Skip to main content

शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 07/09/2020 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढाच्या सरी थांबायचे नाव घेत नव्हत्या. तरी अश्या पर्जन्यकाळात कान्होजी जेधे लगबगीने राजगडाच्या पायर्‍या चढत होते. पाली दरवाज्याने आत येउन त्यांनी तातडीने सदर गाठली आणि आत सांगावा दिला. पहारेकर्‍याच्या वर्दीनंतर कान्होजी अंग पुसून आत गेले आणि राजांना मुजरा घालून सदरेवर टेकले. "इतक्या तातडीने येणे केलेत कान्होजी काका ! काही विशेष ?" राजांनी पृच्छा केली. "वखुतच तसा आलाय राजं. तुम्हास्नी जावळीचा समदा पेच म्हायतीच आहे. जावळीचा ह्यो तिढा सोडवायला ईजापुरास्न अफझुलखान वाईला येउन बसलाय. आपण यशवंतरावास जावळीचा चंद्रराव नामजद केला, ते या ईजापुर दरबाराला खटकलयं.

म्हारे हिवडा में नाचे मोर...!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 07/09/2020 13:31 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल.

ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 07/09/2020 02:04 या दिवशी प्रकाशित केले.

ज्ञान तपस्वी प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या लेखनकले विषयी…

1 मान्यवर लेखक आपले लेखन कसे करतात? त्यासाठी ते पुर्व तयारी कशी करतात? वेगवेगळे देशविदेशीतील संदर्भ ग्रंथ मिळवून त्यांतील पान व प्रकरण क्रमांकासह त्यांना ते कसे हाताळायला लागतात? अचूकपणे हव्या त्या वेळी त्यांना ते ते संदर्भ कसे आठवणीत राहतात? इंग्रजीतील मोठमोठ्या परिच्छेदांचे मराठीत अनुवाद करताना त्यांना सारखे इंग्रजी ते मराठी शब्दकोशाची मदत लागते का?

लोकशाहीची चिंता-नोटाचा विजय

लेखक डॉ.अमित गुंजाळ यांनी सोमवार, 07/09/2020 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथे नोटा म्हणजे पैश्याच्या नोटा नाही बरका.हा नोटा आहे लोकशाही ने आपल्याला दिलेला एक अधिकार(none of the above)चा. काल संध्याकाळी मतदान झाल्यानंतर एका जवळच्या उच्चशिक्षित मित्राला सहजच विचारले,कोणाला मतदान केले,खरे तर आपले मतदान कोणाला दिले हे सांगणे चुकीचेच आहे,पण मैत्रीच्या बांधिलकी पुढे कशाचेही चालत नाही बहुदा.

पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 06/09/2020 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी कालच हे पुस्तक वाचुन संपवले. याआधी मी सुहास शिरवळकर यांची दुनियादारी, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज व पडद्याआड ही पुस्तके वाचली आहेत. प्रामुख्याने कोर्ट रूम ड्रामा व रहस्यमयी कथा ह्या लेखनप्रकारात या लेखकाचा चांगलाच हातखंडा होता. ह्या पुस्तकाबद्दल मला mx Player वरच्या "समांतर" नावाच्या सुहास शिरवळकरांच्याच पुस्तकापासुन प्रेरित होउन बनवलेल्या वेब सिरीज मुळे माहिती मिळाली. समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण वाटते.

संवाद सूत्र

लेखक पाटिल यांनी रविवार, 06/09/2020 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
"काय रे? काय चाललंय?" - - अरे वा वा.. अगदी वेळेवर आलास.. हे वाच. "काय्ये हे??" - - हे जग हलवून टाकणारं, अद्भूत आणि कालातीत असं लिखाण केलेलं आहे मी आत्ताच.. तूच माझा पहिला वाचक. "आई ग्ग.." - - वाच वाच... आता कळेल त्यांना मी काय चीज आहे ते..! अर्थात हे गंभीर आणि अभिजात लिखाण तुला झेपणार नाही... पण सावकाश वाच... मग समजेल. "काय्ये हे..! नुसता शेणसडा है सगळा आणि जोडीला हंबरडे न् हुंदके..!" - - अरे वेड्याss... ह्या माझ्या तिच्याबद्दलच्या तरल भावना आहेत.. आणि हे सगळं शब्दांत पकडताना माझा आत्मा पार सोलवटून निघालाय रे ss.. "कशाला पकडलं मग शब्दात..??

झाड आहे साक्षीला

लेखक लेखनवाला यांनी शनिवार, 05/09/2020 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे वाटे ठरलेलें असायचे, अगदी वरच्यापासून खालच्यापर्यंत.

माझे गाणे - 'ये ना तू सख्या' ...

लेखक गणेशा यांनी शनिवार, 05/09/2020 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
या गाण्याला तसे खुप वर्ष झालीत. तसे पाहिले तर हे माझे पहिलेच गाणे आणि शेवटचे ही :-). 'Maroon color' या आठवणीतल्या लेखामुळे आणि ऑडिओ फाइल्स येथे देता येऊ लागल्याने पुन्हा हे गाणे देतोय.
काव्यरस