Skip to main content

बोल

बोल

लेखक जागु
Published on शुक्रवार, 06/03/2009
काहीच का रे कळत नाही तुला प्रेमातल ? नेहमीच ते पुस्तकात नाक खुपसून बसायच ! डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा जाणशील तरी कधी तू माझ्या मनातली व्यथा ? मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ? पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ? म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते ! काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ? चंद्र तारे तोडायच नको बोलू ते सर्व काल्पनीक आहे पण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य काय अवघड आहे ?
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

याद्या 2348
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या मनातली व्यथा ? मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ? पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ? म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते ! काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ? सुंदर, मनातील भावना उत्तमपणे कवितेत उतरल्या आहेत... अभिनंदन ! आवडली मला कविता ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

आवडली कविता!

सौतन चश्मा बीचमे आये, नैन मिले कैसे? क्रान्ति

प्रमोद, राजे, क्रांती तुमच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ? क्या बात है ! आवडली तुमची तक्रार ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

एवढं लडीवाळपणे तक्रार केल्यावर रोज एक वाक्य नाहीतर ऊताराच येणार डायरेक्ट ... अफाट जगातील एक अडाणि.