Skip to main content

मिश्र डाळींची भजी

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 05/03/2009 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आमच्या घरी कोणाला जेवायला बोलावले असेल, कोणाचे केळवण, सत्यनारायण वगैरे अश्या काही पूजा असतील तर जेवणात पाहिजेतच अशी ही मिश्र डाळींची भजी.
साहित्य :- १ वाटी उडीद डाळ १ वाटी मुगाची डाळ १ वाटी हरभर्‍याची डाळ ४-५ हिरव्या मिरच्या १ इंच आलं १ लहान चमचा धनेपूड १ लहान चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ तळणीसाठी तेल कृती:- प्रथम उडीद डाळ, मुगाची डाळ आणि हरभर्‍याची डाळ एक

बरी नव्हे ही थट्टा!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 05/03/2009 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थानी म्हटल आहे 'टवाळा आवडे विनोद' म्हणुन काही लगेच समर्थांना विनोदाचे वावडे होतं असे म्हणता येणार नाही. थट्टा मस्करी, टिंगल, विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन, खिल्ली, चेष्टा गंम्मत नसती तर जगण्यातला (जीवन शब्द नको रे बाबा ) आनंद घेता आला नसता. विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेले विनोदाचे कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्ये पोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या मानसिकतेतुन जन्मणार प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली.

ती पहाट

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 05/03/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ती देखणी पहाट हासुनी हळूच गाली फुलवीत पाकळ्यांना वार्‍यासवे निघाली दंवबिंदूचे तुषार उधळीत आसमंती थरकून पैंजणाना जणू चालते रति ती रक्तिम ओठ हसरे दिसताच पाखरांना घुमवीत शीळ निघती नादावूनी स्वरांना लयदार चाल बघुनी तिजला फुले म्हणाली घेऊनी गंध वारा कोठे गडे निघाली ? लाजूनी ती पहाट त्यांना हळूच सांगे दिवसाशी घेत असते जुळवून प्रेम धागे
Taxonomy upgrade extras

बाकी ते रुसणेच खरे....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/03/2009 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे ते लाजणे गालात आठविता गं रात्र सरे शब्द ओलावणे ओठात स्मरण्यां दिवस ना पुरे तु नसशी कवेत आता बघ अशांत मन झुरे बांध वेदनांचा तुटेना शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे मन विसरु पाही तुला मज सुन्न एकांत सावरे पुन्हा डोकावणे स्वप्नात जखमांचे ते भान ना उरे अन थांबलेले डोळ्यात आसवांचे वाहते झरे लटके ओशाळणे तुझे बाकी ते रुसणेच खरे विशाल कुलकर्णी

बिरडया॑चा भात

लेखक चैत्राली यांनी गुरुवार, 05/03/2009 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २ वाट्या बासमती ता॑दुळ. २ वाट्या भिजत घालून सोललेले कडवे / गोडे वाल. गोडा मसाला १ चमचा. काळा मसाला १/२ चमचा. दाण्याचा कुट १ मोठा चमचा. हळ्द १ चमचा. मीठ अ॑दाजाने. हि॑ग १ चमचा. मोहरी १ चमचा. लाल ति़खट आवडीनुसार. कडवे वाल घेतल्यास चवीपुरता गुळ. कढीपत्त्ता. तेल २ मोठे चमचे. सजावटीसाठी कोथि॑बीर, किसलेले खोबर॑. कृती :- प्रथम ता॑दुळ व भिजत घालून सोललेले कडवे / गोडे वाल धुवुन निथळ्त ठेवावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात २ मोठे चमचे तेल टाकावे. तेल तापल्यावर मोहरी, हि॑ग, हळ्द व कढीपत्त्ता घालून खम॑ग फोडणी करावी. त्यात प्रथम वाल व ता॑दुळ घालून चा॑गले परतून घ्यावे.

खेळ दोन ओळींचा - ४

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/03/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच. फक्त यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे! ..... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी! शुभेच्छा!! मुमुक्षु

भूल

लेखक जयवी यांनी गुरुवार, 05/03/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

तुझे आगमन

लेखक जागु यांनी गुरुवार, 05/03/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु जेंव्हा येशील सुर्य तुला लाजलेला असेल चंद्र खट्याळ तुला डोकावत असेल चांदण्या लागतील कुजबुज करु दवबिंदुंची पाझर होईल सुरु रातराणी लागेल सुगंध पसरवू वार्‍याची झुळूक देईल चाहुल तुझ्या आगमनाची पाहुन तुला मी होईन बावरी राधा झाली होती जशी कृष्णासाठी तु शोधशील माझ्या नजरेतील प्रिती ठेवील गुपित नजर माझी झुकली गारवा करेल आतुर तुला स्पर्शासाठी मीही असेन बेफान तुझ्या अंधारी गाढ मिठीसाठी.
Taxonomy upgrade extras

जिवलगा...

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/03/2009 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
जिवलगा ss राहीले दुर घर माझेss आशा भोसलेंनी गायलेले हे गीत पाहीजे आहे. कोठे मिळेल ते क्रुपया सांगता का?