Skip to main content

प्रवाह..आणि उत्तर

लेखक प्राजु यांनी बुधवार, 04/02/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
शिकवीत वृत्त झाला तो निवृत्त फिरूनी प्रवृत्त विडंबना आणली ती लाट सोडूनिया काठ सारे पाठोपाठ धावतात 'धुकट सकाळ' कधी ती 'फुकट' अन ती 'चिकट' होत राही डांबिस लेखणी लिहूनी 'कोकणी' जाई विडंबनी हात धुण्या "म्हणजे' ते काय कोणी ते सांगावे कितिदा लिहावे मोज नाही.. विसरा 'खोबार' लेखणीची धार होऊनी सुमार बोथट का?
Taxonomy upgrade extras

आलो शरण तुला...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 04/02/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
आलो शरण तुला... कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मरे, क्षमा करी लेकरा. आलो शरण तुला ईश्वरा... संसाराचे पाश तोडता, इथे मोहवी विकारवशता. मन गुंतावे चरणी तुझीया, लोभ सरावा पुरा. आलो शरण तुला ईश्वरा... उदासीनता मनास व्यापी, रुदन येतसे पश्चातापी. भवपन्थातुनी मला सोडवी, करूनी अवघी त्वरा. आलो शरण तुला ईश्वरा...
Taxonomy upgrade extras

कोल्हे-कुई

लेखक पुष्कर यांनी बुधवार, 04/02/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

लेखक केदार यांनी बुधवार, 04/02/2009 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
"दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते खचो लागली तेवि मते कुराणेही खंडली रामराणी भद्रकाली रणरंगी कृद्ध झाली प्रलायाची वेळ आली मुगलहो सांभाळा " कवी गोविंद मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे.

मुगाचे लाडू.

लेखक रेवती यांनी बुधवार, 04/02/2009 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पिवळी मूगडाळ एक कप, पिठीसाखर, साजूक तूप, जायफळ, वेलदोडा, मिक्सर व सपिटाची चाळणी. कृती : जड बुडाच्या कढईमधे मुगाची डाळ मध्यम आचेवर कोरडी भाजावी. किंचित गुलाबी रंग आला की पुरे. ताटात पसरून गार होऊ द्यावी. गार झाल्यावर मिक्सरमधे बारीक दळून घ्यावी. सपिटाच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे. वर राहिलेला चाळ पुन्हा एकदा दळून घ्यावा आणि चाळून घ्यावा. हे चाळलेले पीठही किंचित रवाळ असावे. आता गरम कढईत पीठ घालून परतायला सुरुवात करावी व एकीकडे लागेल तसे तूप घालत रहावे. ह्या लाडवांना बेसनाच्या लाडवांइतके तूप लागत नाही तेव्हा बेताने घालावे.

बिकट सकाळ

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 04/02/2009 03:29 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा धनंजय यांची वाद या प्रकारात घातलेली  कविता धुकट सकाळ
बिकट सकाळ
***
किती 'डाउ' पडला दुपारी बघितले
नि वातावरण स्तब्ध नि:शब्द झाले
महीना अखेरी असावे तसे हे
पाहा सर्व खाते रिकामे रिकामे
*
नि जालावरी आयडी हे कुणाचे
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे  तयांच्या कुणी गुप्त "तात्या"
असेल का? विचारून शहारलो मनात मी
***
केशवसुमार

(चिकट सकाळ)

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 04/02/2009 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर मी कधीच चहा पीत नाही, बनवत तर त्याहून नाही. पण एकदा चुकून पहाटे उठलो. मस्त थंडी होती. गरम चहाचा मूड आला. अर्धवट झोपेत एक कप चहात ४-५ चमचे साखर पडली. पहिल्या घोटातच झोप उतरली. मग बराच वेळ तो कप तसाच ठेवला होता. पुढचा घोट घ्यायची हिंमत होत नव्हती . तेवढ्यात चहासाखरेचे डबे वर कपाटात ठेवताना कपाला धक्का लागून तो कलंडला, तो चिकट चहा ओट्यावरून ओघळला आणि मी संकटातून वाचलो.

एक अंमळ मजेदार बातमी..

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 04/02/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'इ-सकाळ'मधे ही बातमी वाचनात आली. बातमी ऐकून मजा वाटलीच आणि या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने आपण एका मोठ्या जंगी सामन्यापासून दूर राहीलो याबद्दल खेदही वाटला. प्रस्तुत बातमीत अनेक समिक्षकानी वेगवेगळ्या कविना आणि त्यांच्या कवितांना धारेवर धरले. तसेच कवींची केवळ रोमँटिक कविता केल्याबद्दल हेटाळणी केली. नंतर एका कविराजानी या सर्व टीकाकारांचा उपरोधिक शब्दात समाचार घ्यायला सुरुवात केल्यावर मात्र संबंधित समिक्षक चिडले व गोंधळ सुरू केला. अधिक माहीती वरील दुव्यावर वाचावी.

उत्साहाचं भरीत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 04/02/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'वर सातत्याने येत असलेल्या पाकक्रुतीच्या प्रकारांपासून प्रेरणा घेऊन आपणही अनुभवलेला एखादा पाकक्रुतीचा प्रकार इथे टाकावा, असं वाटलं. तोच हा प्रयत्न. ------------ उत्साहाचं भरीत! साहित्य ः प्रचंड उत्साह, चवीपुरता चटपटीतपणा, शोभेपुरता रंगेलपणा आणि बचकाभर ऊर्जा. कृती ः प्रथम प्रचंड उत्साह शरीर आणि मनभर घुसळून घ्यावा. अंगात सर्वत्र भिनवून घ्यावा. वाटल्यास आपल्या पूर्वानुभवाचाही त्यासाठी वापर करावा. मग त्यात चवीपुरता चटपटीतपणा चांगला मिसळून घ्यावा.

तोतयांचे बंड!!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 03/02/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, गेल्या दोन दिवसांत मिपावर एक महत्वपूर्ण घटना घडली...... तुमच्या लक्षांत आलीये का? या दोन दिवसांत मिपावर एकंदर सहा (चूभूद्याघ्या) विडंबनं सादर झाली.... धनंजयने "धुकट सकाळ" लिहिली त्यावर बेसनलाडवाचं "फुकट सकाळ" हे विडंबन आलं.