(मनोक्रमी मिपाकर)
आजकाल मिपावर राहुन, जळाऊगिरी करीत आणि फक्त मिपावर येणार्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, मिपाच्या मोठ्या भावंडांची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या मिपाकर लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.
ह्या मिपाकर असलेल्या, पण लेखात प्रमाण भाषा वापरण्याचा आग्रह धरणार्या लोकांची ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मिपाकर माणसाला खरंच गरज आहे कां?
इथल्या ज्या कायम निवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित लेखक म्हणून दिवाळी अंकात लेख लिहायला बोलवतात.
मिसळपाव