Skip to main content

धर्म आणि संयुक्त राष्ट्रसंघ

लेखक विकास यांनी शनिवार, 19/04/2008 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज पोप बेनेडीक्ट न्यू यॉर्कमधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) मुख्यालयात गेले होते आणि सार्वजनीक भाषण केले. त्यांची ओळख करून देताना युएन सरचिटणीस बान की मुन यांनी कॅथलीक चर्च आणि युएन मधे साम्य आहे असे सांगीतले (सेवा या अर्थी). स्वतः पोप हे मानवी अधिकारांवर बोलत असताना " धार्मिक हक्कांबद्दल" पण बोलले. यात कोणी फार गैर बोलले असे वाटले नाही. पण एक प्रश्न नक्कीच पडला की असे इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का?

बार्बेक्यू रेसिपिज

लेखक वरदा यांनी शुक्रवार, 18/04/2008 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी इथे आता मस्त लाल पिवळ्या फुलांनी झाडं भरुन गेल्येत आणि सगळ्यांना वेध लागलेत समरचे. समर मधली सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे बार्बेक्यू. मस्त पैकी बागेत किंवा घराच्या अंगणात कोळसे पेटवून शेगडी करायची आणि भाजलेले वेगळे वेगळे पदार्थ खायचे. कोळशावर भाजलेल्या पदार्थाना येणारा तो खरपूस वास एकदम झकास असतो आणि त्यांची चव काही औरच!
Taxonomy upgrade extras

प्लॅन्चेट

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 18/04/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुछ निवेदन : यह कविता हिंदोस्ताँ के हर उस शख्स को मैं समर्पित करता हूं जिसके दिलमें इस देश के लिए बेतहाशा इज्जत है , की यह देश दुनिया का एक ही देश है , जिसने इस देशपर आक्रमण करनेवाले हर देश के नागरीक को यहाँ पनाह दी है ! यह कविता मैं हिंदोस्ताँ के मशहूर वैज्ञानिक श्री.ए.पी.जे.अब्दुल कलाम और भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी को समर्पित करता हूं ! और्.....यह कविता हर उस शख्स को समर्पित है जिस की रूह में अब तक शहीदों की कुर्बानी जिंदा है !

सापेक्षतावादाच्या जनकाची ५३ वी पुण्यतिथी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 18/04/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, 'काळ ही चौथी मिती आहे आणि ती सापेक्ष आहे' असे धक्कादायक प्रतिपादन करुन संपूर्ण जगाला हादरविणार्‍या महान वैज्ञानिकाचे, अल्बर्ट आईनस्टाइनचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन इस्पितळात निधन झाले आणि वैज्ञानिक जगतातला एक महान तारा चौथ्या मितीतून लुप्त झाला! तो एक महान शास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच तो मानवी आयुष्याचा साक्षेपाने वेध घेणारा विचारवंत, माणसाचे अस्तित्व नक्की कशासाठी आहे ह्याचा शोध घेणारा तत्वज्ञ, एक सहृदय मानवतावादीही होता. शास्त्रातल्या अनेकविध शोधांप्रमाणेच विचारांचेही अनेक मौलिक स्फटिक त्याने त्याच्या आयुष्यात वेचले.

मटाचं मराठी पर्व

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 18/04/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे. या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं. त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे. दुवे देत आहे. महाराष्ट्र टाईम्स.कॉम मराठी पर्व मराठी - नीलकांत

बतावणी

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 18/04/2008 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - विष्णुलोक नारद (क्षीरसागरात प्रवेश करत) : "नारायण! नारायण! देवा, आहात का?" विष्णू (शेषशय्ये वरुन गडबडीने उठत) - "अरे वा! आज रविवारी सकाळी सकाळी इकडे कुठे चरणस्पर्श मुनिवर?" नारद : "समस्याच मोठी बिकट आहे बघा देवा!" विष्णू : "समस्या? बिकट? आणि ती ही तुम्हाला? अहो तुमचा तर त्रिखंडात हिंडण्याचा उद्योग (स्वतःशीच - कळ लावत)! " नारद (चमकून) : "काय म्हणालात?" विष्णू :" नाही, तुम्हाला कशी आली समस्या? म्हणालो मी" नारद : " असं असं. आता पहा, तीन रात्रींपूर्वी मला स्वप्न पडले की माझे सर्व ज्ञान मी विसरुन गेलोय अगदी आत्मज्ञानासकट! आणि दुसर्‍या दिवशी उठतो तर काय खरेच मला काही स्मरणच होईना!

साहेबलोक !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 18/04/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
पोटासाठी दाही दिशा, फिरवीशी तू जगदीशा! नोकरीठेप भोगत, देश-विदेश फिरताना, तरतर्‍हेचे मॅनेजर भेटतात / दिसतात. कधी आपले मॅनेजर म्हणून, कधी दुसर्‍या टीमचे मॅनेजर म्हणून, कधी आपल्या मित्र/मैत्रिणींचे मॅनेजर म्हणून तर कधी टी.व्ही, वृत्तपत्रे अशा मिडीयांतील बातम्यांमधून! आपल्या सुदैवाने बरेचजण चांगले असतात पण काही नमुनेही भेटतात !! काहीजण तर नमुनेदार असले तरी मॅनेजर म्हणून चांगले असतात ! तर, ही आहे साहेबलोकांची एक मिष्किल झलक ! थोडं हसायचं आणि सोडून द्यायचं ! गंभीरराव आपण interview देतानाच अंदाज येतो. ह्यांचा चेहरा अतिशय गंभीर आणि आपल्यावर डोळे रोखून बघायची सवय.