Skip to main content

संशय आणि शंका

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 24/12/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पोलीस दलातील तीन आधिकार्‍यांच्या मृत्यूला कारणीभूत दहशतवादीच आहेत की आणखी कुणी असा संशय श्री. अंतुले यांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती सोडल्यास प्रत्येक व्यक्ति ही संशयाच्या वर्तूळातच असते या प्रचलित सिद्धांतास अनुसरूनच श्री. अंतुले यांचे विधान असल्याने त्याबद्दल आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. परंतू यानंतर आता अजूनही काही शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ - अतिरेक्यांनी रेल्वेस्थानकात सामान्य व्यक्तिंवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी कामा हॉस्पीटल पाशी पोलीस आधिकार्‍यांवर हल्ला केला. ताज व इतर हॉटेलांत त्यांनी उद्योगपती / विदेशी नागरिक यांच्यावर हल्ला केला.

झणझणीत वरणफळं उर्फ चकोल्या : बालपणीच्या आठवणींसह :-)

लेखक स्मिता श्रीपाद यांनी बुधवार, 24/12/2008 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी वरणफळे करणे आणि खाणे हा एक सोहळा असायचा...सोहळा अशासाठी म्हटलं कारण हा पदार्थ करायचा म्हणजे त्याची तयारी २-३ दिवस चालायची...आता तुम्ही म्हणाल की हा इतका सोपा पदार्थ आहे..तर त्याची काय तयारी करायची..तर तयारी पदार्थ करण्यासाठी नसुन तो कधी करायचा हा "बेत" करण्यासाठी असायची.... त्याचं काय होतं..की माझ्या आई आणि बाबांना हा प्रकार अजिबात म्हणजे अजिबात आवडायचा नाही..."आमटी आणि पोळीचा काला काय खायचा नुसता..त्यापेक्षा भाज्या खाव्यात भरपुर.." ईति आमच्या मातोश्री..चकोल्या भुरकण्यातलं सुख हिला कधी कळणार,म्हणुन मी हळहळायचे :-)......मग एखाद्या दिवशी आमची लाडकी आज्जी हा बेत ठरवायची ( आजोळ गाव

विनोद

लेखक मॅन्ड्रेक यांनी बुधवार, 24/12/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठिच्या त्या प्राध्यापकाने नविनच लग्न झालेल्या पत्निला मिठित घेत असता सहजच विचारले - मिठितला मि पहिला कि दुसरा ? त्यावर तिनेहि सहजच उत्तर दिले - तिसरा.
Taxonomy upgrade extras

जाहीर विचारणा आणि आवाहन

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

देवद्वार छंदः गारवा: निकाल केव्हा?

लेखक बाजीराव यांनी बुधवार, 24/12/2008 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
देवद्वार छंदातल्या गारवा विषयावरील काव्यस्पर्धेच्या निकालाचे काय झाले? तो जाहीर झाला काय? वाचनात आला नाही! डिसेंबरची स्पर्धाही जाहीर झालेली दिसत नाही. सरकार इकडे लक्ष देईल काय?
Taxonomy upgrade extras

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/12/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.

गोल्डफ्लेक्स

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता. गोल्डफ्लेक्स पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून शेवटी केवळ फिल्टर उरलेले असतात.... थंडगार फुक्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमलतं त्यांना पाहून. मिंटने धुराचा वास झटकून पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी... - घाटावरचे भट
Taxonomy upgrade extras

विव्हळतं तळ...

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/12/2008 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
विव्हळतं तळ... ================== . . नखातली डोक्यात.. झणझण जाते कळ...! डोळ्यातलं ओठात.. विव्हळतं तळ...! . टीप टीप वेदनेत.. कट्यारीची धार...! थेंब थेंब ओघळात.. तेजाब आर-पार...! . फसफस जाळत.. खोल खोल जाते घळ...! भसभस उफाळत.. रसरसता ये जाळ...! . . ================== स्वाती फडणीस..... २३-१२-२००८