धन्य (?) ती लेखनकळा!
मी लिहिते. (हे तुम्ही बघता आहातच)..
आत्तापर्यंत बऱ्यापैकी लेखन केलंय. लहानपणी माझे निबंध माझे मराठीचे सर वर्गात वाचून (त्यावरुन अक्षरही बरे असावे.) दाखवत असत. त्यामुळे मला आणखी लिहावंसं वाटायला लागलं. आई कविता करायची. मी मात्र कधीही कविता केल्या नाहीत. (वाचकांनी हुश्श् केलं तरी चालेल. मी माईंड करणार नाही.)
अगदी प्रेमात पडल्यावर सुद्धा कविता केल्या नाहीत. मला आल्या नाहीत. मला झाल्या नाहीत. पण म्हणून काय झालं मला कविता वाचायला आवडतात. मी लिखाण मात्र चालू ठेवले. सुरुवातीला मी अगदीच कच्चं मडकं होते.
मिसळपाव