आणिबाणी
२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. तेव्हढ्यात जेपींबद्द्लच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या मग अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि ठाण्यात अनेक सभा होऊ लागल्या. त्या सभांना लहान असून देखील घरच्यांबरोबर हजेरी लावलेली आठवते - ठळकपणे आठवतात त्या मॄणाल गोरे, सुब्रम्हण्यम स्वामी आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या सभा. त्यात सांगीतले गेलेले अत्याचार आणि दिसला कुठेतरी त्याविरुद्ध किमान मताच्या बळावर उभा राहीलेला सामान्य माणूस.
बघता बघता "गाय वासरू नका विसरू" म्हणणारी काँग्रेस काही काळ पडद्याआड गेली. अनेक ठिकाणी दिग्गज पडले त्यात राजनारायण समोर इंदिरा गांधी पडल्या तर संजय गांधी आणि चांडाळ चौकडी पण काही काळ नामशेष झाली... अर्थात दैव देते आणि कर्म नेते या उक्तिप्रमाणे जनता पार्टी आणि त्यातील सभासद उपपक्षांना लोकशाहीतील सत्ता झेपली नाही आणि बघता बघता खेळ खल्लास झाला!
नंतर परत आणिबाणी आली नाही आणि कुठेतरी दिसलेले सामान्यांचे बळ पण परत दिसले नाही. परीणामी राजकारण खराब होत गेले आणि सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला... एकीकडे पंजाब, एलटीटीइ , काश्मिर दहशतवाद तर दुसरीकडे इंदीरा गांधी, राजीव गांधी, यांच्या हत्येचे धक्के पचवले, नाणेनिधीचे संकट दूर केले, उपग्रह उडवले आणि अणूबाँब उडवले पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...
थोडक्यात तत्कालीन आणिबाणी ही एका नेतॄत्वाला सत्ता टिकवण्यासाठी जाहीर करावी लागली. पण आज देश टिकवणे अथवा बळकट करण्यासाठी लागणारा सामाजीक क्षमतेचा किमान वरकरणी दिसणारा अभाव पाहीला तर आजची परीस्थिती ही खरी आणिबाणीची वाटते, असे म्हणले तर ते १००% बरोबर ठरणार नाही (निदान तशी आशा करतो) पण १००% चूक पण नाही अशी भिती वाटल्यास ती खोटी आहे का?
वाचने
8089
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
छान आढावा..
फक्त तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!
एग्री विथ
२५ जून हा
पुल॑ आणि आणीबाणी..
आणीबाणी!
In reply to आणीबाणी! by पिवळा डांबिस
सहमत!
In reply to आणीबाणी! by पिवळा डांबिस
धन्यवाद
- पुलंच्या बाबतीतील विधान मान्य आहे. ते आधी शांतच होते. कारण आपण सांगीतलेच.
- आपण म्हणत असाल तर यशवंतराव चव्हाण म्हणाले असतील पण यशवंतराव गप्प गप्प असायचे आणि निवडणूकीच्या नंतर त्यांनी काँग्रेसपक्ष सोडला पण होता (नंतर दुर्दैवाने - स्वगृही येणे हा वाक्प्रचार त्यांनी रूढ केला आणि स्वतःची मानहानी करून घेतली). म्हणून शंकरराव जे त्यावेळेस झैलसिंगाच्या बरोबरीने संजय गांधीच्या चपला विमानात शिडीवरून चढताना पडल्या, त्या उचलण्यासाठी धावले, त्यांनी म्हणल्या सारखे वाटले. असो.
- जयप्रकाश नारायणांसंदर्भात आपले म्हणणे बरोबरच आहे. म्हणूनच मी त्यांचा विशेष उल्लेख केला नाही. पण त्याच्या आधी आणि नंतर अशा अनेक घटना घडल्या ज्या मुळे देश संकटात आल्यासारखी परीस्थिती निर्माण झाली पण त्यामुळे आणिबाणी जाहीर करावी लागली नाही. जेपींना कायद्याने गप्प बसवता आले असते. त्यांचे अनेक हाल रुग्णालयात केल्याच्या कथा पण आहेत, जशा जॉर्ज फर्नांडीस आणि त्यांच्या भावाबद्दल ऐकल्याचे आठवते तसेच.
- बाळासाहेबांचे विसरलो होतो. ते अजूनही त्याचे समर्थन करत असतात :-) विनोबांचे अनुशासन पर्व आणि मौनव्रत धारण करून टाळ्या वाजवणे हे दुसरे प्रकार...
- रामनाथ गोएंका हे वेगळे व्यक्तिमत्व होते. तेच चो रामस्वामींबद्दल
- जशी गुंडगिरी कमी झाली तशीच जबरदस्तीने नसबंदींची प्रकरणेपण खूप झाली.
- इंदीरा गांधींनी निवडणूका जाहीर केल्या आणि त्यात हरल्यानंतर आणिबाणी रद्द केली होती (हंगामी राष्ट्रपती बीडी जत्ती)
- "आणीबाणी ही जशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली काळीकुट्ट घटना आहे तशीच त्या हुकूमशहाने ती उठवून नंतर पराभव झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून बसणे ही उज्ज्वल घटना आहे. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण नाही." हे योग्य निरीक्षण आहे आणि बर्याच अर्थी अभिमानास्पद. म्हणूनच वाटते की त्यावेळेस जे जनतेने दाखवले तसे मतांच्या साधनाने आजही दाखवले जात असले तरी एकंदरीत निष्क्रीयता वाढली आहे. त्याच बरोबर असेही म्हणावेसे वाटते की स्वतःच्या अक्षम्य चुका समजल्यावर बाकी कुठल्याही प्रकारचे राजकारण जरी केले असले तरी त्या चुका मान्य करून निर्णय बदलायला "इंदीराजींनी" कमीपणा वाटून घेतला नाही - आणिबाणीच्या वेळेस आणि नंतर पंजाब प्रश्नीपण ज्यात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
- "तुरूंगात सगळ्यात त्रास सोसला तो समाजवाद्यांनी नव्हे तर रा.स्व. संघाच्या लोकांनी आणि आनंदमार्गीयांनी!!" - हे ही विधान बरोबर आहे. रा.स्व. संघावर तर बंदी घातली गेली होती. तरी देखील निवडणूका जिंकल्यावर जनता पक्षाचे राज्य आल्यावर सरसंघचालक बाळासाहेब देवरस सत्ताधार्यांना उद्देशून म्हणाले होते की "फर्गेट अँड फरगिव्ह". ते अर्थातच ऐकले गेले नाही आणि इंदीरा गांधीना प्रसिद्धि आणि नंतर सत्ता मिळणे त्यामुळे काही अंशी सोपे गेले.
- तेंव्हा प्राथमिक शाळेत असल्याने, रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक घरावरून जात असताना नुसतीच (एक्साईट होवून) पाहील्याचे अजूनही आठवत असलेला आणि त्यावेळेच्या घोषणा लक्षात असलेला... :-)इयत्ता तिसरीत होतो मी तेव्हा.
खरे आहे.
In reply to खरे आहे. by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +२ by ब्रिटिश टिंग्या
+३
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to +३ by नंदन
+४
In reply to +४ by निखिल देशपांडे
+५
In reply to +४ by निखिल देशपांडे
+६
In reply to +२ by ब्रिटिश टिंग्या
प्रकाटाआ
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
+१
+२
जी गोष्ट
In reply to जी गोष्ट by समंजस
जी गोष्ट
In reply to जी गोष्ट by विसोबा खेचर
आणि
लेख आवडला.
निर्णय घेणारा नेता
लेख आवडला.