Skip to main content

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) ३१.१०.२०१९ सिरा ते बंगलोर

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी रविवार, 24/05/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) ३१.१०.२०१९ सिरा ते बंगलोर सायकलिंग सिराच्या सरकारी गेस्ट हाऊस मधून सकाळी साडेपाचला राईड सुरु झाली. सकाळची सायकलिंग अतिशय आल्हाददायक होती. पूर्व दिशा हळूहळू तांबूस रंगप्रभेने आरक्त होऊ लागली. आकाशांत ढगांचे बागडणे सुरू होते. आज अभिजित आणि दीपक सर्वात पुढे होते. ब्लुटूथ स्पीकरवर सकाळची आवडती गाणी लावून त्यांची रपेट सुरू होती. मागोमाग मी आणि लक्ष्मण मोबाईलवर पहाटेची भक्तीगीते लावून, भक्तिरसात न्हात राईड करत होतो. आमच्या मागे विकास, नामदेव आणि सोपान मार्गक्रमण करत होते. आता सुरू झाला प्रकाश कवडश्यांचा खेळ.

जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 23/05/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत? --श्री मंगेश पाडगावकर मागेच लिहिलं होतं-- एक दिवस दवाखाना बंद ठेवला परंतु रस्त्यावरचे स्वच्छता कर्मचारी साधे पोलीससुद्धा काम करत आहेत पाहून स्वतःची लाज वाटली म्हणून आम्ही (मी आणि बायको) दवाखाना चालू केला. एक दिवसा आड बातमी येते अमुक डॉक्टर तमुक डॉक्टर दिवंगत झाले. त्यातून बायका जास्त तणाव घेतात. त्यामुळे बायको एक दिवसाआड डिप्रेशन मध्ये जाते. तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत.

कोरोनासोबत जगायचे आहे...!

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 23/05/2020 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाउन म्हणायलाच तेवढा राहिलाय. दैनंदिन रूटीन हळूहळू वळणावर येतंय. टीव्ही चॅनल्स चा धोशा आता कुणी फारसा मनावर घेत नाहीयेत. रेल्वे एष्ट्या सुरु झाल्या आणि आतापर्यंत लॉकडाऊन असलेल्या कोरोनाला पाय फुटू लागलेत. आतापर्यंत बंद डब्यात असलेल्या लहानलहान गावांतून कोरोना रूग्ण वाढू लागलेत. आमच्या गावातही ४-५ निघाले. आता तर सगळेच व्यवहार सुरु झालेत. सगळे म्हणतात, खबरदारी घ्या. लहानपणी एकदा एकांच्या घरी गेले होते. तिथे घराच्या चार भिंतींच्या आत, मध- घरात एक मोठे च्या मोठे नागाचे वारूळ होते. होय, घरात !!

पाताळ लोक!

लेखक लई भारी यांनी शनिवार, 23/05/2020 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी सलग एक सिरीज बघता आली. लॉकडाऊन सुरु झाल्यावर कामातून वेळ मिळाल्यावर काही मराठी, हिंदी सिरीज बघून इंग्रजीच बघायच्या असं ठरवलं होत. मग अलीकडे या प्राईम वरच्या सिरीज ची जाहिरात बघितली आणि सुरुवातीची परीक्षणं पण चांगली असल्यामुळे बघायचं ठरवलं. २-३ दिवसात मिळून ९ भाग संपवले(प्रत्येकी ४० मिनिट साधारण). विशेष म्हणजे बॉलिवूड मानसिकता असल्याने अधांतरी शेवट आपल्याला आवडत नाही आणि वेब सिरीज म्हटलं कि पुढच्या भागाची सोय म्हणून एकदम अर्ध्यातच सोडून देतात तो प्रकार इथे नाही आहे. आणि प्रश्नांची‘उत्तर’ तर लागतात आपल्याला; थोडं फार ओपन एंडेड ठीक आहे पण अगदीच डोक्याला शॉट नको होतो.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 23/05/2020 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 23/05/2020 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क.

पाऊसवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 22/05/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थीर घरांच्या ओळी नदीच्या हिरव्या काठी. कुणी धरून बसते ओंजळ पाऊस पडण्यासाठी. पाऊस प्राचीन इथला आकांत केवढा करतो. नदीच्या पैलतीरावर काळ जसा गहीवरतो. काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? -कौस्तुभ

सिम्पल (पा)फाइन ऍपल केक!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/05/2020 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
नाम माहात्म्य..केकामध्ये पाइन एपलला फाइन करून म्हंजे रस करून वापरला आहे.. म्हणून अशे णाव दिले! साहित्य:-मैदा 300 ग्रॅम, पिठीसाखर दीड वाटी(कडक गोड हवे असल्यास अडीच वाटी),बेकिंग पावडर व बेकिंग सोडा 1चहाचा चमचा, 1चिमूट मीठ, अर्धी वाटी सनफ्लॉवर किंवा सोयाबीन तेल,अननस रस अर्धी वाटी, अननस इसेन्स 1चमचा, दूध अर्धी वाटी, आंबट दही 1ते 2चमचे. कृती:- मैदा,पिठीसाखर, बेकिंग सोडा ,बेकिंग पावडर,मीठ हे सर्व "एकत्र करून" मग चाळून घ्यावे.