Skip to main content

तू घरात नसताना ...

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही जरा रेंगाळतच पडलो होतो बिछान्यावर बरेच लोळून झाले पण झोप काही आली नाही आख्खी चादर लपेटून घेतली अंगाला पण तुझ्या मिठीची सर काही आली नाही तूझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली पण आठवणींचे गणित काही सुटले नाही तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही - अडाणि.
Taxonomy upgrade extras

हत्या !!!

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/03/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती . * "फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर..

मातिच्या मुंग्या

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... जाता जाता वेळ गेला कळले नाही कधी सरले बालपण... उचलली जीभ लावली टाळ्याला बोलू नका तूम्ही काहीपण... मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली हाती उरले फक्त वेडेपण... का म सु (काही महत्त्वाच्या सुचना) १. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्‍याने चोरली आहे असे समजावे. २. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. ३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी. ४.

भूल

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पांघरायला विस्मरणांची झूल नको आता! आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले, मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो (मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता) सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता, उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता! मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता
Taxonomy upgrade extras

जाधव सर

लेखक प्रमेय यांनी शनिवार, 07/03/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
पल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात. पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’. माझ्या मोठ्या भावाची ७वी. या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले.

(बोल)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं? नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं! मैत्रिणींना सांगायची ती दुसर्‍यांची लफडी नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा? मला म्हणे फोनवर बोलता येत नाही कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही? म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते! काय समजू मी की मेली तुझी भुक आहे? अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ? प्रेरणा: जागुताईंचे बोल

जुहू चौपाटी, सोबत मै शायर बदनाम चे स्वर आणि मी एकटाच..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 07/03/2009 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज बर्‍याच दिवसांनी संध्याकाळची सवड भेटली.. पोटापाण्याच्या व्यवसायाचं एक महत्वाचं काम होतं अंधेरीला. ते थोडं लौकरच उरकलं. किती वाजले होते माहीत नाही, परंतु आठ वाजून गेले होते. थोडी सवड होती.. डोक्यात 'मै शयर बदनाम..'चे स्वर रुंजी घालू लागले.. तसाच तडक निघालो आणि जुहू चौपाटीवर पोहोचलो. त्या आधी त्याच्या बंगल्याभोवती खुळ्यासारखा थोडा वेळ घुटमळलो.. आणि समोरच असलेल्या चौपाटीच्या पुळणीवर जाऊन बसलो..चौपाटी नेहमीप्रमाणेच गजबजली होती.. पाणीपुरी, भेळपुरी, अन् काय काय! मी मात्र तिथे एकटाच बसलो होतो.

(पाहिजे वीकांत मोठा)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

प्रवास

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 06/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास मन भिजवून गेल्या कोवळ्या स्मृतींच्या लाटा अजूनही चालते मी पूर्वसंचिताच्या वाटा रित्या आयुष्यासारखी वठलेली झाडे कुठे, कुठे पळसफुलांनी सजलेल्या रानवाटा कधी चालता चालता अडखळती पाउले, कधी मन ठेचाळते, सलतो उरात काटा किती वळणे घेऊन जाऊ किती मी दुरून? तुझ्या घराकडे जाती ओळखीच्या सा-या वाटा वेड्या मना, अविचारी, उतावीळ होऊ नको, तुझ्या क्षणिक मोहाचा उगा होईल बोभाटा नाही ठाव किना-याचा, असा प्रवास हा माझा, शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा क्रान्ति
Taxonomy upgrade extras