उत्तरायण
यावर्षी १४ जानेवारीला संक्रांत होती. ती कधी १३ तारखेला येते कधी १५ ला! त्याचं कारण मला माहित नाही. पण असं म्हणतात की त्या दिवशी सूर्य मकरराशीत प्रवेश करतो म्हणून ती मकरसंक्रांत. आता या मकरसंक्रांतीचं काय महत्त्व, तर तेव्हापासून म्हणे सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो. आपल्यापैकी बर्याच लोकांना भूगोलात शिकलेलं आठवत असेल की उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो २२ डिसेंबर या दिवशी, तर मग संक्रांत जानेवारीत का येते?
पृथ्वीवर ऋतू होतात ते पृथ्वीचा आस कलता असल्यामुळे! या आसाचा उभ्या सरळ रेषेशी सध्या साधारण २३.५ अंश एवढा कोन आहे. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरताना उत्तर गोलार्धाचा भाग, या कोनामुळे, सूर्याकडे रोखला जातो तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. आणि बरोब्बर सहा महिन्यांनी पृथ्वी फिरली की दक्षिण गोलार्धाचा भाग सूर्याकडे रोखला जातो आणि तिकडे उन्हाळा येतो आणि आपल्याकडे हिवाळा! जेव्हा पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेमधे फिरताना 'हे दक्षिण गोलार्धाचं सूर्याकडे रोखलं जाणं थांबतं' तो दिवस असतो २२ डिसेंबर; हाच तो दिवस ज्या दिवशी दक्षिण गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो आणि उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस.
पृथ्वीला वेगवेगळ्या गती आहेत. सहा आत्ता चटकन आठवत आहेत पण तो विषय वेगळा आहे*. ते अवांतरात बघा. त्यापैकी दोन महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला रोजच्या(?) व्यवहारात दिसतात, एक म्हणजे परिवलन (स्वतःभोवती फिरणे) आणि दुसरं परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे). आणखी एक आहे परांचन. पृथ्वीचा आस ध्रुवतार्याकडे रोखलेला असतो, पण तो तिथेच स्थिर नाही. तो आस स्वतःभोवतीच एका वर्तुळाकार कक्षेत फिरतो, ती पृथ्वीची परांचन गती. म्हणजे या गतीमुळे पृथ्वीचा ध्रुवतारा बदलतो. आहे तोच तारा पुन्हा उत्तर ध्रुव बनण्यासाठी २६००० वर्ष लागतात किंवा आसाला स्वतःभोवती एक वर्तुळ पूर्ण करायला २६००० वर्ष लागतात. त्यामुळे पृथ्वीचे ऋतू 'सरकतात' किंवा जी संक्रांत १४ जानेवारीला यायची ती खरी आता २२ डिसेंबरला आली पाहिजे. २६००० वर्षांत संक्रांत मागे येऊन येऊन पुन्हा २२ डिसेंबरला येईल. किंवा पृथ्वीच्या 'दक्षिण गोलार्धाचं सूर्याकडे रोखलं जाणं थांबतं' तो दिवस १४ जानेवारीपासून सरकून आता २२ डिसेंबरपर्यंत आला आहे आणि तो अजूनही मागे मागे सरकत आहे. तुम्हाला कदाचित वेगळं असणारं 'टिळक पंचांग' माहित असेल, ते वेगळं आहे याच कारणामुळे! टिळकांनी पंचांग या परांचन गतीनुसार बदललं, आधुनिक केलं. (गीतारहस्य किंवा त्यांच्या आणखी कोणत्या ग्रंथात याचा उल्लेख आहे.) तर हे झालं संक्रांत आणि उत्तर गोलार्धातला सगळ्यात लहान दिवस एकाच दिवशी न येण्याचं कारण!
