Skip to main content

घे भरारी..

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 13/05/2020 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
घे भरारी.. स्वप्नसुखांचे लेवुन पंख घे भरारी गगनात आभाळ आहे तुझेच परि तु तुझिया मायेला विसरु नको श्वासात घे भरुन तु ती अविरत ऊर्जा त्या भानुची घे भरारी गरुडापरि तु असुदेत एक नजर भूवरी नंदादीप तो जळत राहो तुझ्या इच्छा-आकांक्षाचा निसर्गाचे ते अनमोल देणे तु परतवत रहा त्याला - Dipti Bhagat
काव्यरस
Taxonomy upgrade extras

मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा) 27.10.2019 कराड ते संकेश्वर

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 13/05/2020 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा) 27.10.2019 कराड ते संकेश्वर .* कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली. सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज 75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता. आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते. कराड पार केले आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली.

मैत्री असावी...

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 13/05/2020 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री असावी... मैत्री मैत्री असावी खळखळत्या वाहत्या झऱ्यासारखी रातराणीच्या सुगंधासारखी आसमंतात दरवळणारी मैत्री मैत्री असावी उनाड वाऱ्यासारखी केसाची बट अलगद झुलवणारी मनसोक्त हसणारी हसविणारी संकटसमयी धावुन येणारी मैत्री मैत्री असावी पावसाच्या पहिल्या सरीसारखी सुखाच्या सरींनी चिंब भिजवणारी मैत्री मैत्री असावी पहाटेच्या समीरासारखी गारवा देणारी मैत्री मैत्री असावी उगवतीसारखी नवा आशेचा किरण होऊन आयुष्य तेजोमय कराणारी! - Dipti Bhagat

कथा - टीआरपी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 12/05/2020 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------------------------------- कथा - टीआरपी --------------------------------------------------------------------------------------------- “ सॉरी मॅडम ” ... शरदिनी त्या असिस्टंट डायरेक्टरकडे आश्चर्याने पाहतच राहिली . तिला काही कळलंच नाही. तो पुढे बिचकत म्हणाला , " तुमचा रोल आपण थांबवतोय ." “काय ?” ती चमकली .भडकलीच ! तो गप्प खाली मान घालून, निघून गेला. ती धप्पदिशी त्राण गेल्यासारखी खुर्चीत बसली. रामप्यारे तिच्याकडे पाहत राहिला. नुसताच. पण मनातून तर त्याला बरंच वाटत होतं. तिचे नखरे फार असत. अन मेकअपवरून ती त्याला बोलायची .

नसती आफत !!!

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 12/05/2020 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. ) नसती आफत !!! आबाने अपल्या वयाची आता सत्तर वर्षे पूर्ण केली होती . जन्मभर शेतात काम केले ,एकुलत्या एक मुलाचे शिक्षण करून त्यालाही मोठ्या शहरात नोकरीला लावले . घरात म्हणाल तर आताही दोनच माणसे, एक आबा अन दुसरी त्याची पासष्ठ वर्षे पार केलेली बायको बयाक्का . वृद्धत्वा मुळे व त्यातच त्याला असणारी आनेक व्यसना मुळे, आबाला मधुमेय व उच्चरक्तदाबाचा त्रास अनेक वर्षा पासून होत होता,. आज तर कहरच झाला ,आबा एकदम चक्करच येऊन पडला .

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २

लेखक वेदांग यांनी मंगळवार, 12/05/2020 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध http://www.maayboli.com/node/58713 २ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १ http://www.maayboli.com/node/58938 ========================================= नर्मदे हर काल दमलो असल्यामुळे मस्त झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता उठलो आणि शौचमुखमार्जन करून तयार झालो. सायकली काढून त्यावर खोगीरं चढवली आणि बाहेर येऊन उभे राहिलो. काल श्री. पाटीदारांनी प्रेमाने बजावल्याप्रमाणे आम्ही त्याची वाट बघत होतो. ५ मिनिटात श्री. पाटीदार आले.

उसणं अवसान

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 12/05/2020 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी उसणं अवसान आणून म्हंटल होत. तुझ्यासाठी मी चंद्र तोडून आणीन... चांदण्यांचा गजरा करून तुझ्या केसांत माळीन... पण ते सार अशक्य होत..! अन् तरीही तू, माझ्या सोबत सुखाने संसार केलास... माझ्या प्रत्येक स्वप्नांना तू आकार दिलास... माझ्या सारख्या आणाभाका तू घेतल्या नव्हत्यास. तू फक्त एवढंच म्हंटली होतीस, तुझा हात धरुन मी नेहमीच उभी राहिन... -कौस्तुभ
काव्यरस

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दुसरा) पुणे ते कराड

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी मंगळवार, 12/05/2020 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कराड सायकलिंग 26.10.2019 आज दिवाळीच्या मोठ्या दिवशी पुण्याहून सकाळी पाच वाजता सायकल वारी सुरू करायची होती. सकाळीच सौ प्रतिभाताई नामदेव नलावडेंनी आमचे औक्षण केले. या आदरतिथ्याने भारावून गेलो. जणूकाही छत्रपती शिवरायांचे मावळेच लढाईला निघाले होते. दरवाजापुढे काढलेली रांगोळी आणि दिव्यांनी मन अतिशय प्रसन्न झाले. निघतानाच, सायकल पंचर झाली. लक्ष्मण आणि नामदेव यांनी ताबडतोब नवीन ट्यूब टाकली, तर ती सुद्धा बर्स्ट झाली. माझ्याकडे आणखी ट्यूब नव्हती, म्हणून नामदेवरावांनी त्यांच्या mtb ची ट्यूब दिली. ती ओव्हर साईझ असल्यामुळे हिरेनला विचारून ट्यूब टाकली.

रंग रंग तू, रंगिलासी

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 12/05/2020 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
रंग रंग तू, रंगिलासी दंग दंग तू, दंगलासी भंग भंग तू, भंगलासी वेड्यापिश्या रे जिवा जाशी उगा जीवाशी अव्यक्त बोल रे तुझे शब्दांचे झाले तुला ओझे का धावीशी उगा तू रे कुणी नाही वेड्या रे तुझे तो सूर्य देई एकला शक्ती समिंदराची ओहोटीभरती आकाश झेलते तारे मग का हवे रे , तुला सारे ? का जन्म घेतलासी ? हा डाव साधलासी रंगात रंगुनिया साऱ्या संसार मांडलासी गती मंद होत तुझी जाईल मग हार गळ्याशी येईल अग्नीत दग्ध होई सारे आला तसाच रिता जाशील ऐक साद अंतरात्म्याची शमेल खाज त्या बुडाची घे नाम त्या शिवाचे लाभेल गती तुला मोक्षाची ======================== सिद्धेश्वर विलास पा