Skip to main content

मराठीद्वेष?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 26/12/2007 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाचा.... आणि त्या खालच्या कॉमेंन्ट्स पण वाचा.... ही आपली आपल्याच राजधानीत पत. http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=15&con… बृ.मुं.म.न.पा. चे बरोबर का चूक ते राहू दे पण लोकांच्या प्रतिक्रिया तर बघा... बिपिन.

निकृष्ट पत्रकारितेचा कहर

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/12/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी.

तारे जमीन पर...

लेखक स्वाती राजेश यांनी सोमवार, 24/12/2007 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
Taare Zameen Par is a story of a kid suffering from dyslexia. To create awareness about this disorder an example of Abhishek Bachchan is used in the film, who also suffered from this disorder. Aamir Khan took prior permission from the Bachchans to make this reference and use Abhishek’s name and picture as an example of success in spite of suffering from dyslexia at a young age. Abhishek is among the crème de la crème of Bollywood today. The disorder did not stop him from creating a place for himself in the film industry and become a successful star.

महान इजिप्शियन संस्कृती

लेखक सागर यांनी सोमवार, 24/12/2007 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

लेखक सागर यांनी सोमवार, 24/12/2007 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.) मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.

जुने जाऊद्या मरणालागुनी...

लेखक विसुनाना यांनी सोमवार, 24/12/2007 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका...' नाविन्याची एक तुतारी फुंकायला मागताना केशवसुतांनी ही ओळ लिहिली. आज ती ओळ आठवली याचं कारण म्हणजे ही बातमी. मुंबापुरीचं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणता येईल अशी ही म. ज्योतिबा फुले मंडई पाडून तिथे आता एक चकचकित मॉल बांधणार!अशा बातम्या आपण नेहमी वाचतो. पुण्यात, सांगलीत, कोल्हापुरात, सोलापुरात आणि झालंच तर तासगावातसुद्धा वाडे पाडून अपार्टमेंट उभी राहतात. एखाद्या दहामजली 'मेफ्लॉवर हाईटस' वर"सुप्रसिद्ध(?) लेखक श्री.

नरेंद्र मोदींचे घवघवीत यश

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 23/12/2007 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नरेंद्र मोदी या नावाची जादू गुजरातेत परत चालली आणि बेगडी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस पालापाचोळ्यासारखी उडून गेली.भारतीय जनता पक्षाने १९९८ इतक्याच म्हणजे ११७ जागा जिंकल्या. वयाच्या ८०व्या वर्षी सत्तेची हाव धरून मोदींना अपशकून करायचा प्रयत्न करणारे केशुभाई पटेल, जनतेत स्वतःचा जनाधार केव्हाच गमावून बसलेले सुरेश मेहता आणि त्यांचे बंडखोर जनतेने पूर्णपणे नाकारले. मोदींच्या विकासाभिमुख धोरणांवर जनतेने शिक्कामोर्तब केले.त्याबद्दल मोदीचे हार्दिक अभिनंदन. मोदींच्या विजयावर आपले मत काय? ----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

लेले

लेखक लबाड मुलगा यांनी शनिवार, 22/12/2007 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कॉलेजात दोन लेले होते. एक होता सुहास कमलाकर लेले. त्याला ''सुकलेले'' असे आम्ही चिडवायचो. स्वारी आजारी असायची आणि सुकलेली असायची. दुसरा लेले म्हणजे भूषण केदारनाथ लेले. हा ''भुकेलेले'' खाण्यापिण्याचा शौकीन होता. कॉलेजच्या समोर एक स्टेशनरीचे दुकान होते. मालकाचं नाव संपतराव परशुराम लेले. त्यांना आम्ही ''संपलेले'' म्हणत असू. त्यांच्या दुकानातील स्टॉक सदा संपलेला असायचा. आमचे शेजारी बन्याबापू सदाशिव लेले. सदोदित ओट्यावर बसलेले असत. ''बसलेले'' ही पदवी त्यांना शोभून दिसायची.

राजकीय वादळ

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 22/12/2007 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री. नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्याचे आज वर्तमानपत्रातून समजले. हे सरकार फक्त एका माणसासाठी चालले आहे, असे श्री. राणे यांना समजले आहे. दुसरीकडे श्री. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीत अशा गोष्टी घडतात.. अशी संयमित प्रतिक्रिया दिली आहे. दुसर्‍या कोणी बंडाचे निशाण रोवले असते तर एकवेळ ठीक होते. पण राणे यांचे आव्हान गांभिर्याने घ्यायचे असते हे महाराष्ट्रातील राजकारणात मानले गेलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? नेतृत्वबदल होईल? जर नेतृत्वबदल झाला नाही तर सगळे प्रश्न आपोआप संपतील.

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण) - o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o - भाग १: चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.