Skip to main content

तिळाची वडी

लेखक नीरजा यांनी रविवार, 18/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रात/रथसप्तमी करिता तिळा-साखरेच्या वड्या. साहित्य: एक वाटी साखर, एक मोठा चमचा तीळ, एक चमचा तुप, वेलचीपुड इ. कृती : एकीकडे तिळ हलके भाजुन घ्या, नॉनस्टिक पॅनमधे साखर घालून मंद आचेवर पाक होईपर्यंत सतत ढवळत रहा (पाणी न घालता) तयार पाकात भाजलेले तिळ, वेलचीपुड आणि तुप घाला. तयार मिश्रण लगेच तुप लावलेल्या थाळ्यात किंवा पोळपाटावर ओता. मिश्रण थंड होण्यापुर्वी वड्या पाडा. तिळ आणि गुळाने उष्णता वाढते, गुळाला पर्याय म्हणुन साखरेच्या या वड्या छान लागतात.

पंढरी (अष्टाक्षरी)

लेखक प्रशांत.पोरे यांनी रविवार, 18/01/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीचा विठूराया, पंढरीत आहे कुठे? वाट विठूची पहात, उभे मंदीर एकटे! रखुमाईही पुसते, "कसा दिवस हा आला? विना सांगता कुणाला, कुठे नाथ माझा गेला? नाही कुणी कान्होपात्रा, आज कुणी जना नाही. ज्यांच्या मदतीच्या साठी, देव देवळात नाही." विठू कधीच नव्हता, पंढरीच्या मंदिरात, तोच सांगे "नका पाहू, मला काळ्या पत्थरात." देव सांगे आज मला, "देव तुझ्याच घरात, घरातल्या विठ्ठलाच्या, काय जाण अंतरात. बाप तुझा रे विठोबा, अन आई रखुमाई, त्यांच्या पायधुळीचीही, सर पंढरीस नाही. माय पित्याहून दुजा, स्वर्ग नाही हे सांगतो, तीच तुझी रे पंढरी, विठू तिथेच नांदतो."

धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी

लेखक कपिल काळे यांनी रविवार, 18/01/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले. आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे.

एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 18/01/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं." माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? असं मी विचारल्यावर ती म्हणाली, "मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.

एक कथा - १!

लेखक चेतन१२३प यांनी रविवार, 18/01/2009 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवार सकाळची वेळ. साधारण नऊ वाजले असतील. सृष्टीला सुर्याने प्रकाशाने उजळून टाकले होते. रस्त्यावर प्रचंड रहदारी होती. गाड्यांचा आवाज.. हॉर्नचा आवाज याला साथ देत मध्येच एखादे विमान आकाशातून जात असल्याची हमी देत होते. प्रत्येक चौकामध्ये सिग्नलवर गाड्यांची रिघ लागली होती.सगळे लोक कार्यालयात जाण्याच्या गडबडीत होते. प्रत्येक जण धावपळ करताना दिसत होते. सिटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. दुचाकी वाहनेदेखील रहदारीमध्ये आणि प्रदुषणामध्ये भर घालत होती. एका साधारण सोमवारची ती साधारण सकाळ होती. पण, काहितरी विशेष आज घडणार होते.

घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

लेखक चेतन१२३प यांनी शनिवार, 17/01/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
...... श्रावण महिन्यातली ती एक साधारण सायंकाळ होती. सूर्य अस्ताला जाण्यास अवकाश होता. कदाचित काही कारणास्तव तो थांबला होता. एक्सप्रेस वे वरून गाडी एकशे साठ ते एकशे एंशीच्या वायुवेगाने समोर जात होती. सहालेनच्या त्या चिकण्या रस्त्यावर मावळत्या सूर्याचे लालसर प्रतिबिंब काळ्या शस्त्राने चिरत गाड्या चिं.... चिं... आवाज करत पुढे सरकत होत्या. डिव्हायडरच्या अगदी जवळच्या लेनला नचिकेतची गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत पुढे जात होती. टोल नाक्यावर गाडी थांबली. ड्रायविंग सीटच्या बाजूला नचिकेतची आयुष्याची सोबतीनं आपल्या इवल्याश्या नेत्रांनी, अनभिज्ञ मनाने सभोवार बघणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन बसली होती.

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 17/01/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव
डॉ.आनंद यादव
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्‍या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ.

उत्तरायण

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 17/01/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षी १४ जानेवारीला संक्रांत होती. ती कधी १३ तारखेला येते कधी १५ ला! त्याचं कारण मला माहित नाही. पण असं म्हणतात की त्या दिवशी सूर्य मकरराशीत प्रवेश करतो म्हणून ती मकरसंक्रांत. आता या मकरसंक्रांतीचं काय महत्त्व, तर तेव्हापासून म्हणे सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना भूगोलात शिकलेलं आठवत असेल की उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो २२ डिसेंबर या दिवशी, तर मग संक्रांत जानेवारीत का येते? पृथ्वीवर ऋतू होतात ते पृथ्वीचा आस कलता असल्यामुळे! या आसाचा उभ्या सरळ रेषेशी सध्या साधारण २३.५ अंश एवढा कोन आहे.

कुणी सांगेल का ?

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 17/01/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळ पावा वरील पाककृती या स्थळाचा विशेष चाहता आहे. या सदरावरील मान्यवर मंडळी ना माझी एक विनंती आहे की कृपा करून कुणी माझ्या एका शंकेचे निरसन कराल का ? मी जेव्हा पण इडली हा पदार्थ करतो तो नेहमी बरोबर होत नाही इडली ही जड होते ती मऊ होत नाही म्हणजे हलकी होत नाही मला फक्त ती कृती कुणी सांगेल का ? की ज्यामुळे इडली ही मऊ करता येईल...............

"नात॑......!!!!"

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी शनिवार, 17/01/2009 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
:D ;;) नात॑......!!! एक नात॑ जन्माच॑, ते फक्त असत॑ आईच॑, अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑, येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !! एक नात॑ रक्ताच॑, जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑, ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !! एक नात॑ कर्माच॑, ज्यात असते कसोटी साठी निष्ठा, जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !! एक नात॑ प्रेमाच॑, जिथे असतो एक विश्वास, दोन शरीर॑ अन् एक श्वास....!! एक नात॑ मैत्रीच॑, महत्त्व यात आहे वेळेच॑, पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!