पण त्यातही अजून थोडा किचकटपणा आहे. सगळ्यात मोठी रात्र २२ डिसेंबरला असली तरीही सगळ्यात उशिरा सूर्योदय आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त २२ डिसेंबरला होत नाहीत. २००८ सालात पुण्यात सगळ्यात लवकर सूर्यास्त झाला संध्याकाळी ५:५६ ला, १५ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत आणि २००९ सालात सगळ्यात उशीरा सूर्योदय झाला/होणार सकाळी ७:१०ला १५ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात! (ही गणितं मी केली नाहीत; www.timeanddate.com या संस्थळावरून मी ही माहिती गोळा केली.) याचं कारण आहे पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षेतली गती** जी शून्य नाही. कक्षेतल्या गतीमुळे उशीरा सूर्योदय आणि लवकर सूर्यास्त या घटना २२ डिसेंबरला होत नाहीत. सूर्याचा आकाशातला रोजचा भासमान मार्ग हे एक वर्तुळ, खरंतर वर्तुळाचा एक भाग असतो. जर पृथ्वी स्वतःच्या कक्षेत फिरत नसती तर रोजची ही वर्तुळं समकेंद्री (मराठीत concentric)असती, (खरंतर एकच वर्तुळ झालं असतं.) पण असं पकडू या, की पृथ्वी खूपच मंदगतीने फिरत आहे, ३६५ दिवसांच्या ऐवजी ३६५ वर्ष म्हटलं तर पुरेल, तर ही वर्तुळं (जवळजवळ) समकेंद्री असती आणि उशीरा सूर्योदय आणि लवकर सूर्यास्त या घटना २२ डिसेंबरलाच झाल्या असत्या. आता याची तुलना चंद्र रोज ५० मिनिटं उशीरा उगवतो याच्याशी करता येईल. चंद्राच्या बाबतीत ही घटना दिसते म्हणून त्या उदाहरणाचा वापर करू या.
चंद्र रोज ५० मिनीटं उशीरा उगवतो. कारण चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो तेवढ्या वेळात चंद्र पृथ्वीभोवती थोडा फिरलेला असतो (साधारण ३६०*(५०/(२७*२४*६०)) एवढे अंश) आणि तेवढं जास्तीचं अंतर फिरायला पृथ्वीला ५० मिनिटं लागतात, त्यामुळे चंद्र रोज ५० मिनिटं उशीरा उगवतो. तसंच जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसती किंवा खूपचकमी वेगात फिरत असती तर २२ डिसेंबरलाच सर्वात उशीरा सूर्योदय आणि सर्वात लवकर सूर्यास्त दिसला असता.
अवांतरः
*पृथ्वीच्या आत्ता आंतरजालाच्या मदतीशिवाय आठवलेल्या सहा गती:
१. परिवलन - स्वतःभोवती फिरणे, कालावधी २४ तास = १ दिवस
२. परिभ्रमण - सूर्याभोवती फिरणे, कालावधी ३६५ दिवस = १ वर्ष
३. परांचन - पृथ्वीचा परिवलनाचा आस आपल्याभोवती फिरतो, कालावधी ~ २६००० वर्ष
४. Nutation / न्यूटेशन (मराठी शब्द?) - या आसाचा कोन जो सध्या २३.५ अंशात कललेला आहे, तो २२ अंश ते २५ अंश या मर्यादेत बदलत असतो, कालावधी ~ ७२००० वर्ष
५. सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो. गेल्या १३ अब्ज वर्षात (विश्वाचं वय साधारण हे एवढं आहे अशी हल्ली फॅशन आहे) सूर्याने २० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत.
६. आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरताना सूर्य आकाशगंगेच्या प्रतलाच्या (plane) खाली-वर simple harmonic motion मधे फिरतो. त्याचा कालावधी आता आठवत नाही.
