Skip to main content

निसर्गरम्य शिवथरघळ

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 06/03/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसापुर्वी शिवथरघळ येथे जाण्याचा योग आला होता. आजकाल होणार्‍या उकाड्यामुळे अचानक या ठिकाणाची आठवण झाली. तर शिवथरघळ..भोर तालुक्यापासुन थोड्याच अंतरावर असलेले हे छोटेसे ठिकाण. आजुबाजुला रम्य हिरवीगार दाट झाडी आणी अबोल शांतता, पण मधेच तिचा भंग करीत कोसळणारा प्रचंड धबधबा आणी त्यामुळे तयार झालेली घळई. अशा धबधब्याचे तुषार अंगावर उडतात तेव्हा अगदी अमृतवर्षाव झाल्यासारखे वाटते. खळखळ वाहणारे पाणी जणु संगीताचा अपरिचीत रागच छेडते जसे. मुक्तविहार करणारे पक्षी आणी त्यांच्याबरोबर खेळणारी थंड हवा. सुर्यामुळे सोनेरी झिलई मिळालेली रानफुले तर फारच मोहक वाटतात अशा वातावरणात.

हा "विजय" कुणाचा?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 06/03/2009 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज महात्मा गांधींच्या आठवणी असलेल्या काही वस्तू भारताला परत एकदा मिळाल्या. याचा आनंद झाला आणि तसा होण्याची कारणे अशी:
  1. ऐतिहासीक व्यक्तींच्या वस्तु या त्या त्या राष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा ठेवा आहे. गांधीजींच्या वस्तू या नक्कीच भारतासाठी ठेवा आहेत त्यामुळे त्या भारतात संग्राह्य म्हणून राहणे महत्वाचे वाटते.
  2. एका भारतीय उद्योगपतीने, "विजय मल्या" ने $1.8 million ला ते विकत घेतले.
अर्थात आता कलगीतुरा चालू झाला आहे.

पाहिजे एकांत थोडा--

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 06/03/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे एकांत थोडा पाहिजे थोडा अबोला पाहिजे पहाट थोडी पाहिजे निशब्द वारा होउनी मग एक तेव्हा अंतरी मिसळून जाउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ मिटूनी तू डोळे तुझे ग काहीशी हरवून जासी स्पर्शता लाभे दिलासा तू मला बिलगून जासी छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही त्रुप्ताता देहात ही त्रुप्ताता विश्वास सार्‍या त्रुप्ताता श्वासास ही संपता पहाट थोडी काहीशी हुरहुर व्हावी धुसरत्या तारकांना भेटीचे संकेत देउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ -पुष्कराज
Taxonomy upgrade extras

एक विचार... :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 06/03/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार - बँकेत खाते उघडायला जशी ओळख लागते तशी ओळख यापुढे एखाद्या व्यक्तिला मिपावर नवीन सभसदात्व देतांना आवश्यक ठेवावी किंवा कसे यावर विचार सुरू आहे! जर हा विचार अंमलात आणायचा झाल्यास तो कश्या तर्‍हेने आणावा, कार्यपद्धती काय असावी यावरही विचार सुरू आहे! यामुळे कदाचित मिपावर नवनवीन सभासद होण्याची जी गती आहे, ती कमी होईल.

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर.

बोल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का रे कळत नाही तुला प्रेमातल ? नेहमीच ते पुस्तकात नाक खुपसून बसायच ! डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा जाणशील तरी कधी तू माझ्या मनातली व्यथा ? मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ? पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ? म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते ! काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ? चंद्र तारे तोडायच नको बोलू ते सर्व काल्पनीक आहे पण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य काय अवघड आहे ?
Taxonomy upgrade extras

मद्त

लेखक श्रेया यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसा साठी भेट म्हणुन उपयुक्त अशा कोणत्या वस्तु देता येतील माहिती असल्यास सुचवा

मायावति फॉर्म्युला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरप्रदेशात यशस्वी ठरलेला सोशल इंजिनि‌अरींगचा फॉर्म्युला महाराष्ट्रातही लागू करत बहुजन समाज पक्षाने राज्यात चार ब्राह्मणांना उमेदवारी दिली आहे. आपणास महाराष्ट्रात हा फॉर्म्युला यशस्वि होइल असे वाटते का?..बुध्धिमत्ता आहे पण जातिच पाठबळ नाहि..असा हा समाज पुन्हा या फॉर्म्युला द्वारे राजकारणात प्रभाव पाडु शकेल का?