पुस्तक परिचय- नर्मदे हरं हरं (जगन्नाथ कुंटे)
नुकतंच जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे हरं हरं' हे पुस्तक वाचलं. भन्नाट आहे. नर्मदा परिक्रमा करताना लेखकाला आलेल्या अनुभवांवर त्यांनी हे पुस्तक लिहीले आहे. जगन्नाथ कुंटे यांनी १९९९ पासून नर्मदा परिक्रमा करायला सुरुवात केली. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, "सद्गुरुंची आज्ञा झाली आणि निघालो. "जगन्नाथ कुंटे म्हणलं तर एक सामान्य माणूस, म्हणलं तर एक अवलिया. सिगरेट आणि चहा ही विशेष आवड. देव देव करीत बसत नाहीत, पण अध्यात्मात गती फार. त्यांनी एकूण ४ परिक्रमा केल्या आहेत, त्यापैकी पहिल्या ३ परिक्रमांदरम्यान आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहीले आहेत.
भारतामधे वर्षानुवर्षे लोक नर्मदा परिक्रमा करत आहेत. ज्यांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय माहिती नाही त्यांच्यासाठी: नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला पूर्ण प्रदक्षिणा घालणे. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून ही प्रदक्षिणा सुरू होते. प्रदक्षिणेचा मार्ग मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातुन जातो. ही प्रदक्षिणा पुर्णपणे चालत करायची असते. वाटेत शूलपाणीश्वर नावाचे भयानक जंगल लागते. या जंगलात भिल्ल जमातीचे लोक राहतात आणि हे भिल्ल जंगलातून येणार्या जाणार्या लोकांना लुटतात. गम्मत म्हणजे या भिल्लांना 'मामा' म्हणतात. मामा का तर म्हणे हे नर्मदा माई चे भाऊ म्हणून. आणि परिक्रमावासी यांच्याकडून खूषीने लुटून घेतात. भौतिक वस्तूंमधला तुमचा लोभ सुटावा या (सद्)हेतूने हे मामा तुम्हाला लुटत असतात. अंगावरची लंगोटी सोडली तर हे मामा तुमच्या जवळचं सगळं लुटुन नेतात. आणि त्यांनी लुटल्यावर अन्नपाणी मिळण्यासाठी गाव जवळपास ३ दिवस चालल्यावर लागतं. असं म्हणतात की एखादा परिक्रमावासी जर या जंगलात अडचणीत सापडला तर 'अश्वत्थामा' स्वतः येउन त्याला मदत करतो. अनेक लोकांना हा अनुभव आला आहे. लेखकाला अश्वत्थाम्याने तिसर्या परिक्रमेच्या वेळी दर्शन दिले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुस्तकात हा अनुभव दिला आहेच. हे जंगल म्हणजे अश्वत्थाम्याचा प्रदेश म्हणून ओळखलं जाते. ईतरही अनेक अद्भुत अनुभव लेखकाने पुस्तकात लिहीले आहेत.
हि प्रदक्षिणा करताना बरेच लोक मधून अधून वाहनाची मदतही घेतात. पण मग त्याला परिक्रमा म्हणत नाहीत. ते भ्रमण. भ्रमण करणारे शूलपाणीश्वराच्या जंगलातून जात नाहीत. ख्ररा परिक्रमावासी पूर्ण प्रदक्षिणा पायीच करतो. या प्रदक्षिणे ला अंदाजे ४-५ महिने वेळ लागत असावा कारण काही लोकांनी कमीत कमी १०८ दिवसांत प्रदक्षिण पूर्ण केल्या आहेत (जे सामान्य माणसाला जवळपास अशक्य आहे). बरोबर फक्त कपड्यांचा एक जोड घ्यायचा. अन्न वाटेत लागणार्या गावांत भिक्षा मागुन मिळवायचं. काही ठिकाणी लोक देतात, काही ठिकाणी हेटाळणीही करतात. नर्मदा माई परिक्रवासींना उपाशी पोटी ठेवत नाही असं म्हणतात. आणि जरी उपाशी जरी ठेवलं तरी भुकेची जाणीव होऊ देत नाही. लेखकाला हा अनुभव बर्याच वेळेला आल्याचं त्यांनी लिहीले आहे.
परिक्रमे च्यावाटेवर बरीच आदिवासी वस्ती आहे. ह्या आदिवासींचं जीवन, मध्य प्रदेश सरकारकडून त्यांची होणारी पिळवणूक, अपरीमित जंगलतोड, ढोंगी साधुंकडून समाजाची फसवणूक यावर लेखकाने सडेतोड लिहीले आहे. पुस्तक वाचायला घेतल्यावर जाणवलं की जी लोकं साधना करतात (म्हणजे देव देव नाही), अश्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शन पर आहेच, पण ईतरांनाही एक प्रवासवर्णन म्हणून वाचण्यास काहीच हरकत नाही.
वर्गीकरण
नर्मदे हर ...!!!
In reply to नर्मदे हर ...!!! by छोटा डॉन
सहमत
प्रतिसाद
हे पुस्तक
In reply to हे पुस्तक by विंजिनेर
विंजिनेर यांच्याशी अगदी सहमत!!
पुस्तक सुंदरच
कोठल्याहि
In reply to कोठल्याहि by मुत्सद्दि
एक माहिती
पुस्तक परिचय चांगला आहे.
विंजीनेर---- +१
In reply to विंजीनेर---- +१ by चाणक्य
बराच विचार
सुंदर
मी पण..