिंबीर दिले आणि मनोमन स्वप्न रचले वाटे आज तरी त्याने म्हणावे "वा काय बेत होता, आजचा डबा छानच होता." ही झाली तिची बाजू आता जरा त्याच्याकडे पाहू त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे पण या डब्याचे काय करावे? हां!
काव्यरस