Skip to main content

हे खाली वर जाणं...

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 24/09/2007 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र व मैत्रिणींनो, मिसळपावावर चर्चा किंवा एकुण सदस्यांनी पाठवलेले साहित्य प्रतिसादावर आधारीत खाली आणी वर जातात. हे एक वेगळेपण आहे. याचे काही फायदे जरूर आहेत जसे, कोणता विषय 'सध्या चर्चेत' हे लगेच कळते. प्रतिसाद चटकन देता येतात. एकुण सगळ्या सदस्यांना अपडेट राहणे होते! पण त्याच वेळी या सोईने काही त्रास आहेत. जसे नको ते विषय(?) काही लोक उगाच चूड लावल्यासारखे काढतच राहतात. इतर सर्व स्थळंवर जसे काही काळा नंतर विषय पडद्या आड जातात म्हणजे दुसर्‍या पानावर जातात. इथे तसे जाणे शक्य होत नाही.

शंकराचार्य नामक तळपत्या सूर्यासमोर माझे काजवे चमकवणे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 24/09/2007 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
आदी शंकराचार्य म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारसृष्टीतला तळपता सूर्यच. त्याच्यासमोर डोळे दिपून अंधेरी यायला लागली, म्हणून आता थोडे काजवे चमकवतो. शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे वगैरेंवरती बरेचसे किचकट लेखन केले आहे, पण आज त्यांच्या शब्दांची ओळख "भज गोविन्दम्" या अत्यंत मधुर गीतामुळे लोकांत आहे. त्याचे धृवपद असे : भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते | संप्राप्ते सन्निहिते काले* नहि नहि रक्षति डुकृ़ञ् करणे ॥ भज गोविंदा भज गोविंदा गोविंदा भज मूर्ख जणा येतां विधिलिखिताच्या काळें नाही रक्षित "डुकृ़ञ् करणे" ॥ इथे "डुकृ़ञ् करणे" हा काय प्रकार आहे?

मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो...

लेखक रंजन यांनी सोमवार, 24/09/2007 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... अता उराशी कसा धरावा किरण तरी मी दिशादिशांचा प्रकाश मोठा बनून गेलो.. तुझ्याविना मी मुकाच येथे थिजून गेलो मनात माझ्या तुझीच गीते लिहून गेलो... मलाच कळते ..नसेच ही वाट ओळखीची ... तरी कशी पावलांस या ओढ लागलेली? पुन्हा पुन्हा मी इथेच येतो तुझ्याच दारी.. असाच चकवा मला तरी का छळून गेला? कशास बांधू उगाच त्या आठवांस आता?
Taxonomy upgrade extras

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 23/09/2007 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर हे विडंबन आधी प्रकाशित झालेआहे. आमची प्रेरणा संदीप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे जाणीव कुठली?

या तुम नहीं या हम नहीं

लेखक पंकज यांनी रविवार, 23/09/2007 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
यारो सितम अब ना सहो खोलो जुबाँ चूप ना रहो फिरकापरस्तों से कहो करते रहो मश्के-सितम हम ने भी खायी है कसम या तुम नहीं या हम नहीं माना फुजूं है हौसला ये जंग का है मरहल्ला आसाँ नही है फैसला इतना तो होगा कम से कम या तुम नहीं या हम नहीं रुत अश्क बारी की गयी अब शोला बारी चाहिये हर हमला भारी चाहिये हर जर्ब कारी चाहिये सर हो के तलवार खम या तुम नहीं या हम नहीं तुम हो हिसार अंदर हिसार और अपनी सफ में इतशाद है खेल अभी जीत-हार हम को भी होने दो बहम या तुम नहीं या हम नहीं -कैफ़ी आज़मी सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे.
Taxonomy upgrade extras

इ गप्पा

लेखक कौटील्य यांनी रविवार, 23/09/2007 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओरकुठ सारखे मराठी संकेतस्थळ बनवायचे या उद्देशाने egappa.com हे डोमेन नाव संरक्षित केले होते. काही अपरिहार्य कारणामुळे किंवा कार्यबाहुल्यामुळे मी ते विकसित करु शकत नाही. हे डोमेन नाव वापरुन कुणास काही करावयाचे असल्यास संपर्क साधावा.

प्रार्थना.

लेखक अशोक गोडबोले यांनी रविवार, 23/09/2007 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.
-- प्रार्थना -- द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम् प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II नाहं जाने माया भेदम् हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II मतिमंदोऽहं अघपथगामी मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II विगतवारिजं मानसविमलम् मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II शिवपदारविन्दे मनशरणम् प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II -- अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०

लेखक जगन्नाथ यांनी रविवार, 23/09/2007 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही. आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे. मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही.

एकमेकांसाठी (दुसरी आवृत्ती)

लेखक धनंजय यांनी रविवार, 23/09/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
(दुसरे संस्करण ) आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा... उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या... कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा... ****************** (पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.) धरितो तुज माझ्या बाहूंत बाळ राजा रक्षितो, जगी पीडा बहूत बाळ राजा झुंजतोस तू भवजलौघे बाळा माझ्या कडेला ये तू विसावा घे बाळा माझ्या क्लांत जधी मी शांत तू करी माझ्या राजा शक्ती दे तू, धीर मी धरी माझ्या राजा *******************

एक रात्र..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 22/09/2007 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. एक धुंद रात्र सख्या मी होते बावरी सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... - प्राजु.
Taxonomy upgrade extras