Skip to main content

चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे !

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 24/01/2008 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णींची सुरेख कविता माझ्याभोवतीचे जग बदलत आहे ! ....................................... चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे ! ....................................... आत आत खोल काही बदलत आहे ! चेहऱ्याभोवती दाढी उमलत आहे ! नवे नवे होते तेव्हा कडू लागलेले... भरदिवसा नंतर मग घडू लागलेले... थोडे उभे दिसू, थोडे पडू लागलेले... हळू हळू पिणे मजला उकलत आहे....! 'पुन्हा पुन्हा पिणे' केला हाच नारा माझा झोकांडत ठेवला मी सदा तारा माझा वाहू दिला मदिरेच्या मी जारा माझा ...मला सारे करायाची सवलत आहे ! घराचे हे दार कोण ठोठावते बरे ? डोळ्यामधे कोण माझ्या डोकावते बरे ? दूर वरून कोण हे बोलावते बरे ? पाऊल ना सरळ पण उचलत आहे...! आनंदात असताना ही दुःख वाटते का ? विनाकारणच हुरहूर वाढते का ? एकाएकी डोळ्यांपुढे धुके दाटते का ? समजावे....! काहीतरी गफलत आहे...!! * * * सुटेल हा कायमचा पेच...जाणतो मी शेवटला घडणार, हेच जाणतो मी आता माझा मीच...इतकेच जाणतो मी ...सुरू माझी मरणाशी मसलत आहे !! * * * - केशवसुमार रचनाकाल ः २३-२४ जनेवारी २००८
लेखनविषय:

वाचने 4746
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान विडंबन!! पण नेहमीचा झणका वाटला नाहि थोडं 'संयत' वाटलं.. :प (त्याचं काय आहे नेहेमी मामलेदारची मिसळ खाऊ घातली आहेत तेव्हा ही तेवढी झणझणीत नव्हती) बाकी यावेळी मक्ता कसा नाहि? -ऋषिकेश

केशवा... तर्री नाही आली रे! (चवीने खाणार...त्याला 'केशव' देणार) -इनोबा

विडंबन चांगले पण तुमचा नेहेमीचा मकता (केश्या) दिसला नाही? विसरलात की काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हे भलतंच.. 'केश्या' कुठे गेला? सुटेल हा कायमचा पेच...जाणतो मी शेवटला घडणार, हेच जाणतो मी आता माझा मीच...इतकेच जाणतो मी ...सुरू माझी मरणाशी मसलत आहे !! अखेर कळले तुला केशवा... आता जरा जपून. :))) ह्.घ्या.. (तुमच्या हातून अशीच विडंबने घडत राहोत, मरणाची भाषा नको.) - प्राजु