Skip to main content

कोजगिरीचा चंद्र

लेखक झकासराव यांनी शुक्रवार, 26/10/2007 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोजागिरीचा चंद्राला बंदिस्त करण्याचा एक प्रयत्न माझाही :) http://www.esnips.com/web/zakasraosPhotos इथे तुम्हाला रजिस्टर करावे लागेल मग पाहु शकाल. अवांतर :- फोटोंसाठी वेगळा विभाग नाही का?? हे कुठे टाकावे हेच कळत नव्हते. :(

तहलका!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 26/10/2007 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज तहलकाचा नवा बॉम्ब बघितलात? निवडणुकीच्या तोंडवर बरोब्बर कसा फुटतो शोध पत्रकारितेचा टाईम बॉम्ब? अशा माध्यमांना कायमचा चौकशी आयोगाचा दर्जा दिला तर?

एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 26/10/2007 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
सखे........!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
  

रामसेतु

लेखक पुरणपोळी यांनी गुरुवार, 25/10/2007 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
रामसेतु वरुन वाद सुरू आहे.. करुणानिधिनी पातळी सोडली आहे.. ह्या विषयावर आपले काय मत आहे..

रहस्यकथा भाग १

लेखक सहज यांनी गुरुवार, 25/10/2007 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात. तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली.

ते गांव माझे..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 25/10/2007 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर.. पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर.. परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर.. बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर.. परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर... कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर.. भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर... नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर.. आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर... नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर.. मन नाही थाऱ्यावर, आठवे
Taxonomy upgrade extras

.

लेखक प्रियाली यांनी गुरुवार, 25/10/2007 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
.

भूप आणि भूपेश्वरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 24/10/2007 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का? कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का? "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?

काय करू?

लेखक उदय ४२ यांनी बुधवार, 24/10/2007 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझी राहती जागा चांगली ऑफर आल्यामुळे विकून टाकली, आणि दुसर्‍या जागेचा शोध सुरू केला. पण त्याच वेळी मार्केटमधले दर वाढल्यामुळे नवी जागा परवडत नाही असे लक्शात आले. आता मी भाड्याच्या घरात राहातोय. मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात, असे म्हणतात. माझा कोणता निर्णय बरोबर ते समजत नाही.