Skip to main content

चंद्र-शुक्र-गुरू युती विरोधी चित्रे

लेखक विकास यांनी मंगळवार, 02/12/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळ मधे चंद्र-शुक्र-गुरू युतीचे सुंदर छायचित्र पाहीले. नंतर संध्याकाळी बॉस्टनच्या आकाशात तीच युती पहाताना चंद्र उलटा दिसला! छायाचित्र काढायचे राहून गेले पण आज ते सीएनएन वर दिसले.

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -३

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 02/12/2008 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
तरुणपणी मी काही घोषणा ऐकत असे, हसके लिया पाकिस्तान और लढके लेंगे हिंदुस्थान. असे ऐकल्यावर माझे रक्त खवळत असे.बर्‍याच वेळेस शब्दांचा वापर आवश्यकतेपेक्षा नकळतच चांगला अथवा वाईट परिणाम साधत असतो.जसा जसा मी मोठा होऊ लागलो तेव्हा नकळतच त्यांची बाजू काय असावी किंवा काय असू शकते यावर थोडाफार कयास, तर्क बांधू लागलो. तेव्हा मला असे वाटले की ही घोषणा अशी असायला हवी होती, लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान. अशी जर घोषणा असती तर?

शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 02/12/2008 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते.. माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे! महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे! तात्या.

केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांनी भागणार नाही....

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांकडे केवळ शस्त्रेच कमी आहेत असं नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी जागांचीही कमतरता आहे असं दिसतंय, firing ranges (आवश्यक असल्यास खाजगी देखील) मिळायला हवीत.

"टाईंम" साप्ताहीकातील लेख - थोडीशी वेगळ्या पण अखंड भारताची इच्छा...

लेखक विकास यांनी मंगळवार, 02/12/2008 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
टाईंम साप्ताहीकाचा संकेत स्थळावर "India's Muslims in Crisis" हा लेख वाचनात आला. त्यात आत्ताच्या हल्ल्याचा उहापोह केला आहे. त्या प्रमाणे भारतातील मुस्लीम अल्पसंख्य समाज हा आर्थिक दृष्ट्या आणि सामाजीक दृष्ट्या मागासलेले आहेत ह्या अर्थी भाग आहे. तसेच पाकीस्तानी मुस्लीम हे झिया आणि एकंदरीतच राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे मदरसांच्या हातात कसे गेले वगैरे लिहीले आहे. हे दोन्ही भाग पटणारेच आहेत. कसे ते कळत नाही पण आजही मुस्लीम समाजाला "भारतीय" समाजाचा अविभाज्य भाग करण्याची गरज आहे. किंबहूना कालच्या पेक्षा अधिक.

सर्व राजकिय आजोबांना जाहीर पत्र

लेखक प्रथमेश गोखले यांनी मंगळवार, 02/12/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय राजकीय आजोबा, स.न.वि. वि. मला ठाउक आहे की, देशाला बलाढ्य बनविण्यासाठी तुम्ही ' अथक परिश्रम ' ( ? ) घेतले आहेत. मला याचीही कल्पना आहे की 'खुर्ची' साठी तुम्हाला घामाचा एक एक थेंब गाळावा लागतो.

असेच काहीतरी

लेखक चेतन यांनी मंगळवार, 02/12/2008 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बरेच दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच् तुझी आठवण सांजवेळी, मन माझे कातर करते | हुदयातुन पुढे सरकत, वेळीअवेळी डोळ्यात दाटते || पोटपाण्याच्या नित्यक्रमात, काही तास निघुनही जातात | कामाच्या गडबडगोंधळात, काहि आठवणी विझुन जातात || दुपारच्या गडबडी नंतर, संथ झुलत संध्याकाळ येते | परत एकदा स्म्रुती जागवुन, भावनांच्या म्रुगजळात नेते || पुन्हा मन पेटुन उठतं, समंधालाही उधाण येतं | चंद्र येतो सोबतिला अन्, झुळुक वार्‍याची मंद वाहते || या मंद वार्‍याबरोबर, आठवणीही कुंद होतात | मला एकटाल्याच सोडुन, कुठल्याकुठे वाहुन जातात || थोडे दिवस पुन्हा
Taxonomy upgrade extras

आजचा विचार : देशाचा विचार

लेखक आम्हाघरीधन यांनी मंगळवार, 02/12/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
1. Do not worry about those who have come thru boats... Our forces can easily defeat them. WORRY about those who have come thru votes.... Those are our REAL ENEMIES…. 2. What a shame and disgrace to every citizen of India that the elite NSG Force was transported into ordinary BEST buses, whereas our cricketers are transported into state of the art luxury buses, these Jawans lay down their lives to protect every Indian and these cricketers get paid even if they lose a match, we worship these cricketers and forget the martyrdom of these brave Jawans.

आपणास हे माहिती आहे का?

लेखक अप्पासाहेब यांनी मंगळवार, 02/12/2008 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने ही माहिती पुरवली आहे. क्षमस्व ,मुळ स्त्रोत अज्ञात. " Did you know that there is a system in our constitution, as per the 1969 act, in section " 49-O" that a person can go to the polling booth, confirm his identity, get his finger marked and convey the presiding election officer that he/she doesn't want to vote anyone! Yes such a feature is available, but obviously past + present leaders have never disclosed it. This is called "49-O". Why should You go and say " I VOTE NOBODY".