Skip to main content

"बाप" माणुस झालो

लेखक झकासराव यांनी सोमवार, 15/10/2007 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवड्यात आम्हास पुत्र रत्न प्राप्ती झाली. :) आपल्या सर्वाना कळवावे म्हणुन ही बातमी इथे टाकली आहे.

भास

लेखक धनंजय यांनी सोमवार, 15/10/2007 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
भास ***************** चाहुल लागुनि का मी जागे? पा‍उल नव्हते तव ते मागे - शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी * भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली * मस्तकावरि स्पर्श कसा हा गोंजारे मज हात तुझा का? छे! तो अभ्रा केस हलवितो पंखा वारा जसा फिरवितो * जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा * भास तुझे हे अवतीभवती क्षणभंगुर तरी भ्रम हे असती निरसे ना परि, छळे गंध हा ओतप्रोत तव भिने मंद सा *****************
Taxonomy upgrade extras

॥ स्फूर्ती देवीची आरती ॥

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 14/10/2007 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
॥ स्फूर्ती देवीची आरती ॥ स्फूर्ते अवघड भारी तुजविण संसारी । अज्ञानी वत्सांच्या ज्ञाना विस्तारी ॥ वारी वारी मजला अकर्मण्याद्वारी । कृतीच्या स्फूर्ती ने आम्हा निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी । निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुलना तुज नाही । तव किमयेचे कौतुक कळते लवलाही ॥ अगणित मनुजा प्रेरक कमालीची ठरशी । ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥ उत्स्फूर्त वदने स्फूर्ती देशी निजदासा । आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥ स्फूर्ते तुज वाचून कोण वाढवी यशा । 'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा

"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 14/10/2007 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो सलीम राजपुत्र मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे प्रीतीची आसवे पत्थ्थरात पाझरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || धृ || अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले | शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले || इष्काच्या दरबारी चांदरात बरसली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || १ || बंड करून उठली तलवार सलीमाची | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची || अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || २ || ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले | राजा वा रयतेला ना कधीच घाबरले || मिलनच्या वाटेवर भिंत जरी बांधली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 14/10/2007 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोई लौटा दे मेरे मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये || आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय!

कुछ तो लोग कहेंगे..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 14/10/2007 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून २० वर्षांपूर्वी! १३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले! परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते. तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!

पाटणकर आजोबा..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 13/10/2007 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस पाटणकर आजोबा वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया! एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते.

नवरात्रीच्या शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी शुक्रवार, 12/10/2007 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना. आपला, (तेजी-पीडित) धोंडोपंत आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्‍हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो..... आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!

डॉलर, रुपया आणि मी

लेखक कौटील्य यांनी शुक्रवार, 12/10/2007 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर खुप लोकांना रुपयाच्या अवमुल्यनाचा, विनीमय दराचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे समजत नाही. कित्येक जण ते जाणुन पण घेवु इच्छित नाहीत. अर्थव्यवस्था, व्यापार, चलन वगैरे शब्द ऐकल्यावर ते घाबरतात किंवा आपली शिक्षणव्यवस्थाच इतकी भुक्कड आहे कि या गोष्टींचा कुणी विचारच करु नये अशी तजवीज करण्यात आलेली दिसते. थोडेसे गणिताचा आधार घेवुन आपण बघुया आपल्याला काही समजते का‍? समजा आपण गृहीत धरुया की, १ डोलर म्हणजे ५०० रुपये या परिस्थितीत जवळ जवळ सर्वच गोष्टी निर्यात केल्या जातील. कारण निर्यात अतिशय फायदेशीर राहील. सर्वसामान्य माणसांना काहिच उपलब्ध होणार नाही.