Skip to main content

फुंदके.... (खांदेशी भाषेत भेंडके) आणि मानमोडे

लेखक योगिता_ताई यांनी गुरुवार, 26/02/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
फुंदके.... साहित्य: १. तुरीची डाळ ३ वाटी २. हरभरा डाळ अर्धी वाटी ३. एक चमचा हळद ४. लाल तिखट चवीनुसार ५. एक चमचा धणे पावडर ६. लसूण- आलं पेस्ट दोन चमचे ७. उभे चिरलेला कांदे २ ८. चवीपुरते मीठ कृती : तुर व हरभरा डाळ घेऊन ती 4-5 तास भिजत ठेवा. नंतर डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाका. हे कोरडेच मिश्रण मिक्सर मधुन रवाळ वाटून घ्या. जास्त पेस्ट बनऊ नका. मिश्रणात एक चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, दोन चमचे लसूण- आलं पेस्ट, चवीपुरते मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित कालवून घ्यावे. मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे.

मटर पनीर

लेखक भाग्यश्री यांनी गुरुवार, 26/02/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
mp साहीत्य : १ मोठा कांदा, टोमॅटो प्युरी, ८-१० काजु, मटार, पनीर , आलं-लसूण पेस्ट, जीरे हळद, तिखट, मीठ, तमालपत्र,कसुरी मेथी, दालचिनी पुड कृती : प्रथम पनीरचे तुकडे करून बटर मधे शॅलो फ्राय करणे.. काजु पाण्यात वाफवून त्यांची पेस्ट करणे.. कांदा तेलात परतून त्याची प्युरी करणे. ( मी तेलात न परतता केली. कधी कधी कडूसर चव येते म्हणून आधी परतून घ्यावा..

वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां

लेखक दशानन यांनी गुरुवार, 26/02/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां दम ले ले घड़ी भर ये छैंया पाएगा कहां बीत गये दिन, प्‍यार के पल छिन सपना बनी वो रातें भूल गये वो, तू भी भुला दे प्‍यार की वो मुलाक़ातें सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहां ।। कोई भी तेरी राह ना देखे, नैन बिछाए ना कोई दर्द से तेरे कोई ना तड़पा, आंख किसी की ना रोई कहे किसको तू मेरा, मुसाफिर जाएगा कहां ।। कहते हैं ज्ञानी, दुनिया है फ़ानी पानी में लिखी कहानी है सबकी देखी, है सबकी जानी हाथ किसी के ना आई, कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जायेगा कहां ।। दम ले ले घड़ी भर ये छैंया

ओबामाईड आय-टी व्या. नी करण्याचे उद्योग

लेखक त्रास यांनी गुरुवार, 26/02/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
ओबामांनी भारतीय आय-टी व्यावसायिकांना Obamaed करण्याचे घाटले आहे. सक्काळपासून विचार करतो आहे की, आता भारतीय आय-टी व्यांना बाह्यस्रोत (मराठी- आऊट्सोर्सिंग) बंद केल्यावर कोणते उद्योग करता येतील. मला काही सुचलेले असे. - १. ... २. ...

मराठी अभ्यास केंद्र : उद्घाटन

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 26/02/2009 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
स.न.वि.वि. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले आहे. ग्राममंगलच्या पुढाकाराने राबविण्यात येणा-या द्विभाषा प्रकल्पात मराठी अभ्यास केंद्राचा सहभाग असणार आहे. त्या प्रकल्पाचे कामही या कार्यालयातून चालणार आहे. प्रसिद्ध चित्रकार श्री. सदाशिव कुलकर्णी यांनी परिश्रमपूर्वक या कार्यालयाला नवीन साज चढवला आहे. महाराष्ट्र फौंडेशनच्या मदतीने कार्यालयाचे संगणकीकरण झाले आहे.

मुलींची नावे इ / आ कारान्त, मुलांची अ कारान्त असे का?

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 25/02/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक माझ्याआधी हे बरयाच जणांनी निरिक्षण केलेच असेल की मुलींची नावे बहुतेक करुन इ कारान्त किंवा आ कारान्त असतात. उदा प्राजक्ता, नयना, साधना, अरुणा, सुषमा, सोनिया, अंबिका,सरोजिनी, रेवती, अदिती,वगैरे. अगदी इंग्रजी नावे पहिली तरी लिसा, मार्था, ब्रेन्डा, अशीच बहुतेक आढळतील. ह्यात पूनम, सोनम, सुझान, एलिझाबेथ, केट असे काहीच अ कारान्त अपवाद दिसतील. तर असे का? तसेच मुलांची नावे संजय, महेश,चित्तरंजन, सुनीत, मिलिंद,विनायक, बिपिन, प्रमोद, पराग, यशवंत, शिरिष, आशिष, सुनील , सचिन, कपिल अशी बहुतेक अ कारान्त आढळतील हे ही कोण समजून सांगू शकेल काय? आडनावांच्या बाबतीत कोणाचे काही निरिक्षण आहे काय?

रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 25/02/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
'रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची' ह्या सुवर्णमयी ह्यांच्या सुंदर गझलेने आमच्या मनात जुन्या 'भेटीगाठींच्या' वेदनादायक आठवणींचे काहूर पुन्हा जागवले ते असे, रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी का हव्याशा वाटणार्‍या पोरटीला टाळले मी फक्त असते तीच सोबत हेच होते मानले मी .................................................... फोन नंबर दे म्हणालो मी तिलाही पाहता.. मग- भेटण्याचे , रातच्याला.. मनसुबे रे बांधले मी रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी अन् कुल्यांना पाय लावुन धावण्याचे..

भारुड-२

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 25/02/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर आलेत मिपाकर आलेत गाड्ग्यात बघुकी लोटक्यात बघु काय सांगु आता मिपाकर आलेत मिपाकरांसाठी लिहीन म्हटले लेख 'जन्माचा क्रिप्टिक' ची मेख मी का लेख लिहिण्याजोगा नव्हतो व्हय मिपाकर आलेत मिपाकर आलेत मिपाकरांसाठी टाकीन म्हटले 'पाककृती" साध्या वाक्यात तरणे बघती भलतीच आकृती मी काय पाक़कॄती टाकण्याजोगा नव्हतो व्हय मिपाकर आलेत मिपाकर आलेत मिपाकरांसाठी करीन म्हटले चारोळ्या भीती वाटते घालतील मलाच गोळ्या मी काय चारोळ्या करण्याजोगा नव्हतो व्हय मिपाकर आलेत मिपाकर आलेत मिपाकरांसाठी कुटीन म्हटले काथ्या संपादनाची धम़की देतो तात्या मी काय काथ्या कुटण्याजोगा नव्हतो व्हय. मिपाकर आलेत मिपाकर आलेत गाडग्यात बघु की
Taxonomy upgrade extras