Skip to main content

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 25/06/2008 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.

मातृशक्ती विरुद्ध मातृभाषा.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 25/06/2008 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मे च्या सुट्टीत बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. या निमित्त्याने आमच्या पुतणीच्या गावी मागच्या आठवड्यात गेलो होतो. आमचा नातू २ -१/४ वर्षाचा झाल्याअसल्या मुळे त्याला बालवाडीत ( के जी त )टाकण्याचा उत्साह त्यांच्या घरात वाहत होता. मी ही त्या गडबडीत सहभागी झालो होतो. त्याचे नवीन जोडे, नवीन गणवेश, छोटीशी पिशवी, ओळखपत्र इत्यादीचा थाट काय वर्णावा? घरात त्याच्या जाण्याचे, आवरासावरीचे आणि रडण्याचेही कौतुक होते. तो शाळेत गेल्यावर सहजच विचारले की येथे मराठी शाळा चांगली आहे ना? म्हणजे बालवाडी ते १० वी पर्यंत परत विचार करायला नको ना.

पुलिहोरा

लेखक वैशाली हसमनीस यांनी बुधवार, 25/06/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य--दोन वाट्या बासमती तांदूळ,प्रत्येकी पाव वाटी चणा डाळ्,उडीद डाळ व शेंगदाणे,जिरे, कढीपत्ता,लिंबाएवढी चिंच,मोहोरी,हिंग,मीठ,तेल कृति --प्रथम बासमती तांदूळाचा भात शिजवून घ्यावा,नंतर तेल गरम करून त्यात मोहोरी ,हिंग,जिरे,कढीपत्ता टाकून फोडणी करून त्यातच चणा डाळ,उडीद डाळ व शेंगदाणे तळून घ्यावेत. नंतर भात त्यात घालावा, त्यात चिंचेचे पाणी व मीठ घालून सर्व मिश्रण वरखाली हालवून एक वाफ आणावी. हा भात रसम किंवा सांबार बरोबर खावा.

फिरती इमारत - स्पीनिंग टॉवर

लेखक सहज यांनी बुधवार, 25/06/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
इस्त्रायली-इटालियन वास्तु विशारद डेव्हीड फिशर यांनी एका नव्या फिरत्या इमारतीचे डिझाईन केले आहे. स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम चित्र स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम वैशिष्ट्ये ही संभाव्य ६८ मजली स्कायस्क्रॅपर मजलेवार गोलाकार फिरणारी असणार आहे. एका मजल्याचे एक आवर्तन पुर्ण होण्यास ९० मिनटे लागतील [एका मिनीटाला ६ मिटर या गतीने] व आतल्या लोकांना मळमळणार नाही :-) असे फिशर म्हणाले. प्रत्येक मजला हा "डोनटच्या" आकाराचा असणार आहे. विंड टर्बाईनच्या तंत्रज्ञानाने ही इमारत गोलाकार फिरताना स्व:ताची उर्जानिर्मीती दे

ऑनलाईन मराठी -> इंग्रजी डिक्शनरी

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 25/06/2008 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरत असताना हि डिक्शनरीची लिंक सापडली.... १ http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/ खालील दोन ग्रंथांचे इ-रुपांतरण केलेले दिसते .... Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857. Vaze, Shridhar Ganesh. The Aryabhusan school dictionary, Marathi-English.

२५ जुन- १९८३

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 25/06/2008 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले. नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु.

छायाचित्र परिक्षण - १

लेखक सूर्य यांनी बुधवार, 25/06/2008 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडे छायाचित्र टिका असा उपक्रम चालु आहे. तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. चित्र आवडले की नाही. आवडले असेल तर त्याची कारणे. आवडले नसेल तर का नाही आवडले आणि कशी सुधारणा केली असती तर अजुन चांगले झाले असते याविषली चर्चा अपेक्षित आहे. आशा आहे की मि.पा. वरच्या माझ्या मित्रांना हा मिपाक्रम आवडेल. मि.पा. वर थोडेफार प्रतिसाद मी दिले असले तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. त्यानिमित्ताने लाल गुलाबाचे छायाचित्र इथे अपलोड करत आहे.

काय करावे कळत नव्हते

लेखक कौस्तुभ यांनी बुधवार, 25/06/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे कळत नव्हते मागुनही मिळत नव्हते सरपटणार्या त्या आयुष्याला हक्काचे असे बिळच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते कुणी आपुले म्हणतच नव्हते शिवलेल्या त्या कावळ्याला जिवंतपणि जगणेच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते समोर असून दिसत नव्हते ती हाक ओठांवर पेलण्याला शब्द माझे धजत नव्हते ---------------------------- काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते -- कौस्तुभ
Taxonomy upgrade extras

आणिबाणी

लेखक विकास यांनी बुधवार, 25/06/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले.