आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला उद्या पंधरा वर्षे होतील.
पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो.