मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवाह..आणि उत्तर

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शिकवीत वृत्त झाला तो निवृत्त फिरूनी प्रवृत्त विडंबना आणली ती लाट सोडूनिया काठ सारे पाठोपाठ धावतात 'धुकट सकाळ' कधी ती 'फुकट' अन ती 'चिकट' होत राही डांबिस लेखणी लिहूनी 'कोकणी' जाई विडंबनी हात धुण्या "म्हणजे' ते काय कोणी ते सांगावे कितिदा लिहावे मोज नाही.. विसरा 'खोबार' लेखणीची धार होऊनी सुमार बोथट का? ती ग्रीक कहाणी आस्तिक होऊनी सांगे तत्वज्ञानी आवलिया होता धार धार लेखनाचा वार आता का सुमार मिपाकर? मिपाचे जे धन सशक्त लेखन वाचण्यास मन आतुरले खेळ हाच रोज विडंबने तेज मिपावर फेज येत राही.. प्राजू म्हणे कोणी द्याल का उत्तर शिंपूनी अत्तर साहित्याचे.. - प्राजु

वाचन 7313 प्रतिक्रिया 0