Skip to main content

छायाचित्र परिक्षण - १

लेखक सूर्य यांनी बुधवार, 25/06/2008 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडे छायाचित्र टिका असा उपक्रम चालु आहे. तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. चित्र आवडले की नाही. आवडले असेल तर त्याची कारणे. आवडले नसेल तर का नाही आवडले आणि कशी सुधारणा केली असती तर अजुन चांगले झाले असते याविषली चर्चा अपेक्षित आहे. आशा आहे की मि.पा. वरच्या माझ्या मित्रांना हा मिपाक्रम आवडेल. मि.पा. वर थोडेफार प्रतिसाद मी दिले असले तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. त्यानिमित्ताने लाल गुलाबाचे छायाचित्र इथे अपलोड करत आहे. आपला - सूर्य

वाचने 11530
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

वा सूर्या! अरे गुलाबाचं फूल कुणाला आवडत नाही? फारच सुरेख चित्रं आहे हे! तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. जियो...! तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. मिपा परिवारात सहर्ष स्वागत...! आपला, (गुलाबप्रेमी) तात्या.

नक्की प्रतिक्रीया दिली असती... पण चित्रच दिसत नाहिये हो माझ्या पिसी वर... काय करावे.. :? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सूर्या, मला छायाचित्र आवडले. मला फुलं आणि निसर्गाची छायाचित्रे आवडतात म्हणून हे छायाचित्र आवडले. अजून येउदेत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

दिसत नसेल तर कृपया आय.इ. मधुन बघण्याचा प्रयत्न करावा. मी फायर फॉक्स मधुन अपलोड केले असले तरी मलासुद्धा फायर फॉक्स मधुन दिसत नाहिये :( - सूर्य

ही परीक्षणाची कल्पना आवडली. गुलाबाचा टवटवीत फ्रेशपणा आणि हिरव्या पानांच्या सिंहासनावर विराजमान ऐटदार गुलाबराज! असा फोटो आवडला.

इतका सुंदर रंग आहे या गुलाबाचा वा! सकाळ सकाळ इतक्या सुंदर गुलाबाचा फोटो पाठवील्या बद्द्ल धन्यवाद!

In reply to by बेसनलाडू

(टवटवीत)बेसनलाडू =)) =)) =)) बाकी फोटु छान आहे.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

In reply to by बेसनलाडू

=)) वा ! वा !! वा !!! बेसनलाडवा असाच टवटवीत रहा ....... =)) =)) =)).... कल्पना च करवत नाही गड्या.... तो फोटोतला गूलाब कोमेजेल आज ना उद्या (नाही तर परवा नकीच) पण मिपाचा टवटवीत बेसनलाडू तस्साच टन्नक राहील... हाणला कोणाच्या डोक्यात तर टेंगूळ आल्याशिवाय रहाणार नाही (टवटवीत बेसनलाडू चा पंखा) कुबड्या
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

सुंदर फोटो... हा फोटो पाहुन एक फोटो मलाही इथ ध्यावा वाटतोय.....(हा वॉलपेपर आहे,,माहितीजालावरुन घेतलेला..) (गुलकंद प्रेमी) मदनबाण.....

फारच लोभस दृष्टिभ्रम - डेप्थ ऑफ फोकसने केलेली किमया. लाल-हिरवी गडद रंगसंगती क्लासिकच आहे. (मिपा वर मातब्बर प्रकाशचित्रकार आहेत - त्यांच्याकडून उत्तम चर्चा होईल, आणि काही शिकायलाही मिळेल. मिपाक्रम सुरू केल्याबद्दल "जियो!")

गुलाबाचं चित्र लै भारी आलंय !!! अहो सेठ, आम्ही आपली अनेक चित्र पाहिली आहेत. त्यातल्या कलेला आणि कलाकाराला आम्ही केव्हाच ओळखलंय !!! ही म्हणजे रसिकांची परिक्षा आहे, असे वाटते :) -दिलीप बिरुटे (सूर्यचा मित्र चंद्र )

मस्त गुलाबाचा फोटो आणि मदणबाण्ने ही मस्त फोटो चढविला आहे

सूर्य भाऊ तुमच्या चित्रावर किंचीत हिरवट पिवळ्या रंगाची कास्ट आली आहे असे वाटते. ती काढून टाकल्यावर चित्रातील आणखी डिटेल्स दिसता आहेत. मूळ चित्र हिरवी छटा कमी केल्यावर

धन्यवाद कोलबेर भाऊ ;). मी चित्र शक्यतो ओरिजिनलच ठेवतो. पण याचे मुख्य कारण प्रोसेस करण्याचा कंटाळा हे आहे ;). दुसरे म्हणजे फोटोशॉप परवडत नाही आणि जिंप येत नाही :(. असो. पण तुम्ही हिरवी छ्टा गडद केल्यानंतरचे चित्र ओरिजिनल पेक्षा भारी दिसतेय खरे. पिवळी छटा कशी कमी केली काही सांगता येइल का ? - सूर्य.

सुंदर! सूर्य, फोटोसाठी निवडलेला गुलाब मस्तच. आणि फोटोही सुंदर! त्यात कोलबेरशेठचा सिध्दहस्त फिरल्याने फोटोतला उठुन दिसणारा रंग आणि त्यावरचे उन्ह-सावलीचे खेळही अप्रतिम :) आणखी येऊ दे.

नमस्कार, वाह !!!!!!!! क्या बात है. झक्कास. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? जागा चुकली असेल तर माफ करा. इथे नवीन असल्यामुले अजुन सरावलेले नाही.

छान आहे चित्र, सूर्य >> घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? फूलपाखरूजी, मला वाटतं की नविनच धागा सुरू करा. तुमच्याकडचा छायाचित्रांच्या रुपातील घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास आवडेल बघायला. येऊ द्यात लवकर.