Skip to main content

लव लेटर

लेखक कशिद यांनी रविवार, 07/12/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
टिप -मला ऑरकुट ही कविता सापडली मी लिहिली नाही आहे पण मिपा करानासठी खास आणली आहे [:0] सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा.. प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
Taxonomy upgrade extras

पुढार्‍यांचे देशभक्ती गीत

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 07/12/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
या मातेचे कुपुत्र आम्ही आम्हास कसली लाज बटीक बनवली आम्ही तिजला भागविण्या अमुचीच खाज गरीबांच्या या टाळु वरचे आम्ही खातो लोणी नित्य नवी आम्हा लागते रम आणि रमणी कोण कुठले भगतसिंग..? अन कोण कुठले राजगुरु.. आम्ही वंदितो भाई ठाकुर अमर, अरुण, साटम गुरु.. उच्च नीच नाही कोणी सगळेच आम्ही महान एकजुटीने आम्ही ठेवला अमुचा भारत गहाण.....!!!
Taxonomy upgrade extras

दोन अनोळख्या मधला एक दूवा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/12/2008 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मुलगी,दहाऐक वर्षाची असेल संकोचशील झालेली ती माझ्या जवळ येऊन मला एक मासिक वाचायला देऊन गेली.मी तिच्याकडून ते मासिक घेतलं.तिच्या त्या अबोल वागण्यातून जे बोल माझ्या कानी आले ते जणू म्हणाले , " वेळ जात नसेल तर वाचा" आणि माझ्या तोंडूनपण जो अबोल शब्द निघाला तो पण "धन्यवाद" असाच होता." माझ्या एका मित्राने मला सांगितलेली ही एक गोष्ट. हा माझा मित्र संजय एका सुश्रुषागृहात रुग्णाची सेवा करण्याच्या कामगिरीवर होता.काही कुष्टरोग झालेले रुग्ण सुद्धा त्या सुश्रुषागृहातल्या एका विंगमधे इलाजासाठी आलेले होते.एका पंचविस- तिसच्या तरुणाला कुष्टरोगाची नुकतीच लागण झालेली होती.आणि त्यावर उपायासाठी तो बरेच दिव

मिपावरील हल्ले सुरूच...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 07/12/2008 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, अजूनही आमच्या जुन्या संकेतस्थळावरील काही हित(?)मित्रांचे मिपावर हल्ले सुरूच आहेत. मशिन जनरेटेड हिट्स लावून मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त ताण दिला जात आहे. मिपाची वाढती लोकप्रियता आणि सभासद संख्या ही आमच्या मित्रांना (?) बघवत नाही आणि यांचे छुपे हल्ले सुरूच आहेत. तात्यावर समोरासमोर, नावानिशी वार करण्याची यांची हिंमत नाही. अहो स्वत:च्या वडिलांचंच नाव ज्यांना माहीत नाही ती मंडळी नावानिशी हल्ले तरी काय करणार? असो.. या बाबतीत उपाययोजना सुरू आहे. येत्या काही दिवसात आम्ही काही ठोस उपाययोजना करू अशी खात्री आहे.

(भणंग २)

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 06/12/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;) उषःपान झाले सकाळी सकाळी तुला 'छान' झाले सकाळी सकाळी चवीला बिडी मस्त ओठात घेता 'धुरापान' झाले सकाळी सकाळी 'तिथे' पोचता पाहिले एकमेका कसे ध्यान झाले सकाळी सकाळी जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे गतीमान झाले सकाळी सकाळी इसबगोल सर्वास उ:शाप झाला बक:ध्यान झाले सकाळी सकाळी म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला समाधान झाले सकाळी सकाळी चतुरंग

संत

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 06/12/2008 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेकडो वर्षांपूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करणा-या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं... ... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! (वरील विनोद मी म.टा. वर वाचला व मि. पा. वर अनेक सद्द्स्य संगणक अभियंते असल्यामूळे येथे चिकटवण्याचा मोह आवरला नाही. संपादक महोदय योग्य तो न्याय करतीलच. )

आझम अमीर कसाब यांस अनावृत्त पत्र

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 06/12/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आझम कसाब, नमस्कार, खरा म्हणजे तुला नमस्कार करायला नकोय...तुम्ही एवढा मोठ्ठा चमत्कार दाखवल्यावर आमच्या हिंदु प्रथेनुसार मी तो केलाय. तु आणि तुझ्या सहकाऱ्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ले करुन आम्हाला पार जेरीला आणलेस, जवळपास २०० नागरिक, कार्यक्षम दक्ष पोलिस अधिकारी यांचे बळी घेऊन मगच तुमच्या बंदुका थंडावल्या. परवा गेटवे ऑफ इंडीयावर झालेल्या रॅलीतुन यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, आता नागरिकच जागे होतायत. राजकारणी आणि एकंदर ब्युरोक्रसी किती होपलेस आहे ते आता सगळ्यांना समजलय( निदान त्यामुळे २०० जणांच्या आत्म्यांना गती मिळेलंस दिसतय)...तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही.

आपल्याला काय करता येईल?

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 06/12/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिसळपाववर चांगली चर्चा झाली आणि होत आहे. दुर्दैवाने आपल्या हातात चर्चा करण्याशिवाय फारसे काही हातात नाही असे वाटते. एकूण सामान्य पापभीरू मंडळी एखाद्या झुरळाला मारताना सुध्दा हजारवेळा विचार करणार. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राज्यकर्त्यांचे आणि सध्याच्या काळात दहशतवाद्यांचे रक्ताचे पाट वाहवणे आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ठराव पास करत होतो आणि सध्या चर्चा करत आहोत.

खेळ खुर्चिचा

लेखक मनोज यांनी शनिवार, 06/12/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ जुना खुर्चिचा हा पुन्हा नव्याने चालला जे गेले बळी त्यांचा खेद कुणा वाटला? कोण आले? कोण गेले? मारीले कुणी ? कोण मेले? सत्तेचे भुकेले बघ पुन्हा प्रवासा निघाले आतंकाचे कुंड जळते अन मुक्यांच्या आहूती कोणी रक्षावे कुणाला? षंढ सारे भोवती विध्वंसाचे पर्व मोठे आघात त्यांचे विषारी हात व्यस्थ रक्षकांचे खुर्चीचे सारे पुजारी हे नित्याचेचा आता सवय याची लाउन घे मेले त्यात तु नव्हता धन्यता मानुन घे
Taxonomy upgrade extras

"वाद"

लेखक अभिज्ञ यांनी शनिवार, 06/12/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
"वाद" गेले बरेच दिवस सातत्याने मिपावर ,मुंबई वरिल अतिरेक्यांच्या हल्यामुळे त्याविषयी इथल्या सदस्यांनी वेगवेगळ्या धाग्यांमधून आपली मते हिरिहिरिने मांडलि. अतिरेक्यांच्या पोषणकर्त्या पाकिस्तान वर भारताने थेट हल्ला करावा पासून ते गांधीवादाने अतिरेक्यांना कसे पराभूत करता येइल वगैरे अनेक विचार समोर आले. वाचताना ब-याच वेळा गांधी"वाद" हा शब्द नजरेत आला. त्यातून एक विचार समोर आला म्हणजे कि हे व्यक्ति जन्मित "वाद" किंवा "ism" हे कालातीत असतात काय? गेल्या शतकाच्या सुरुवातीला रशियात व पुर्व युरोपात भांडवलशाहीच्या विरोधात कार्ल मार्क्सचा "साम्यवाद" वा "कम्युनिझम" जन्माला आले. त्यालाच पुढे "मार्क्सवाद" अस