Skip to main content

फक्त ती सुखात राहायला हवी...

लेखक फटू यांनी शुक्रवार, 16/05/2008 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने मला विचारलं की खरच आवडते ती तुला ? जेव्हा तू एकटाच असतो वेड लावते का जिवाला ? मी हलकेच हसलो तेव्हा अन् उत्तर दिलं मी त्याला अरे, माझा प्रत्येक श्वास तिच्यासाठी आसुसलेला अरे मग तू विचार ना तिला त्याने अनाहूत सल्ला दीला का वाट पाहतो रे तू संधीची करुनच टाक एकदा फैसला थोडासा हळवा झालो तेव्हा आवाजही थोडा ओला झाला म्हटलं, अस नसतं रे मित्रा इथे जीव तिच्यात गुंतलेला अगदी असंच काही नाही मित्रा की ती माझी सखी व्हायला हवी जगाच्या पाठीवर कुठेही राहो फक्त ती सुखात राहायला हवी (बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो ->
Taxonomy upgrade extras

मास्तरांची पेन्सिल स्केचेस

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 16/05/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत. ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले... हे काका शाहिदचे बाबा आहेत...

कॉन्ट्रॅक्ट (बहुतांशी खरी झालेली एक पद्यकथा)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 16/05/2008 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
कॉन्ट्रॅक्ट चार दिवस सुट्टी होती म्हटले जरा मौज करावी बायकोला घेऊन सोबती थंड हवेची सहल करावी. थंड हवेची सहल करावी? बायको पण खूश झाली त्या खुशीत तिने दारूची पॅक करू दिली बाटली पॅक करू दिली बाटली मी पण लिमीट पाहिली जवळच्या दुकानातून तीन वाइनची क्रेट घेतली तीन वाइनची क्रेट घेऊन निघालो मी सहलीला स्वप्ने पाहत प्रवास झाला करू प्रिये सह लीला कसली प्रिये सह लीला! पाहा अगाध दैवाची लीला थांबवली बस अचानक डाकूंचा घाला पडलेला डाकूंचा घाला पडलेला मुसंड आत चढलेला घेतले सगळ्यांचे दागिने पैसा अडका गोळा केला. पैशाअडक्याचे एक सोडा तीन क्रेट पण घेतल्या नशा पळवून गेला न उघडता बाटल्या नशा पळवून ट

वैशाली (पेन-स्केच)

लेखक भाग्यश्री यांनी शुक्रवार, 16/05/2008 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांची चित्रं पाहून मला सुद्धा हुरूप आलाय! म्हणू़न हे चित्रं.. :) मला काडीएक चित्रकला येत नाही.. पण फॉर सम रिझन मागच्या वर्षीपासून मला चित्रं काढावीशी वाटू लागली, मी काढू लागले, व काही बरी जमली... (काही नाहीच जमली! मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! ) तर त्यातलं हे एक.. हे पाहून काढले आहे.. मूळ चित्र भयंकर आवडलं, म्हणून लगेच वहीच्या पानावर पेनानी काढून पाहीले.. मूळ चित्राच्या जवळही जात नाही, याची मला कल्पना आहे..

'एकाक्ष' - रेखाटन.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 16/05/2008 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी - माझी आई ड्रॉईंग काढायची त्यावेळी पेन्सिली, रंग, कागद घेऊन मी काहीतरी लुडबुड करीत बसलेला असे. त्यातूनच पुढे कधीतरी चित्रांबद्दल गोडी निर्माण झाली असावी. मला रंगीत चित्रांपेक्षा रेखाटने अधिक भावतात (कदाचित मला तेवढीच बरी जमत असावीत ;) ). काही वर्षे रेखाटने केली. पुढे कॉलेजच्या दिवसांनंतर आपसूकच तो छंद मागे पडला. आपल्या कितीतरी गोष्टी अशा व्यापातून मागे पडत गेलेल्या मला जाणवते. कामातून सवड काढून, उसंत मिळवून असे छंद पुन्हा एकदा जोपासायला हवेत अशी प्रबळ इच्छा मनात मूळ धरुन आहे.

तगमग

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 16/05/2008 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्यासाठी इतकी दगदग श्वास घेतला, जाणवली धग होकाराचे आढेवेढे! आधी किंवा आत्ता वा मग फुकट भाषणे, उधार वक्ते विकत घेतले श्रोत्यांचे नग इथे किती गजर्‍याची बोली? इथे कशी पदराची लगबग? सुचले नाही काही क्षणभर नुसती तगमग तगमग तगमग
Taxonomy upgrade extras

आमचे पहिले प्रेम..

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 15/05/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
परवा इनोबानी त्यांनी काढलेले रेखाटण मिपावर दिले आणि आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. १९८९ साली काढलेले हे चित्र आभियांत्रिकी माहाविद्यालयातून बाहेर पडताना आम्ही आमच्या मित्राला आठवण म्हणून दिले होते. पुढे तो मित्र अमेरीकेत स्थायीक झाला.. मधल्या १५ वर्षात मी ते विसरून ही गेलो.. २ वर्षापूर्वी माझ्या माझ्या वाढदिवसाला त्या मित्राची शुभेच्छा इ.मेल आली त्यात हे चित्र त्याने मला स्कॅन करून पाठवले.. कितीतरी वेळ काय बेलावे तेच कळलं नाही..

(जीवघेणे!)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/05/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्या चे 'जीवघेणे' बोल वाचून आमच्या काही दुखर्‍या आठवणी जाग्या झाल्या. ;) चालणे की ते मटकणे! जीवघेणे वेधती का नेत्र, सजणे!

उन पाउस

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 15/05/2008 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथेचा मिपाकरांसाठी हा स्वैर अनुवाद ... छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस यथावकाश मुंबईचा कोलाहल सोडुन सह्याद्रीच्या कुशीत शिरली. गार मोकळ्या वार्‍याने प्रवासी छान सुखावले, कुणी मासिकं-वर्तमानपत्र वाचु लागले तर कुणी बसल्या बसल्या पेंगु लागले. गाडी अगदी सगळ्या प्रकारचे-वयाचे लोक पोटात घेउन धावत होती, तरीही बहुतांश प्रवासी नोकरदार वर्ग किंवा महाविद्यालयीन तरुण तरुणी होते. त्या कंपार्टमेंटमधे खिडकीजवळ साधारण साठीचा एक शिडशिडीत वयस्क गृहस्थ त्याच्या जवळपास तिशीच्या मुलाबरोबर बसला होता.