निसर्गरम्य शिवथरघळ
बर्याच दिवसापुर्वी शिवथरघळ येथे जाण्याचा योग आला होता. आजकाल होणार्या उकाड्यामुळे अचानक या ठिकाणाची आठवण झाली.
तर शिवथरघळ..भोर तालुक्यापासुन थोड्याच अंतरावर असलेले हे छोटेसे ठिकाण. आजुबाजुला रम्य हिरवीगार दाट झाडी आणी अबोल शांतता, पण मधेच तिचा भंग करीत कोसळणारा प्रचंड धबधबा आणी त्यामुळे तयार झालेली घळई. अशा धबधब्याचे तुषार अंगावर उडतात तेव्हा अगदी अमृतवर्षाव झाल्यासारखे वाटते. खळखळ वाहणारे पाणी जणु संगीताचा अपरिचीत रागच छेडते जसे. मुक्तविहार करणारे पक्षी आणी त्यांच्याबरोबर खेळणारी थंड हवा. सुर्यामुळे सोनेरी झिलई मिळालेली रानफुले तर फारच मोहक वाटतात अशा वातावरणात.
मिसळपाव