Skip to main content

कर्दे

लेखक सालोमालो यांनी रविवार, 08/03/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
नाव आहे चाललेली खेळकर संध्याकाळ क्रिकेट सागराच्या कुशीत अलगद विसावतांना

पुस्तक परिचय- नर्मदे हरं हरं (जगन्नाथ कुंटे)

लेखक चाणक्य यांनी रविवार, 08/03/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे हरं हरं' हे पुस्तक वाचलं. भन्नाट आहे. नर्मदा परिक्रमा करताना लेखकाला आलेल्या अनुभवांवर त्यांनी हे पुस्तक लिहीले आहे. जगन्नाथ कुंटे यांनी १९९९ पासून नर्मदा परिक्रमा करायला सुरुवात केली. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, "सद्गुरुंची आज्ञा झाली आणि निघालो. "जगन्नाथ कुंटे म्हणलं तर एक सामान्य माणूस, म्हणलं तर एक अवलिया. सिगरेट आणि चहा ही विशेष आवड. देव देव करीत बसत नाहीत, पण अध्यात्मात गती फार. त्यांनी एकूण ४ परिक्रमा केल्या आहेत, त्यापैकी पहिल्या ३ परिक्रमांदरम्यान आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहीले आहेत. भारतामधे वर्षानुवर्षे लोक नर्मदा परिक्रमा करत आहेत.

अचारी चिकन

लेखक शोनू यांनी रविवार, 08/03/2009 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू जर्सीतल्या एडिसन मधे शालिमार नावाचं एक रेस्टॉरंट आहे. तिथे ही डिश पहिल्यांदा खाल्ली होती आणि Love at first bite प्रकार झाला. त्यानंतर कधिही एडिसन ला जाणं झालं की अचारी चिकन आवर्जून खात असू, किंवा घरी घेऊन येत असू. मित्र मैत्रिणी जरी जायचे झाले तरी 2 order of achari chicken आणायची standing order असे सगळ्यांना. पाकिटातले मसाले वापरून घरी करून पाहिलं दोन चार वेळा पण त्याला शालिमार सारखी चव कधी आली नाही. सुलेखा वर ही कृती मिळाली अन मी लगेच करून पाहिलं. शालिमार मधल्या चिकन मधे लसणीच्या पाकळ्या पण असतात. त्या मात्र मी विसरले.

बिन्धास भ्या !!!!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 08/03/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी भ्यायला घाबरत नाही, बिन्धास भितो...! वाटली मला भिती ,तर खुशाल लटपटतो..! घाबरणे आहे तसा, प्राणीजात स्वभाव. भिती वाटते नाकारणे, हा खोटा अहंभाव.. सुरक्षित जगण्या साठी असते आपुली धडपड त्यात झाली गडबड तर वाढते कि हो धडधड असेल जर हे खरे, तर कशास लाजायचे..? उडाली घाबरगुंडी, तर खुशाल घाबरायचे..!! बोट लावता लाजाळु, पान मिटुनी घेते मावळतो रवीराजा अन फुल कोमेजते लाजाळुने लाजावे अन ,फुलाने कोमेजावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे...? हा
Taxonomy upgrade extras

कोंबडी रस्सा

लेखक लवंगी यांनी रविवार, 08/03/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजचा बेत कोंबडी रस्सा. साहित्य : १ किलो कोंबडी २ बारीक चीरलेले टोमॅटो १ बारीक चीरलेला कांदा १ लसूण - २" आल यांची पेस्ट २ चमचे लाल तिखट १ चमचा हळद बारीक चीरलेली कोथींबिर कोंबडीला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ लावून २ तास ठेवावे.

रांग रांग आणि रांग

लेखक मेथांबा यांनी रविवार, 08/03/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कुठल्यापण सरकारी कामाला जा, बहुतेक ठीकाणी आपला रांगेत बराच वेळ जातो. अगदी इलेक्शन कार्ड चं काम असो किंवा पासपोर्ट काढायचा असो किंवा रेल्वेचं टिकिट काढायच काम असो. सर्वत्र रांगच रांग. त्यामुळे किति ह्युमन वर्किंग अवर्स फुकट जातात त्याची कोणालाच खंत नाही. आता सिध्दिविनायाकाची रांग म्हणाल तर तिथं उभं राहायचं कि नाही हे आपापल्या मर्जीवर असतं पण इरत ठीकाणच्या रांगेचं काय? त्याला अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे अफाट लोकसंख्यावाढ. आता तुम्ही म्हणाल की मलाच चार मुलं आहेत तर मला याविषयी बोलायचा अधिकार काय पण आमच्या वेळी तीन चार मुलं असणं काही विशेश नव्हतं.

स्त्रीत्वदिना निमित्ताने...

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 08/03/2009 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
१. इव्ह, "मी खूप विचारात पडलेय..." दैवीशक्ती, "काय चाललय तुझ्या मनात?" इव्ह, "हे बघ, तु मला बनवलंस, ही सुंदर बाग बनवलीस, पशु-पक्षी बनवलेस, पण आजकाल मला जरा भीती वाटायला लागलीय." दैवीशक्ती, "बोलत रहा..." इव्ह, "बऱ्याच वेळा मला कंटाळा येतो- काही मजाच नाही आयुष्यात. आणि हे इकडे तिकडे फ़िरणारे जंगली श्वापदं, विषारी साप...मला खूप भीतीपण वाटते." दैवीशक्ती (विचारात पडून), "बरं..." "हे बघ इव्ह माझ्याकडे एक कल्पक विचार आहे. मी एक "पुरुष" बनविणार तुझ्यासाठी" इव्ह, "पुरुष?" हे काय प्रकरण आहे?" दैवीशक्ती, "पुरुष हा एक दोषपुर्ण प्राणी असेल. त्याला अनेक कमकुवती असतील व हलक्या सवयी असतील.

कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 07/03/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
"मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो त्याकडे सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो.