Skip to main content

खराखुरा पीजे !! ऐकावं ते नवलचं !!!

लेखक सुनील यांनी गुरुवार, 24/01/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
झारखंडच्या एका न्यायाधिशाने राम आणि हनुमान यांच्या विरुद्ध समन्स काढले. अपूर्ण पत्यामुळे ते परत आले तेव्हा त्यांनी स्थनिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन राम आणि हनुमान यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले!!! हा पहा दुवा - बातमी

एक सूचना...

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 24/01/2008 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक विनम्र सूचना... मिसळपाववरील ज्या मंडळींचे लॉगईन आयडी रोमन अक्षरात असतील त्यांनी कृपया ते बदलून देवनागरीत करावे, ही विनंती... धन्यवाद, आपला नम्र, सरपंच.

पहिले जागतीक(ऑनलाईन) मिसळपाव साहित्य संमेलन

लेखक इनोबा म्हणे यांनी गुरुवार, 24/01/2008 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मा. सरपंच महोदय श्री. तात्याबा यांच्या कल्पनेतील पहिले जागतीक मिसळपाव संमेलन होणार होणार म्हणता पुढे ढकलले गेले.मिसळपावचे गावकरी जगभर विखुरले गेले आहेत. पुण्यात होणार्‍या या संमेलनाकरिता बर्‍याच गावकर्‍यांना वेळेअभावी उपस्थीत राहता येणार नाही,हे उघड आहे. अशावेळी मिसळपावच्या प्रतिभावान ग्रामस्थांकरिता एखादे ऑनलाईन साहित्य संमेलन भरावे अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. या संमेलनादरम्यान साहित्यस्पर्धा आयोजीत करता येईल व या साहित्याचे परीक्षण करण्याकरिता मिपाच्या दिग्गजांची परीक्षक म्हणून मदत होईल. पुरस्कार म्हणून मिपाची प्रमाणपत्रे(हि सुद्धा ऑनलाईन) देता येतील.

वामनावताराचे ३९ वे शतक!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 24/01/2008 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्व.डॉन ब्रॅडमन यांच्या घरच्या मैदानावर तडाखेबंद फलंदाजीने ३९ वे शतक झळकावून सचिनने कांगारुंना जाणीव करुन दिली की "चड्डीत रहा" नाहीतर "नाड्या" माझ्या हातात आहेत!!

चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे !

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 24/01/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता माझ्याभोवतीचे जग बदलत आहे ! ....................................... चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे ! ....................................... आत आत खोल काही बदलत आहे ! चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे ! नवे नवे होते तेव्हा कडू लागलेले... भरदिवसा नंतर मग घडू लागलेले... थोडे उभे दिसू, थोडे पडू लागलेले... हळू हळू पिणे मजला उकलत आहे....! 'पुन्हा पुन्हा पिणे' केला हाच नारा माझा झोकांडत ठेवला मी सदा तारा माझा वाहू दिला मदिरेच्या मी जारा माझा ...मला सारे करायाची सवलत आहे ! घर

खाऊ नाही तर मरू

लेखक मीनल गद्रे. यांनी गुरुवार, 24/01/2008 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या गाण्याच्या चालीवर पुढील काव्य गावे. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू शरीराच्या त्या गरजेसाठी यज्ञकर्म ते करू खाऊ नाही तर मरू,खाल्ल नाही तर मरू खाऊ नाही तर मरू लढतिल सैनिक , लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू मरतील बक-या तसेच पक्षी मरतील मछल्या,पडतील भक्षी आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू

अपेक्षा

लेखक अनिला यांनी गुरुवार, 24/01/2008 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यातल्या कवीला डोळे हवे ट्पोरेच हात सुकोमलच हवेत केस काळेभोर सुगन्धी कुरळेच हवे; फुलाबिलानी सजलेले. वस्त्र नेटकीच हवीत अंगासरशी तुझ्या कवितेत सामील व्हायला अन तू उगाळ्लेल्या माझ्या भावना, अन मी ही हवी विवस्त्र. तु़झ्या घराचे घर करायला, हसतमुख घराचे दार उघडायला, जेवणाचे सुगन्ध दरवळावयाला, रडत्या मुलाला शान्तवायला जबाबदारीची ओझी वाहायला. समारम्भात मिरवायला, मी तर हवी दक्ष, सावध, तुझाच घ्यायला पक्ष. तुझ्यातल्या कवीला माझ्या सारखी कोणीही चालते पैसे मोजून गप्प बसणारी, न मोजता मिळाली तर भीतीनी मूग गिळ्णारी. तुझ्या विश्रान्तीला माझी शान्तता हवी माझ्या विश्रान्तीला, फक्त तुझ थोड ह्र दय हव थोडी कद

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 24/01/2008 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी हातात बांधलेला, तो मोगरा असावा लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो? की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!

वाच पुस्तके

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 23/01/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाच पुस्तके जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके! जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके! साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके ----अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

दारोळ्या आणि चषक माझा... आता वाचा ओरि"जिन"ल.

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 23/01/2008 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत. त्या मिसळपावच्या सदस्यांना पाजवल्याबद्दल आभार. ऑर्कूटवर हे पुस्तक खालील पत्त्यावर ऊपलब्ध आहे. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 ..अविनाश ओगले