Skip to main content

<<रात्र थोडी जाहली पण>>

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 04/03/2009 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कराज यांनी केलेल्या "रात्र थोडी जाहली पण" याचे विडंबन. पुष्कराज: ह. घ्या. कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या पिण्याची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या चाकण्याची नुकतीच वाटी सारी सरुनी चाकण्याला केळी आली कहर पुन्हा झाला असा की जेवण्याची वेळ झाली दारूस माझ्या आजवरी मी गाली कैक हो वाहिली गंध ऐसा त्या सूराचा नशा आजही राहीली त्याच नशेने अजुनी पिण्याला बहर आहे रात्र थोडी जाहली पण सोंगे बाकी फार आहे - नाटक्या गैरसमज नको माझ वय फक्त ८५ आहे

गाण्याची शिकवणी

लेखक रामदास यांनी बुधवार, 04/03/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्हटलं चुकून, मलाही शिकवा हो गाणं. तर म्हणतात कसे माझ्या मनातलं बोललीस. कितीतरी दिवसात बघ जवार काढली नाही घरच्या तंबोर्‍याची. * * * * म्हणे, आधी थोडी नोमथोम मग पलटा ताना मुरकी. तिय्या घेउन येउ समेवर नंतर ठेवणीतली अनवट सरगम. म्हटलं हात धरून गाणं शिकवतात का ? म्हणे, तुला म्हणजे समज कशी बिलकूल नाही राणी. आधी तानपुर्‍याची मोकळी करावी लागते गवसणी.

लोकसभा निवडणुका: २००९. पश्चिम भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 03/03/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्या निवडणुक अंदाजाच्या पुढील भागात आता वळू या पश्चिम भारताकडे. (डिस्क्लेमरः हे अंदाज राजकिय परिस्थितीचे थोडेफार निरिक्षण करून मी बांधलेले अंदाज आहेत. ते किती बरोबर किंवा चुकीचे आहेत यासाठी १६ मे पर्यंत थांबावे लागेल) १) गुजरात: (एकूण जागा: २६) गुजरातमध्ये मार्च १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ऑक्टोबर २००१ पर्यंत केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात भाजपाची नाव बुडती झाल्यावर पक्षाने संघप्रचारक नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले.

रंग मेन्दीचा

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 03/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मेन्दीचा रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे? अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी? क्रान्ति

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा!!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 03/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळपासून इथे बर्फवृष्टी सुरु होती काल संध्याकाळी संपली! मिसळपावावरही अशीच धमाल हास्यवृष्टी घडवून आणण्यात कमालीचा उ(हु)च्च सहभाग असलेल्या सगळ्या बिनीच्या कलावंतांना ही आरती समर्पित!

<<गुत्ता>>

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 03/03/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
ह्ये आमच पन बॅकग्रांवड: सगला जलम खारपाड्यान राऊन आमच्या सरवांच्ये गूडग्यावर जरा जादाच परनाम जाला. घरसूदा येवड यकट क सगल्यान जवलचा शेट्टी आन्नाचे गुत्याव सूदा ४५ मीन्ट चालाला लागाच. सनक http://www.misalpav.com/node/6396 आंदारलेल्या गूत्याजवलच चीप जीपड न बाजुचे गटारान बेवड्यांच वकनं वॉक वॉक आतड जालनारी दारू पन ती न चडनं सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज खॉक खॉक खॉक दुपारच्या येलेत तारेतच उटणं न अन भुकेल्या पोटी गावटी कुत्र्यांच भुकनं भॉक भॉक भॉक भॉक भॉक
Taxonomy upgrade extras

<ते>

लेखक ब्रिटिश टिंग्या यांनी मंगळवार, 03/03/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग डिंग डिंग डिंग....... संपला एकदाचा कॉल. आमच्या टीममध्ये दररोज ३:३०ला स्टँडअप कॉल असतो. चहा-बिडी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, डीजे, अमित जोशी, सीपी आणि प्रभाकर सौमिनारायणन (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण कॉल चालु असताना क्लायंटकडुन अन् कॉल संपल्यावर पीएमकडुन मजबुत शिव्या खातात) आणि इतर फ्रेशर पब्लिक (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमच्या कँटिनच्या टेबलावर गप्पा मारत बसलो होतो.

बालजगत

लेखक अनिल सोनुने यांनी मंगळवार, 03/03/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी अनिल प्राथमिक शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी संकेतस्थळ सुरु केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे नविन स्वरुपात बालजगत सुरु केले आहे.

<तो>

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 03/03/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............ (आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो. आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते. मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो' सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.