**पृथ्वीची कक्षा वर्तुळाकार नाही. सरलीकरणासाठी आपण कक्षा वर्तुळाकार आहे असं म्हणतो पण सगळ्याच ग्रहांच्या (आणि उपग्रहांच्या ग्रहांभोवतीच्या कक्षाही) कक्षा लंबवर्तुळाकार आहेत. आणि त्यामध्ये सूर्य दोनपैकी एका केंद्रकावर आहे, (केंद्र नाही). त्यामुळे आपल्या कक्षेत दोन विशिष्ट बिंदूंपाशी पृथ्वी असताना ती सूर्याच्या एकदम जवळ किंवा एकदम लांब असते. जेव्हा जवळ असते तेव्हा तिचा आपल्या कक्षेतला वेग सर्वात जास्त असतो आणि लांब असताना सगळ्यात कमी. आणि पृथ्वी सगळ्यात जवळ असते तो दिवस आहे ४ जानेवारी जो या २२ डिसेंबरच्या खूपच जवळचा दिवस आहे. पण वेगवेगळे ऋतू असण्याचं ते कारण नाही.
तर मुख्य प्रश्नः संक्रांत १४ जानेवारीला का येते किंवा या दिवसांचं महत्त्व काय? मला नक्की माहित नाही पण मला जे माहित आहे त्याप्रमाणे आता संक्रांत १४ जानेवारीच्याऐवजी २२ डिसेंबरला साजरी करावी. क्वचितच संक्रांत १३ किंवा १५ जानेवारीला का येते याचं उत्तरही मला माहीत नाही. तुम्हाला माहित असेल तर थांबलात काय, लिहा प्रतिसाद!
वाचने
24823
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
छान
वेगळी
चांगला लेख
In reply to चांगला लेख by आनंद
सहमत
In reply to चांगला लेख by आनंद
हेच
खरंच
अदिती
In reply to अदिती by विनायक प्रभू
चांगली शंका!!
In reply to चांगली शंका!! by पिवळा डांबिस
बाबा
In reply to बाबा by विनायक प्रभू
महाभारत ---->>>>>>>
In reply to चांगली शंका!! by पिवळा डांबिस
बरोबर!
प्रघात
In reply to प्रघात by सुनील
उगवत्या सूर्याला दंडवत
सातवी गति
लेख आवडला
बाप रे
छान लेख
In reply to छान लेख by धनंजय
अधिक महीने
In reply to अधिक महीने by llपुण्याचे पेशवेll
अधिक मास!
In reply to अधिक महीने by llपुण्याचे पेशवेll
शुद्धिपत्र : धनु->मकर; चांद्र महिन्यांची सौर नावे!
In reply to शुद्धिपत्र : धनु->मकर; चांद्र महिन्यांची सौर नावे! by धनंजय
जरा
In reply to छान लेख by धनंजय
दोन वेगवेगळ्या पद्धती
In reply to छान लेख by धनंजय
किंचित सुधारणा
छान लेख.
भारतीय गणित
In reply to भारतीय गणित by केदार
:)
मस्त मांडणी !
सुंदर
चांगली
In reply to चांगली by देवदत्त
सहमत
In reply to सहमत by कोलबेर
आदितीबाई,
सन्क्रान्
छान लेख
छान लेख.
चांगली
म्हणे
In reply to म्हणे by ३_१४ विक्षिप्त अदिती
:)
छान
छान लेख
+१
वाचन चालू
तात्पर्य
In reply to तात्पर्य by सुनील
थोडक्यात
In reply to थोडक्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
कित्ती कित्ती ग बाई तु हुषार !
In reply to थोडक्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
लीप सेकंद
In reply to लीप सेकंद by प्रदीप
अवांतर :
In reply to थोडक्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
परांचन
:-०
अभ्यासपूर
छान लेख आहे. खूपच माहितीपूर्ण
मूळ प्रश्नाचे उत्तर
उत्तरेत व महाराष्ट्रातल्या शुद्ध व कृष्ण पक्ष यांमध्ये कसा फरक?
In reply to उत्तरेत व महाराष्ट्रातल्या शुद्ध व कृष्ण पक्ष यांमध्ये कसा फरक? by चैतन्यकुलकर्णी
संवत्सर/शक
In reply to उत्तरेत व महाराष्ट्रातल्या शुद्ध व कृष्ण पक्ष यांमध्ये कसा फरक? by चैतन्यकुलकर्णी
आपल्याकडे